महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE
अकोला कोरोना अपडेट
अकोल्यात आज दिवसभरात 7 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दोघांचा मृत्यू झाला आहे
आतापर्यंत 1120 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 55585 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 718 रुग्ण उपचार घेत आहेत
तर दिवसभरात 168 जण कोरोनामुक्त झाले आहेत
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील सर्व व्यायामशाळांना नियमित कालावधित सुरू ठेवण्याची परवानगी
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज एक आदेश काढत या संदर्भातील मागणीला मान्यता दिली
आठ वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये आता जीम, व्यायामशाळा नियमित खुली ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.
21 ते 28 जून या कालावधीसाठी ही परवानगी असून पुढील शुक्रवारी पुन्हा या संदर्भातील नवे आदेश जारी करण्यात येणार आहेत.
ठाणे : मनसे जिल्हा अध्यक्ष आज ठाणे पालिका आयुक्तांना भेट देण्यासाठी गेले होते. ठाणे महानगरपालिके अंतर्गत असलेल्या कोविड सेंटरमध्ये होणाऱ्या भ्रष्टाचारासंदर्भात बोलण्यासाठी त्यांनी आयुक्तांची भेट घेतली. ठाणे महापालिकेचे ग्लोबल कोविड सेंटर आणि पार्किंग प्लाझा येथे नव्याने एका ठेकेदाराला टेंडर देण्यात आले. या ठेकेदाराची तक्रार अविनाश जाधव यांच्याकडे केली असता या सर्व गोष्टींच्या चौकशीची मागणी मनसेने केली आहे. तसेच या भ्रष्टाचाराबद्दल अविनाश जाधव हायकोर्टात याचिका दाखल करणार असल्याचे मनसे ठाणे, पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितले आहे
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात आज 33 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
136 जणांनी केली कोरोनावर मात
तर 2 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
एकूण रुग्णसंख्या – 476794
एकूण बरे होणाऱ्यांची संख्या – 466973
एकूण मृत्यू संख्या – 9019
कोल्हापूर : समाजा समाजामध्ये तेढ कशी निर्माण होईल याची व्यवस्था राज्य सरकार करतंय
Obcचं स्थानिक स्वराज्य संस्थामधील आरक्षण नाकारल गेलं
तारखा पुढे ढकलण्याशिवाय राज्य सरकार ने काही केलं नाही
देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार या बाबत सभागृहात प्रश्न उपस्थित केला होता
भाजपच्या वतीने 26 जूनला चक्का जामची हाक दिली आहे
प्रस्थापितांनी हे राजकीय आरक्षण घालवलं
यापुढे शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण घालवतील
औरंगाबाद-
जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतील बारा कर्मचारी आढळले कोरोना बाधित..
लेणी प्रशासनासह आरोग्य विभागाची वाढली डोकेदुखी..
पर्यटन स्थळे खुली होऊन काही दिवस झाले असताच कर्मचारी बाधित निघाल्याने मोठा धक्का..
रविवारी चाचणी अहवाल येताच उडाली खळबळ..
नागरिकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन
सोलापूर –
आज सोलापुरात 45 वर्षांवरील व्यक्तींनाच मिळणार कोरोना प्रतिबंधक लस
30 ते 44 वयोगटाचे लसीकरण पुढील सूचना येईपर्यंत राहणार बंद
राज्य शासनाकडून अद्याप आरोग्य विभागाला कोणतेही निर्देश आले नाहीत
त्यामुळे 45 वर्ष पुढील वयोगटातील नागरिकांचे होणार लसीकरण
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा कहर
म्युकरमायकोसिसने जिल्ह्यात आतापर्यंत 123 रुग्णांचा बळी
मागील 24 तासात 2 रुग्णांचा मृत्यू
औरंगाबाद जिल्ह्यात आढळले एकूण 1031 म्युकरमायकोसिसचे रुग्ण
दोन दिवसात 11 म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची वाढ
663 जनांना दिला डिस्चार्ज तर 245 रुग्णांवर उपचार सुरु
जालना –
जालन्यात नागरिकांची लसीकरणाकडे पाठ, 50 % होत आहे लसीकरण.
ओबीसीच्या राजकीय आरक्षणासाठी उद्या समता परिषदेचे आक्रोश आंदोलन
कोरोनाचे उल्लंघन करणाऱ्या कडुन, वाहतूक शाखेकडून 55 लाख दंड वसुल
माजी मंत्री संजय राठोड यांचा जालना दौरा.
वाशिम जिल्ह्यात पॅसेंजर रेल्वेचा पर्याय सर्वानाच आर्थिकदृष्ट्या परवडणारा आहे. कोरोनाचे संकटही बहूतांशी निवळले आहे, त्यामुळे रेल्वे सुरू करण्याची मागणी होत आहे.