Maharashtra Coronavirus Live Update :महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा हाहा:कार झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळते आहे.
गडचिरोली : आज जिल्हयात 641 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 424 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 13799 वर पोहचली आहे. तसेच सध्या 4524 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्हयात एकूण 322 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
अकोला कोरोना अपडेट
आज दिवसभरात 389 रुग्ण पॉझिटिव्ह
2228 अहवालांपैकी 1839 जणांचे अहवाल निगेटिव्ह
ऐकून कोरोनाबाधितांचा आकडा 37672 वर
आज दिवसभरात 10 जणांचा मृत्यू
कोरोनामुळे आतापर्यंत 629 जणांचा मृत्यू
आज दिवसभरात 775 जणांना डिस्चार्ज
तर 31046 जणांनी केली कोरोनावर मात
सध्या 5997 जणांवर उपचार आहेत
उस्मानाबाद कोरोना अपडेट
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज 569 नवे रुग्ण
दिवसभरात 16 जणांचा मृत्यू तर 807 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुक 186 रुग्ण , तुळजापूर 44 रुग्ण, उमरगा 63 रुग्ण, लोहारा 15 रुग्ण, कळंब 114 रुग्ण, वाशी 58 रुग्ण, भूम 47 रुग्ण व परंडा 42 रुग्ण
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 6155 सक्रिय रुग्ण
उस्मानाबाद – 2 लाख 05 हजार 526 नमुने तपासण्या आले. त्यापैकी 34 हजार 345 जण कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात आतापर्यंत 852 जणांचा मृत्यू
सांगली कोरोना अपडेट
सांगली जिल्ह्यात सलग सहाव्या दिवशी रुग्णसंख्या 1 हजारांच्या पुढे
आज 33 कोरोना रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात मृतांचा आकडा 2103 वर
जिल्ह्यात आज दिवसभरात 1150 कोरोना रुग्ण
सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 11378 वर
उपचार घेणारे 749 जण आज कोरोना मुक्त
येवला : दिवसभरात 83 जणांना कोरोनाची लागण
आतापर्यंत 140 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवल्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3605 वर
कोरोनावर 2923 जणांची यशस्वीपणे मात
उर्वरित 542जनांवर उपचार सुरु
पुणे – दिवसभरात 4631 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ
– दिवसभरात 4759 रुग्णांना डिस्चार्ज
– पुण्यात करोनाबाधित 76 रुग्णांचा मृत्यू, 21 रूग्ण पुण्याबाहेरील
-1369 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 4,00117 वर
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 49289 वर
– एकूण मृत्यू -6498
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज-344330
नागपूर : ‘स्पाईस हेल्थ’च्या वतीने आरटी-पीसीआर टेस्ट करण्यासाठीची मोबाईल टेस्ट लॅब नागपूरमध्ये दाखल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलेल्या विनंतीनुसार मोबाईल टेस्ट लॅब
या लॅबद्वारे 425 रूपयांत प्रतिदिन 2500 लोकांची टेस्ट केली जाणार
तीन ते चार दिवसांत इन्स्टॉलेशननंतर ही लॅब सुरू होईल
पिंपरी-चिंचवड कोरोना अपडेट
आज आढळलेले कोरोना रुग्ण -2265
कोरोनामुक्त -2027
मृत्यू -91
एकूण कोरोना रुग्ण -200667
कोरोनामुक्त -172679
मृत्यू -2669
दिवसभरात तब्बल 91 जणांचा मृत्यू
चंद्रपूर: गेल्या 24 तासात कोरोनाची आजवरची सर्वोच्च संख्या, 4190 नमुने तपासणीतून 1728 नव्या रुग्णांची नोंद
24 तासात 34 जणांचा मृत्यू
एकूण कोरोना रुग्ण : 52840
एकूण कोरोनामुक्त : 36415
अॅक्टिव्ह रुग्ण : 15637
एकूण मृत्यू : 788
एकूण नमूने तपासणी : 357262
अहमदनगर : कामारगाव येथील सरपंच तुकाराम कातोरे यांनी गावात विनाकारण फिरणाऱ्या लोकांसमोर दंडवत घालून घरी बसण्याची केली विनंती
तुमच्यापुढे लोटांगण घालतो पण आता घरातच थांबा, कोरोनाला रोखण्यासाठी सरपंचांची आर्त हाक
कोरोना आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केलाय. मात्र तरीसुद्धा अनेक लोक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसतायत
त्यामुळे व्यथित होऊन कामरगावाच्या सरपंचांनी हात जोडून पाया पडून चक्क ग्रामस्थांपुढे लोटांगण घालून घरी थांबण्याची विनंती केलीये.
पुणे : कोरोनाची लक्षणे जाणवल्याने इंदापुरात ज्येष्ठ नागरिकाची आत्महत्त्या
– राहत्या घरात गळफास लावून घेत केली आत्महत्त्या
– प्रकाश विष्णूपंत भगत (वय ६५) यांनी केली आत्महत्त्या
– गेल्या चार पाच दिवसांपासून घसादुखी, अंगदुखी, खोकल्याचा होता त्रास
– कोरोना चाचणी करण्याचीही डॉक्टरांनी केली होती सूचना
– इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील घटना
नागपूर कोरोना अपडेट
नागपुरात आज कोरोनामुळे 87 जणांचा मृत्यू
7771 नव्या कोरोना रुग्णांची नोंद
5130 जणांनी केली कोरोनावर मात
एकूण रुग्णसंख्या – 374188
एकूण बरे होणाऱ्यांची संख्या – 289696
एकूण मृत्यू संख्या – 6936
सोसापूर : पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात जाऊन रुग्णांची भेट घेतली. यावेळी रुग्णांनी सिव्हिलमध्ये मिळत असलेल्या उपचारवरून समाधान व्यक्त केले. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात मिळत असलेल्या उपचारबाबत आणि स्वच्छतेबाबत अनेक वेळा तक्रारी प्राप्त होत होत्या. त्यामुळे अचानक भेट देऊन रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णांनी मिळत असलेल्या सेवेबाबत समाधान व्यक्त केलंय. यावेळी शासकीय रुग्णालयातील मेडिसिन विभागाचे प्रमुख डॉ. प्रसाद, डॉ. चिटणीस, डॉ. अग्रवाल इत्यादी देखील सोबत होते.
वाशिम कोरोना अलर्ट
वाशिम जिल्ह्यात आज 4 रुग्णांचा मृत्यू
आज दिवसभरात आढळले 329 नवे रुग्ण
दिवसभरात 569 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 25 दिवसात एकूण 75 रुग्णांचा झाला मृत्यू
25 दिवसांत एकूण आढळले 9133 नवे कोरोना रुग्ण
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 25308
सध्या सक्रिय रुग्ण – 4088
आतापर्यंत कोरोनामुक्त रुग्ण– 20957
आतापर्यंत एकूण मृत्यू – 262
पुणे -पिंपरी चिंचवड शहरातील तीन आमदार कोरोनाच्या विरुद्ध लढण्यासाठी सरसावले
आमदार निधीतून कोरोनासाठीच्या लढाईला योगदान देण्याचे जाहीर
– राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अण्णा बनसोडे, भाजप आमदार महेंश लांडगे, भाजप आमदार लक्ष्मण जगताप या तिन्ही आमदारांनी केली मोठी मदत
-या आमदारांनी आपल्या निधीमधून महापालिका रुग्णालयाला केली मदत
-राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी विधानसभा आमदार अण्णा बनसोडे यांनी आमदार निधीमधून सव्वा कोटी रुपयांचा निधी
-भाजपचे भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे यांनी एक कोटी रुपये मदत केली असून त्यामध्ये भोसरी महापालिका रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारणार
-तर भाजप चिंचवड विधानसभा आमदार यांनी रेमडेसिव्हीर खरेदीसाठी दिले 25 लाख रुपयांचा निधी
नागपुरात आता मंगल कार्यालयातसुद्धा कोविड केअर सेंटर सुरू
काही हॉटेल्सनंतर मंगल कार्यालयातसुद्धा कोविड रुग्णांची सुविधा
नागपुरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता रुग्णालयातील बेड फुल झाले
त्यामुळे आता रुग्णांना उपचार देण्यासाठी मंगल कार्यालयांचा अपयोग
महापालिका प्रशासन आणि रुग्णालय प्रशासन यांनी उचलले पाऊल
पुणे : डेक्कन येथील प्रभात रस्ता परिसरातील घरामध्ये डॉक्टर मृतावस्थेत आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस
तर त्यांची बहिण घरामध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आली, पोलिसांनी तिला उपचारांसाठी रुग्णालयात केलं दाखल
मात्र उपचारादरम्यान बहिणीचाही मृत्यु याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी केली अकस्मात मृत्युची नोंद
नेत्रतज्ञ डॉ.सुबीर सुधीर रॉय (वय 68, रा. श्वेता टेरेस, भोंडे कॉलनी, प्रभात रोड, डेक्कन), गितीका सुधीर रॉय (वय 65) असे मृत्यु झालेल्यांची नावे
डॉ. रॉय आणि गितिका दोघेही होते कोरोना बाधित
नवाब मलिक याची माहिती
18 ते 45 वयोगटातील प्रत्येकाचं मोफत लसीकरण करण्यात येईल
सरकार आपल्या तिजोरीतून हा कार्यक्रम हाती घेईल
जागतिक टेंडर मागवण्यात येणार असून जास्तीत जास्त लस खरेदी करण्यात येणार आहे
नाशिक – महापौरांनी घेतली सर्व विभाग प्रमुखांची ऑनलाईन बैठक
अंत्यसंस्कारासाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाईचे महापौरांचे आदेश
मनुष्यबळाचा तुटवडा भरून काढण्यासाठी 1600 जणांना नियुक्तीपत्र
प्रत्यक्षात मात्र 581 कर्मचारीच हजर झाल्याचं समोर
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांची पत्रकार परिषद
मुंबईत ३० ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत तर ६० खाजगी ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू आहेत.
– आता आम्ही दुसऱ्या डोस ला सर्वाधिक प्राधान्य देत आहोत.
– १ मे पासून १८ वर्षापुढील सर्वांना लस देणार आहोत.
– जे पहिले येतील त्यांना लस देण्यात येणार आहे.
लसीकरण बराच ठिकाणी सुरू आहे… मुंबईत ठिकठिकैणी सुरू आहे…
खाजगी रुग्णालयात व्हॅक्सिनेशन सुरू आहे
घरोघरी जाऊन सध्या तरी कोरोना लस नाही
मुंबईतले प्रसिद्ध डॉक्टर शशांक जोशी यांच्याशी पंतप्रधानांचा संवाद.
दुसरी लाट आली आहे, ती खूप वेगानं आली आहे आणि पहिल्या लाटेपेक्षा विषाणुच्या संसर्गाची गति मोठी आहे. परंतु, त्याच्या संसर्गापेक्षाही जास्त गतिनं लोक बरे होत आहेत आणि मृत्युदरही खूप कमी आहे.
रेमडेसिवीर पहिल्या नऊ ते दहा दिवसात दिलं तरच काम करतं आणि पाचच दिवस ते देता येतं. परंतु असं पाहिलं गेलं आहे की, लोक रेमडेसिवीरच्या मागे धावत सुटले आहेत. असं मुळीच धावता कामा नये.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मन की बात
देशातील कोरोना संकट पुन्हा गडद, दुसरी लाट मोठी, पण घाबरु नका : पंतप्रधान नरेंद्र मोदी
जर तुम्हाला कोणतीही शंका असेल, तर तुम्ही बरोबर सल्ला घ्या
चुकीचा सल्ला घेऊ नका
तुमचे डॉक्टरांकडून याबाबची माहिती घ्या : मोदी
नागपूर – नागपुरात नागरिकांची रस्त्यावर गर्दी कमी
पोलिसांचा रस्त्यावर मोठा बंदोबस्त
ठिकठिकाणी नाकाबंदी करून चेकिंग केली जात आहे
बिनाकामाने फिरणाऱ्यांवर केली जात आहे कारवाई
मुख्य रस्त्यावर गर्दी कमी असल्याने सकाळ च्या वेळी लॉक डाऊन ला चांगला प्रतिसाद मिळताना दिसतो
जास्तीत जास्त नागरिकांनी आज रविवारचा विकेंड घरीच राहण्यात आनंद मानत असल्याचं पाहायला मिळते
सांगली जिल्ह्याला 55 हजार लसीचे डोस मिळाले
जिल्ह्यात सर्व केंद्रावर सकाळपासून वाटप सुरू
कालपासून थांबलेली लसीकरण प्रकिया आज पुन्हा सुरू
जिल्ह्यात अनेक केंद्रावर लस संपली असे बोर्ड लावले होते
नागतिकात लस संपलेने तीव्र नाराजी होती
सांगली जिल्ह्यात व्हेंटिलेटर बेड मिळणे झाले कठीण
रेमडेसिव्हर ऑक्सिजनचा ठणठणाट
कोविड रुग्ण आणि नातेवाईक याचा जीव लागला टांगणीला
प्रशासन झाले हतबल
जिह्यात दररोज 1300 पेक्ष्या जास्त कोरोना रुग्ण वाढत आहे
10 हजार पेक्षा जास्त रुग्ण होमआयशेलेसन
जिह्यात 1600 रुग्ण अति गंभीर
दररोज 400 रुग्ण होत आहेत कोरोना मुक्त
जिह्यात व्हेंटिलेटर बेड मिळने झाले मुस्किल
बेड मिळवण्यासाठी रुग्णाचे नातेवाईक करतात धावाधाव
सोलापूर- रुग्णालयात उपचार घेत असलेल्या बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिव्हीर आणि इतर औषधे आणण्यास सांगितले जात असेल तर डॉक्टर आणि संबंधित रुग्णालयावर दंडात्मक कारवाई करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांच्या इशारा
सर्व रुग्णालयांना पुरवठाधारकाकडून मागणीनुसार व त्यांच्या क्षमतेनुसार त केला जात आहे पुरवठा
रत्नागिरी- जिल्ह्यातील लसीचा साठा संपला
पुढील दोन दिवस लसीकरण केंद्र बंद रहाणार
जिल्ह्यात १ लाख ३५ हजार ३९ जणांचे लसीकरण
लस वाया जाण्याचे प्रमाण २.७ टक्के
– वर्धेत शनिवारी ३१ कोरोनाबाधितांचा मृत्यू तर 932 नवीन रुग्णांची नोंद
– रुग्णवाढीसोबत मृत्यूदरातही वाढ
– जिल्ह्यात आतापर्यंत आढळले 30677 रुग्ण तर 24468 रुग्ण कोरोनामुक्त
– आतापर्यंत 664 रुग्णांचा मृत्यू
– जिल्ह्यात 5545 ऍक्टिव्ह रुग्ण
– दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्याने रुग्णालये फुल्ल
– जिल्ह्याच्या रुग्णालयाचे ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड फुल्ल
सोलापूर– पंढरपूर मंगळवेढा तालुक्यात जादा पोलिस बंदोबस्त तैनात
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी काढले आदेश
दोन्ही तालुक्यात सरासरी प्रतिदिन 200 ते 300 रुग्ण होत आहेत बाधित
दोन्ही तालुक्यात कोरोनाचा संसार रोखण्याबरोबरच नियम तोडणाऱ्या नागरिकांना पायबंद घालण्यासाठी राज्य सुरक्षा बलाचे अतिरिक्त तुकडी तैनात करण्याचे आदेश
ग्रामीण पोलीसाकडून जिल्ह्यातील 175 गावातील 204 रस्ते बंद
कोल्हापूर
कोल्हापूर शहरातील महानगरपालिकेच्या हॉस्पिटलसह कोविड केअर सेंटरच होणार ऑडिट
यात ऑक्सीजन यंत्रणेसह ऑक्सिजनचा साठा, स्ट्रक्चरल ऑडिट, फायर ऑडिट, इलेक्ट्रिक ऑडिट चा असणार समावेश
महानगरपालिकेकडून कार्यवाहीला देखील सुरुवात
नाशिक, विरार दुर्घटनेनंतर कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाची खबरदारी
खाजगी रुग्णालयांना ऑडिट करून घेण्याचे आदेश
येवला :- कोरोनाबाधित 93 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
आता पर्यंत 140जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवल्यातील 3522कोरोन बधितांची एकूण संख्या पोहचली
कोरोनावर 2840 जणांनी मात करत केली घरवापसी
उर्वरित 542जण कोरोणा उपचार घेत आहे
– नागपूर शहरात १ लाख ५३ हजार ८१७ ज्येष्ठ नागरिकांनी घेतली कोरोना लस
– शहरात आतापर्यंत एकूण ३ लाख ९७ हजार ७८६ नागरिकांनी घेतला लसीचा पहिला डोस
– शहरात लसीचा पहिला डोस घेण्यात ज्येष्ठ नागरीकांचा पहिला नंबर
– १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण करण्यास मनपा सज्ज
– १५ ॲागस्टपर्यंत १८ वर्षांवरील तरुणांचे लसीकरण पुर्ण करण्याचं उद्दिष्ट
नागपूर जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडून ऑक्सिजन प्लांटची पाहणी
बुटीबोरी व हिंगणा येथील ऑक्सिजन प्लांटला भेट दिली.
जिल्हयात ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होतो की नाही हे पाहण्यासाठी आज जिल्हाधिकारी ठाकरे यांनी ही पाहणी केली.
बुटीबोरी औदयोगिक वसाहत व हिंगणा येथील ऑक्सिजन प्लांटला भेट देवून त्यांनी पाहणी केली.
अग्निसुरक्षेसाठी आवश्यक सुचना त्यांनी दिल्या.
राज्यात अन्यत्र घडलेल्या दुर्घटना पाहता सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्यात याव्यात असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
या प्लांटमध्ये ऑक्सिजनचा साठा करतांना योग्य काळजी घेण्यात यावी, असे त्यांनी सांगितले.
रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यासाठी प्रशासनाने 2 अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात रोज 135 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत असून साधारण 35 मेट्रिक टन बाहेरून आणण्यात येतो.
कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक ऑक्सिजन प्लांटमध्ये लिक्विड ऑक्सिजनचा ठणठणाट
हॉस्पिटलना मागणी प्रमाणे ऑक्सिजन मिळत नसल्याचे समोर
ऑक्सिजन प्लॅन्ट वर लिक्विड ऑक्सिजनच उपलब्ध नाही
ऑक्सिजन प्लँट चालकांच लिक्विड ऑक्सिजन उपलब्ध करून देण्याबाबत कोल्हापूर जिल्हा प्रशासनाला पत्र
गेल्या 3 दिवसापासून अनेक ऑक्सिजन प्लॅन्टकडे लिक्विड ऑक्सिजनचा साठाचं उपलब्ध झालेला नाही..
पुणे
खासगी कोविड केअर सेंटरचे ऑडिट करण्याचा महापालिकेचा निर्णय
सेंटर सुरू करताना दक्षता घेण्यासंदर्भातील ज्या अटीशर्ती घालण्यात आल्या आहेत, त्याचे उल्लंघन होत असल्याचे आलेन
पाचही परिमंडळातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आलं ऑडिटच काम हे काम
मुंबई येथील कोविड केअर सेंटरला लागलेल्या आगीच्या पार्श्वभूमीवर, शहरातील खाजगी कोविड केअर सेंटर सुरू करताना महापालिकेने काही परवानगी बंधनकारक
महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा नाईक यांची माहिती
पुणे
पुण्यातील शासकीय तसेच खासगी रुग्णालयांना अग्निशामक दलाचा सतर्कतेचा इशारा
शहरातील सर्व रुग्णालायांनी पुन्हा एकदा फायर सेफ्टी ऑडीट करून घेण्याचे अग्निशामक दलाने दिले आदेश
शहरातील ऑक्सिजन व व्हेंटिलेटर बेडवर उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी असल्याने रुग्णालयातील आॅक्सिजन साठा, अग्निशामक यंत्रणा याकडे लक्ष ठेवणे अनिवार्य
पुणे
पुणे शहरातील ऑक्सिजनची कमतरता भरून काढण्याकरिता भारतीय हवाई दलाने केला मदतीचा हात पुढे
हवाई दलाच्या विमानाने ऑक्सिजनचे चार रिकामे टँकर गुजरातमधील जामनगर येथे रवाना
या टँकरमधून पुण्यासाठी ऑक्सिजन आणला जाणार असल्याची संरक्षण विभागाने दिली माहिती
औरंगाबाद
दिवसभरात 44 कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
मागील 24 तासांत 1497 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने वाढ
जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 117488 वर
जिल्ह्यात एकूण 2346 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
14254 सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत एकुण 100888 जण कोरोनामुक्त
पुणे :
पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी शनिवार रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सच्या 5234 पुरवठा
जिल्हा प्रशासनाने प्रत्येक हाॅस्पिटलचा कोटा निश्चित करून सायंकाळपर्यंत सर्व वितरकामार्फत हाॅस्पिटल्सना वाटप
सोमवारपर्यंत जिल्ह्यातील रेमडेसिविर इंजेक्शन्सचा तुटवडा कमी होन्याचा प्रशासनाचा अंदाज
पुणे जिल्ह्यातील एकूण 573 कोविड हॉस्पिटल्समध्ये असलेल्या 14007 फंक्शनल बेडसच्या प्रमाणात 5234 इंजेक्शनसचा पुरवठा
नागपूर –
नागपुरात वाढती कोरोना रुग्णांनाची संख्या आणि मृत्यू बघता चिंतेचे वातवरण
शहरात मोठ्या प्रमाणात रुग्णवाहिका असताना त्या सुद्धा कमी पडत आहे
त्यामुळे आता महापालिकेची आपली बस रुग्णांच्या मदतीला धावणार
22 बस मध्ये ऑक्सिजनची व्यवस्था असणाऱ्या रुग्णवाहिका तयार करण्याचा निर्णय
महापालिकेने घेतला निर्णय
या 22 बस मुळे रुग्णांना मिळणार सुविधा
रुग्ण वाहिके साठी अनेकांना पहावी लागत होती वाट
रुग्ण संख्येत भर पडल्याने मिळणार रुग्णांना दिलासा
वर्धा जिल्ह्यात कोरोनाचे भीषण रुप
काल एकाच दिवशी 41 शवांना अग्नी देण्यात आला.
प्रशासनाच्या नोंदीत 16 जणांची नोंद होती.
नागपूर –
नागपूर आणि विदर्भात ऑक्सिजनच्या साठवणुकीसाठी असलेली सिलेंडरची कमतरता लक्षात घेता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरात मधून मागविले खाली सिलेंडर
नितीन खारा यांना जास्त साठवणूक करता येईल असे मोठे सिलेंडर पुरवण्याची विनंती केली होती.
त्यानुसार गुजरातमधील भरूचवरून ५० लिटर क्षमतेच्या १०० सिलेंडरची पहिली खेप नागपूरला पोहचली आहे.
नागपूर –
आणखी दोन ऑक्सिजन टँकर नागपूरला आले
शहरातील कोरोना बाधित रुग्णांसाठी ही दिलासादायक बातमी.
नागपुरातील रुग्णांसाठी आणखी दोन ऑक्सिजन टँकर दाखल झाले.
विधानसभेचे विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नातून नागपूरला ऑक्सिजन टँकर प्राप्त झाले आहेत.
जयस्वाल निको ग्रुप रायपूर वरून आलेल्या दोन टँकरामध्ये २२ मे. टन आणि १६ मे. टन ऑक्सिजन आहे.
या ऑक्सिजनचा पुरवठा शासकीय, खाजगी व मनपाच्या रुग्णालयात केला जाईल.
याचा लाभ किमान तीन हजार रुग्णांना होईल अशी शक्यता
मालेगाव :- शिवसेना नगरसेविकेचा कोरोनाने मृत्यू
कविता किशोर बच्छाव असे नगरसेविकेचे नाव
प्रभाग क्रं एकच्या होत्या माजी सभापती
काही दिवसांपूर्वी कोरोनाची झाली होती लागण
लक्षण तीव्र नसल्याने गृहवीलगिकरणातच त्यांच्या वर सुरू होते उपचार
शनिवारी रात्री उशिरा असव्यस्त वाटू लागल्याने त्यांना सामान्य रुग्णालयात हलविले
रुग्णालयात पोहचण्यापूर्वीच कविता यांची प्राण ज्योत मालवली
मुंबईतील कोरोनाबाधितांची संख्या
२४ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण -५८८८
२४ तासात बरे झालेले रुग्ण-८५४९
बरे झालेले एकूण रुग्ण- ५,२९,२३३
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८५%
एकूण सक्रिय रुग्ण-७८,७७५
दुप्पटीचा दर- ५४ दिवस
कोविड वाढीचा दर (१७ एप्रिल-२३ एप्रिल)- १.२६%
#CoronavirusUpdates
२४ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता२४ तासात बाधित रुग्ण -५८८८
२४ तासात बरे झालेले रुग्ण-८५४९
बरे झालेले एकूण रुग्ण- ५,२९,२३३
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८५%एकूण सक्रिय रुग्ण-७८,७७५
दुप्पटीचा दर- ५४ दिवस
कोविड वाढीचा दर (१७ एप्रिल-२३ एप्रिल)- १.२६%#NaToCorona— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 24, 2021
– दिवसभरात ३९९१ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ४७८९ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ७४ रुग्णांचा मृत्यू. १९ रूग्ण पुण्याबाहेरील.
– १३६४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ३९५४८६.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ४९४७२.
– एकूण मृत्यू -६४४३.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ३३९५७१.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- २२२२७.
पुणे जिल्ह्यात काल दिवसभरात 9,989 कोरोनाबाधितांची नोंद
तर 138 जणांचा मृत्यू
8,853 जण कोरोनामुक्त
Maharashtra: Pune district reports 9,989 fresh COVID19 cases, 138 fatalities and 8,853 recoveries in the last 24 hours
Active cases: 1,02,267
Total cases: 7,82,993
Total recoveries: 6,68,728
Death toll: 12,167 pic.twitter.com/HUb0MjZUdI— ANI (@ANI) April 24, 2021
राज्यात काल दिवसभरात 67 हजार 160 नवे रुग्ण, दिवसभरात तब्बल 676 रुग्णांचा मृत्यू, तसेच दिवसभरात 63 हजार 818 रुग्णांना डिस्चार्ज
एकूण सक्रीय रुग्ण : 6,94,480
मृतांची संख्या : 63928
एकूण कोरोना रुग्ण: 42,28,836
एकूण कोरोनामुक्त : 34,68,610
67,160 new #COVID19 cases, 63,818 discharges and 676 deaths were reported in Maharashtra in the last 24 hours
Active cases: 6,94,480
Death toll: 63928
Total cases: 42,28,836
Total recoveries: 34,68,610 pic.twitter.com/8CRVohdcrM— ANI (@ANI) April 24, 2021