महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. तसेच, काहीच आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यासाठीची तयारीही सुरु करण्यात आली आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE
बीड: लग्न कार्यासाठी बीड जिल्ह्यात नवीन नियमावली जाहीर
लग्न कार्यास पोलिसांची परवानगी बंधनकारक
केवळ 50 जणांनाच लग्नकार्यात हजेरी लावता येणार
कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी काढले आदेश
नियम डावळणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई
मंगल कार्यालयात एका दिवशी एकाच लग्न कार्यास परवानगी
राज्यात 24 तासात नवे रूग्ण – १०,०६६
राज्यात 24 तासात बरे झालेले रूग्ण – ११,०३२
राज्यात 24 तासात मृत्यू – १६३
राज्यात एकूण रूग्ण – ५७,५३,२९०
राज्यात एकूण बरे झालेले – ५७५३२९०
राज्यात एकूण मृत्यू – ११९३०३
राज्यात अॅक्टीव्ह रूग्ण – १२१८५९
नागपूर :
नागपूर शहरात आज सर्वात जास्त लसीकरण
दिवसभरात 23703 नागरिकांचं झालं लसीकरण
मनपा आणि शासकीय केंद्रावर 22221 लसीकरण, तर खाजगी केद्रांवर 1482 नागरिकांचा लसीकरण
आतापर्यंतचा सर्वाधिक लसीकरणाचा आकडा
पुणे :
-दिवसभरात २८३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २५५ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०९.
– ३३१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७६४९३.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३७५.
– एकूण मृत्यू -८५४९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६५५६९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५४३७
नागपूर कोरोना अपडेट :
नागपूर जिल्ह्यात आज कोरोनामुळे मृत्यू शून्य तर जिल्ह्याबाहेरील 1 मृत्यूची नोंद
आज 46 नवीन कोरोना रुग्णांनाची नोंद
तर 97 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्ण संख्या – 476870
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 467190
एकूण मृत्यू संख्या – 9022
अकोला कोरोना अपडेट :
अकोल्यात आज दिवसभरात 24 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकाचाही मृत्यू नाही
आतापर्यंत 1122 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 55887 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 480 रुग्ण उपचार घेत आहेत
दिवसभरात 137 जण कोरोनामुक्त झाले आहेत
डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढला, सात जिल्ह्यांमध्ये डेल्टा प्लसचे रुग्ण, हा विषाणू अँटीबॉडी निष्क्रीय करण्याचं काम करतो, हा विषाणू आणखी धोकादायक असल्याची माहिती, महाराष्ट्रात आतापर्यंत 21 डेल्हा प्लसचे रुग्ण, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
राजेश टोपे यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
15 मे पासून आरोग्य विभागाने कार्यक्रम हाती घेतला आहे
प्रत्येक जिल्ह्यातून एक आठवड्यातून 25 असे सॅम्पल्स घेतले आहेत, 34000 सॅम्पलमधून 21 डेल्टा प्लस आढळले
काळजीचा जरी विषय नसला तरी ह्या सर्व केसेसला स्वतंत्र ठेवत आहोत. त्यांचं बारकाईने निरीक्षण करत आहोत
21 चे जे हाय रिस्क आणि लो रिस्कचा पण पाठपुराव करत आहोत
डेल्टा प्लसच्या संदर्भात कारवाई सुरू आहे
एकही मृत्यू नाही. यातले बरेचशे रुग्ण बरे होऊन घरीही गेले आहेत
-भारताच्या कोविड प्रतिबंधक लसीकरणाने पार केला 29 कोटींचा टप्पा
-देशात गेल्या 24 तासात कोरोनाचे 50,848 नवे रुग्ण
-सलग 41 व्या दिवशी दैनंदिन रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या जास्त
-रुग्ण बरे होण्याचा दर 96.56 टक्के
सोलापूर – माकपच्या आंदोलनात सोशल डिस्टिंगचा फज्जा
अनेक विडी कामगार महिला मास्कविना आंदोलनात सहभागी
महिलांच्या तोंडावर केवळ नावालाच मास्क
आंदोलनात कसलच सामाजिक अंतर नाही
सातारा जिल्हयात अनलाॅकनंतर पर्यटन लागले बहरु
महाबळेश्वर- पाचगणीच्या बाजारपेठेत पर्यटकांची वर्दळ…
परिस्थिती विचारात घेऊन लवकरच महाबळेश्वरची प्रेक्षणीय स्थळे सुरु करणार
सातारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची माहिती
भिवंडीत 30 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण सुरु
शहरातील रात्र निवारा केंद्रातील बेघर निराधार व्यक्तींचे पालिका आरोग्य विभागा कडून लसीकरण संपन्न.
शहरातील स्व राजीव गांधी उड्डाणपुलावर खड्ड्यांचे साम्राज्य ,वाहन चालक बेजार .
ग्रामीण भागात दाभाड,दुगाड ,अनगाव ,पडघा ,चिंबीपाडा ,खरबाव ,बापगाव या भागात शेतीच्या मशागतीसह भात पेरणीस सुरवात
शहर कचरामुक्त करण्यासाठी मुख्य बाजार पेठां सह हॉटेल खानावळ येतगिल कचरा संकलनासाठी सहा ट्रॅक्टर ट्रॉली सकाळ व रात्री च्या वेळेत कार्यान्वित
औरंगाबाद-
औरंगाबाद शहरात तीन लाख नागरिकांना कोरोनाचा धोका
तिसऱ्या लाटेत तब्बल तीन लाख नागरिक बाधित होण्याची शक्यात
18 वर्षांवरील तीन लाख नागरिकांवर औरंगाबाद महापालिकेचे लक्ष
लसीकरण न झालेले आणि कोरोना संसर्ग न झालेले 3 लाख लोक होणार बाधित
कोल्हापूर –
पॉझिटिव्हिटी रेट कमी होत असल्याने जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता
दुकाने उघडण्यासाठी विशिष्ट वेळ दिली जाण्या बाबत हालचाली
पालकमंत्री सतेज पाटील करणार मुख्यमंत्र्यांची चर्चा
व्यापारी संघटनांकडून गेल्या महिनाभरापासून होते दुकान उघडण्याच्या परवानगीची मागणी
परवानगी दिली नाही तरी सोमवारपासून दुकाने उघडणारच
व्यापाऱ्यांचा निर्णय
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्याला मोठा दिलासा
जिल्ह्याचा पॉझिटिव्हीटी रेट आला 6.67 टक्क्यांवर
मृत्यू दरात ही होतेय घट
मे महिन्याच्या मध्यात पासून पॉझिटिव्हीटी रेट होता 15 टक्यावर तर मृत्यूदर ही होता 3 टक्क्याहुन अधिक
टेस्टिंग वाढवून ही रुग्ण संख्या कमी होत असल्याच दिलासादायक चित्र
पुणे
पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडपाठोपाठ आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील कोरोनाबाधितांचा दर हा सात टक्क्यांच्या आत
मात्र, तरीही किमान आठवडाभर ग्रामीण भागातील कडक निर्बंध कायम राहणार
ग्रामीण भागातील निर्बंध शिथिलतेबाबतच्या निर्णय येत्या शुक्रवारी पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत होण्याची शक्यता
वारी सोहळ्यासाठी वारकऱ्यांची संख्या वाढणार नाही,
पालखीसोबत मानाच्या 40 चं वारकऱ्यांना परवानगी ,
विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी काढले आदेश,
वारकरी संख्या वाढवून देण्याची वारकऱ्यांची होती मागणी,
मात्र सरकारने वारीत वारकऱ्यांची संख्या 40 चं ठेवण्याचा निर्णय घेतलाय,
देहू व आळंदीतील प्रस्थान सोहळ्याला 100 चं वारकऱ्यांना परवानगी,
प्रस्थान सोहळ्याला वारकऱ्यांची संख्या ही मर्यादित,
वारीच्या दोन दिवस आधी सगळ्या वारकऱ्यांची आरटीपीसीआर करणं बंधनकारक
चहा-नाश्ता, हवाई प्रवास खर्चाला लावणार कात्री;केंद्र सरकारी कार्यालयांनाही कोरोनाचा फटका, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्ग परिवहन आणि महामार्ग मंत्रालयाने संबंधित विभागांना अनावश्यक खर्चात कपात करण्याचा आदेश दिला आहे.
– नागपूर जिल्ह्यात आजपासून 18 वर्षांवरील नागरीकांचं लसीकरण
– शहरात 106 केंद्रांवर तर ग्रामीण भागात 64 केंद्रांवर लसीकरणाची सोय
– सकाळी 11 ते सायंकाळी 5 पर्यंत लसीकरणाची वेळ
– लसीकरणासाठी ॲाफलाईन आणि ॲानलाईन नोंदणीची सोय
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 8 हजार 470 कोरोना रुग्णांची नोंद झाली
तर 9 हजार 43 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे
तर राज्यात 188 जणांचा मृत्यू झाला आहे
-पिंपरी चिंचवड शहरातील कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची सर्व केंद्र आज बंद
-लसीकरण कामकाजाची साप्ताहिक सुट्टी असल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र आज बंद रहाणार असल्याचे महापालिकेने पत्रकाद्वारे कळविले आहे
-रविवारी जास्त नागरिकांना सुट्टी असते त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांना लसीकरण मिळावे या उद्देशाने रविवार ऐवजी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने बुधवारी साप्ताहिक सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे