महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE
मुंबईत दिवसभरात 733 नवे कोरोनाबाधित, 650 रुग्णांची कोरोनावर मात आणि 19 जणांचा मृत्यू, सध्या 14 हजार 809 रुग्णांवर उपचार सुरु
येत्या दोन दिवसात मुंबईतील हॉटेल व्यावसायिकांना शिथिलता मिळण्याची शक्यता
आहारच्या शिष्टमंडळाने आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली
या भेटीदरम्यान मुंबईतील रुग्णसंख्या कमी होत असल्याने हॉटेल रात्री ११ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली
याबाबत शरद पवार यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोनवरून चर्चा झाली
येत्या दोन दिवसात याबाबतचा नवा आदेश काढण्यात येईल, असे आश्वासन शरद पवार यांनी आहार संघटनेला दिले आहे
अकोल्यात कोरोना अपडेट :
अकोल्यात आज दिवसभरात 15 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही
आतापर्यंत 1118 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 55417 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 879 रुग्ण उपचार घेत आहेत
तर दिवसभरात 83 जण कोरोनामुक्त झाले आहेत
कोरोनाचे निर्बंध झुगारून वर्षाविहारासाठी उत्तर पुणे जिल्ह्यातल्या ऐतिहासिक नाणेघाट आणि दाऱ्याघाट परीसरात पर्यटक गर्दी करत आहेत. गर्दी केलेल्या पर्यटकांवर जुन्नर पोलिसांनी केलेल्या कारवाईत 1 जून ते 19 जून अखेर तब्बल 625 जणांवर केसेस करत 2 लाख 1300 रुपये दंड वसूल केला आहे. पर्यटन स्थळावर बंदी असताना प्रवेश करणे, शारिरीक अतंर न पाळणे, मास्क न लावणे या कारणावरून पर्यटकांवर दंडात्मक कारवाई करत आहेत. माळशेज घाटात दरड कोसळण्याची भीती आहे. त्यामुळे पर्यटकांचा ओघ आता जास्त करून नाणेघाट व दाऱ्याघाट कडे वाढत आहे. तालुक्यातील पर्यटन स्थळे बंद आहेत. त्यामुळे पर्यटनासाठी बाहेर पडू नका असे, आवाहन जुन्नर पोलीसानी केले आहे
नागपूर –
नागपूरला मोठा दिलासा, तिसऱ्या दिवशी कोरोना मृत्यूची संख्या शून्य
39 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
तर 134 रुग्णांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्ण संख्या – 476761
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 466837
एकूण मृत्यू संख्या 9017
मुंबईच्या चुनाभट्टी इथे लसीकरणाचा नवा विक्रम, एकाच दिवसात 555 नागरिकांना दिल्या लसी
– सर्व वयोगताली तरूण तरूणींना देण्यात आली लस
– पहिलेयांदाच मुंबईतील खाजगी सोसायटीत मास वॅक्सिनेशन झाल्यानं हा पॅटर्न सर्वत्र राबवा, अशी मागणी
– सुराना हाॅस्पिटल, सरकार ग्रुप आणि श्रीमती तारादेवी फॉउंडेशनच्या माध्यमातून भग्नारी सोसाइटीत सर्व रहिवाशांचं लसीकरण पूर्ण
– 1 दिवसाच्या या वेक्सीनेशनमध्ये खासदार राहुल शेवाळे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगांवकर यांनीही लावली हजेरी
पुणे :
-दिवसभरात २६६ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २५५ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १७ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील १०.
– ३७३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७५८५४.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५६३.
– एकूण मृत्यू -८५३१.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६४७६०.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ४५००
कोरोनाबाधित रुग्णांकडून ज्यादा बिल आकारणाऱ्या भिवंडीतील सिराज रुग्णालयाचा नोंदणी परवाना दोन महिन्यांसाठी रद्द, महापालिका आयुक्तांची कारवाई
ज्या आरोपीने कांदिवली येथे फेक व्हॅक्सिनेशन केले होते त्यांच्यावरच वर्सोवा येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे
कांदिवली पोलिसांच्या तपासानंतर वर्सोवा पोलीस आरोपींचा ताबा घेण्याच्या शक्यता
वर्सोवा येथिल एका प्रोडक्शन हाऊसचे 150 कर्मचारी आणि त्यांचा कुटुंबातील लोकांचे व्हॅक्सिनेशन 29 मे रोजी करण्यात आले होते
लातूर महानगर पालिकेने आता 30 वर्ष वयापुढील नागरिकांचं लसीकरण करण्याची मोहीम आजपासून सुरुवात केली आहे. या लसीकरण मोहिमेत जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन आपलं कुटुंब सुरक्षित करावे, असे आवाहन महापौर विक्रांत गोजमगुंडे यांनी केले आहे. लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणासाठी महानगर पालिकेने तयारी केलेली आहे. त्यानुसार प्रत्येक टप्प्यात त्या-त्या वयोगटातील नागरिकांचे लसीकरण केले जात आहे. लातूर शहरातल्या सात लसीकरण केंद्रांवरून ही लसीकरण मोहीम सुरु आहे .
बारामती : उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीत
कोरोना आढावा बैठकीचं आयोजन
बैठकीपूर्वी अजितदादांना भेटण्यासाठी नागरीकांची गर्दी
गडचिरोलीत आता पाच टक्के पेक्षा पॉझिटिव्ह रेट कमी झाल्याने आनलाॅक नियमावलीत बदल होणार का ? जिल्हाधिकारी यांच्या भूमिकेवर जिल्हावासियांचे लक्ष
गडचिरोली जिल्हा पहिला आठवड्यात 5:29 पॉझिटिव्ह दराने असल्यामुळे जिल्हा पातळी तिसरा यादी समाविष्ट करण्यात आली होती
जिल्ह्याच्या आता पॉझिटिव्ह रेट केवळ 3. 61 टक्के
पॉझिटिव्ह रेट कमी झाल्याने नियमावली जिल्हाधिकारी बदल करतात की तसेच ठेवतात याकडे व्यापारी व लघु उद्योग व्यवसायाकांचे नवीन नियमावलीकडे लक्ष
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोना लसीकरण मोहिमेला गती
सोमवारी जिल्ह्यातील 44 प्राथमिक आरोग्य केंद्रातील 88 गावात मिळणार लस
तर उपजिल्हा रुग्णालय , ग्रामीण रुग्णालयासह शहरात प्रभाग निहाय मिळणार लस
उस्मानाबाद – जिल्हा स्त्री रुग्णालयात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 57 कोरोनाग्रस्त गर्भवती महिलांवर यशस्वी प्रसुती शस्त्रक्रीया तर 16 महिलांची नैसर्गिक प्रसुती करण्यात यश
कोरोना नियमाचे उल्लंघन केल्या प्रकरणी उस्मानाबाद पोलिसांकडून 273 कारवाईत 59 हजारांच दंड एकाच दिवशी वसूल
सोलापुर — घोंगडेवस्ती अतिक्रमण प्रकरण
बाधित मिळकतदारांना महापौर सहाय्यता निधीतून देणार मदत
नाल्याचा सहा मीटर परिसर सोडून इतर जागेवर बांधकाम करण्यास परवानगी देण्याची महापौरांची सूचना
घोंगडे वस्ती येथील अतिक्रमण प्रकरणी महापौर श्री कांचना यांना यांनी बोलावली होती सर्वपक्षीय नगरसेवकांची बैठक
घोंगडे वस्ती येथील नाल्यावर अतिक्रमण करून करण्यात आलेले बांधकाम काढण्याचे दिले होते भाजपचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी पत्र
त्यानंतर महानगरपालिकेने पडताळणी करून हटविले होते अतिक्रमण
मात्र अतिक्रमणाला अभय देण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधकांनी घातला होता महासभेत गोंधळ
नागपूर –
नागपुरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनामुळे शून्य मृत्यू
गेल्या 24 तासात नागपूर शहर व ग्रामीण भागात एकाही मृत्यूची नोंद नाही
दुसऱ्या लाटेत कोरोना ने थैमान घातलं होत , त्याने हादरलेल्या प्रशासनाला मोठा दिलासा
फक्त 16 नवीन रुग्णांनाची नोंद
जिल्ह्यात सक्रिय रुग्णांनाची संख्या आता 1002
कोरोना वर मात करण्याचा दर 97.90 टक्के वर पोहचला आहे
नाशिक
– नाशिकमधील पर्यटन स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांची नाकाबंदी
– कोरोना नियम धाब्यावर बसवत पर्यटक करतात मौज मजा
– हरिहर गडावर झालेल्या गर्दी वरून पोलीस कारवाईच्या भूमिकेत
– दंडात्मक करवाईसह गुन्हे दाखल करण्याचे ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांचे आदेश
नाशिक
– नाशिक महापालिकेत चौदा महिन्यात १३०० कर्मचारी कोरोनाबाधित
– नाशिक महापालिकेत ही कोरोनाचा वेगाने संसर्ग
– आतापर्यंत 27 कर्मचाऱ्यांचा मृत्यू
– बाधितांमध्ये आरोग्य विभागातील सर्वाधिक कर्मचाऱ्यांचा सहभाग
नाशिक
– लसीकरणात नाशिक कारागृह राज्यात अव्वल
– 15 दिवसात 1 हजार 400 कैद्यांना कोरोना प्रतिबंध लस दिली
– उर्वरित बंदीचं ही लवकरच होणार लसीकरण
– सद्या नाशिक कारागृहात 2 हजार 500 बंदी आहेत