महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. तसेच, काहीच आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यासाठीची तयारीही सुरु करण्यात आली आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE
कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही. ICMR च्या संशोधनात माहिती समोर, कोरोनामुक्तांमध्ये अँटिबॉडीज तयार होतात. 18 ते 75 वयोगटातील 135 नागरिकांचा अँटिबॉडीज टेस्टचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
राज्यात आज दिवसभरात 9 हजार 844 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 9 हजार 371 रुग्णांची कोरोनावर मात, तर 197 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला
रायगड :
जिल्ह्यात आज कोरोनाचे 695 नवीन रुग्ण.
अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 128 रुग्ण.
दिवसभरात बरे झालेले रुग्ण 470.
दिवसभरात मृत रुगणांची संख्या – 11.
आज अखेर सक्रिय रुग्णसंख्या – 5 हजार 885.
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण – 1 लाख 34 हजार 980.
आतापर्यंत मृत रुग्ण – 3 हजार 510.
आतापर्यंतचे एकूण रुग्ण – 1 लाख 44 हजार 375.
पुणे :
दिवसभरात ३३३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात १८७ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०८.
– ३२३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७६८२६.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५१६.
– एकूण मृत्यू -८५५४.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६५७५६.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५६९६
अकोला कोरोना अपडेट :
अकोल्यात आज दिवसभरात 10 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला आहे
आतापर्यंत 1124 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 55962 जणांनी कोरोनावर मात केली आहे
तर सध्या 423 रुग्ण उपचार घेत आहेत
तर दिवसभरात 75 जण कोरोनामुक्त झाले आहेत
वाशिम कोरोना अपडेट :
जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात एका दिवशी आढळलेला सर्वात कमी नव्या कोरोना रुग्णांचा आकडा
जिल्ह्यात दिवसभरात फक्त 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण
तर आज 24 जणांना देण्यात आला डिस्चार्ज, तसेच एकही मृत्यू नाही
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 41315
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 284
आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 40415
आतापर्यंत एकूण मृत्यू – 615
सोलापूर :
सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन
गावकऱ्यांनी आयोजित केली बैलगाडा शर्यत
कारणहुणवीच्या सणाच्या निमित्ताने काढली बैलांची मिरवणूक
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात आजही आहेत कडक निर्बंध
कारणहुणवी सणाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकवरी घालण्यात आली आहे बंदी
नियमांची पायमल्ली करत कारणहुणवी सण केला साजरा
अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील प्रकार
राज्यात आज दरदिवशी 1300 मे.टन ऑक्सिजन निर्मिती होत असून ही निर्मिती 3 हजार मे.टनापर्यंत वाढवण्याच्या उदेशाने शासनाने “ऑक्सिजन स्वावलंबन योजना” हाती घेतली आहे. याअंतर्गत ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना अनेक प्रोत्साहने देण्यात आली आहेत. याचा लाभ घेत ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तातडीच्या उपाययोजना करत राज्यातील त्यांची ऑक्सिजन निर्मिती तसेच साठवणूक क्षमता येत्या तीन ते चार आठवड्यात वाढवावी जेणेकरून कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लागणारी ऑक्सिजनची अंदाजित गरज आपण भागवू शकू असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच याक्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना शासन पूर्ण सहकार्य करील, अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली
सिंधुदुर्ग–
सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून सरपंचांना विमा कवच.
कोरोना काळात काम करणाऱ्या सरपंचांना दिलासा.
स्वानिधीतून जिल्हा परिषद 428 सरपंचांना एक लाखांचे विमा कवच देणार आहे.
नऊ महिने कालावधीसाठी हे विमा कवच मिळणार आहे.
कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास देशभरातील कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येणार.
15 सरपंचांना प्रातिनिधिक स्वरूपात जि प अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते पॉलिसी सुपूर्द.
हा अभिनव उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद .
सोलापूर- शहरात आज लसीकरण होणार नाही
महानगर पालिकेकडे लसीचा साठा शिल्लक नसल्याने होणार नाही लसीकरण
त्यामुले आज पालिकेचे सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद
मागील महिन्यापासून शहरात सुरू असलेले लसीकरण आज ठप्प
औरंगाबाद :-
औरंगाबाद शहर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट
काल दिवसभरात आढळले फक्त 59 रुग्ण
सध्या रुग्णालयात 892 रुग्णांवर उपचार सुरू
तर काल दिवसभरात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू
औरंगाबाद शहर जिल्ह्यात डेल्टा प्लस जिवाणूंचा अद्याप संसर्ग नाही
पुणे
जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, मागील आठ दिवसांत हॉटस्पॉट गावांच्या संख्येत केवळ 2 ने घट
तर आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्यात हॉटस्पॉटच्या संख्येत वाढ
ग्रामीण भागातील संसर्ग कमी करण्यात आरोग्य विभागाला यश का येत नाही, असा प्रश्न होतोय निर्माण
पुणे
कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने ऑक्सिजनची मागणी 228 मेट्रिक टनांनी म्हणजे तब्बल 63 टक्क्यांनी कमी झाली
सद्यस्थितीत ही मागणी 134.5 मेट्रिक टन
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज लागत होता 363 मेट्रिक टन ऑक्सिजन
नागपूर जिल्ह्यातील लसीकरणाचा विक्रम
एकाच दिवशी ४२ हजार नागरिकांचे लसीकरण
मनपा क्षेत्रात २३ हजार ७०३ जणांचं लसीकरण
ग्रामीण भागात १८ हजार १८ लसीकरण
उस्मानाबाद
कोरोना संकटामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा व परीक्षा न झाल्याने 2 लाख 89 हजार 263 विद्यार्थी परीक्षा न देता पास
ऑनलाईन शिक्षण पद्धतीने अनेक विद्यार्थीच्या शिक्षणावर परिणाम
उस्मानाबाद –
कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील 45 पैकी 30 कोविड केअर सेंटर तात्पुरता स्वरुपात बंद
जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश,
30 केंद्र बंद केल्याने कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ
पुणे :
-दिवसभरात २८३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २५५ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०९.
– ३३१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७६४९३.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३७५.
– एकूण मृत्यू -८५४९.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६५५६९.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५४३७
राज्यात 24 तासात नवे रूग्ण – १०,०६६
राज्यात 24 तासात बरे झालेले रूग्ण – ११,०३२
राज्यात 24 तासात मृत्यू – १६३
राज्यात एकूण रूग्ण – ५७,५३,२९०
राज्यात एकूण बरे झालेले – ५७५३२९०
राज्यात एकूण मृत्यू – ११९३०३
राज्यात अॅक्टीव्ह रूग्ण – १२१८५९