Maharashtra Coronavirus LIVE Update : पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणारे 19 हॉटेल, चायनीज सेंटर, रेस्टॉरंट सील

| Updated on: May 26, 2021 | 12:39 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणारे 19 हॉटेल, चायनीज सेंटर, रेस्टॉरंट सील
MAHARASHTRA Corona
Follow us on

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 25 May 2021 10:09 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणारे 19 हॉटेल, चायनीज सेंटर, रेस्टॉरंट सील

    पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाबाबतच्या नियमांचे उल्लंघन करणारे 19 हॉटेल, चायनीज सेंटर, रेस्टॉरंट सील करण्यात आले आहेत. राज्य शासनाने लावलेला लॉकडाऊन संपेपर्यंत या आस्थापना सीलबंद राहतील. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात लागू नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हिंजवडी परिसरातील 19 हॉटेल, हुक्काबार, चायनीज व रेस्टॉरंट सील करण्यात आले आहेत.

    या कारवाईसाठी हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिसांची एकूण तीन पथके तयार करण्यात आली होती. हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत नेमलेल्या पथकांना संबंधित हॉटेल व आस्थापना लॉकडाऊन नियमांचे पालन करत नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे ही हॉटेलं आणि आस्थापना सील करण्याबाबत मुळशी तहसीलदार यांना लेखी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

  • 25 May 2021 08:41 PM (IST)

    आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटरमध्ये 1 ते 14 वयोगटातील 55 मुलांवर उपचार, पालकांची चिंता वाढली

    अहमदनगर : आमदार निलेश लंके यांच्या कोविड सेंटर मध्ये 1 ते 14 वयोगटातील 55 मुले

    गेल्या दोन ते तीन दिवसात 1 ते 14 गटातील मुलं 55 मुले दाखल

    लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्यामुळे पालकांची चिंता वाढली

    लहान मुलांसाठीसुद्धा आमचं कोविड सेंटर सज्ज

    निलेश लंके यांचे आश्वासन, पालकांना काळजी घेण्याचे आवाहन


  • 25 May 2021 08:04 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 739 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ, 1560 जणांना डिस्चार्ज 

    पुणे कोरोना अपडेट

    – दिवसभरात 739 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 1560 रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात दिवसभरात करोनाबाधित 49 रुग्णांचा मृत्यू, 14 रूग्ण पुण्याबाहेरील

    – 1032 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 466858

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 8868

    – एकूण मृत्यू -8078

    -आजपर्यंत एकूण डिस्चार्ज करण्या आलेले रुग्ण- 449912

     

  • 25 May 2021 07:49 PM (IST)

    सातारा जिल्ह्यात दिवसभरात नव्या 2364 जणांना कोरोनाची लागण, 33 बाधितांचा मृत्यू

    सातारा : जिल्ह्यात  2147 नागरिकांना दिला डिस्चार्ज
    नव्या 2364 जणांना कोरोनाची लागण

    33 बाधितांचा मृत्यू

    आज अखेरची आकडेवारी

    एकूण नमुने -711736

    एकूण बाधित रुग्ण – 153506

    घरी सोडण्यात आलेले रुग्ण -130920

    एकूण मृत्यू -3489

    उपचार सुरु असलेले  रुग्ण-19078

    सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती

  • 25 May 2021 07:45 PM (IST)

    नागपुरात कोरोनाची लाट ओसरायला सुरुवात, रुग्णाची संख्या आली 500 च्या खाली

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात कोरोनाची लाट ओसरायला सुरवात

    कालपासून रुग्णाची संख्या आली 500 च्या खाली

    नागपुरात आज 470 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    1981 जणांनी केली कोरोनावर मात

    तर 25 जणांचा झाला कोरोनामुळे मृत्यू

    आज झालेल्या चाचण्या – 14,145

    एकूण रुग्ण संख्या – 472011

    एकूण बरं झालेले – 452341

    एकूण मृत्यू – 8822

  • 25 May 2021 07:43 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 1544 जणांना डिस्चार्ज, 765 नव्या रुग्णांची नोंद

    नाशिक कोरोना अपडेट

    दिवसभरात 1544 जणांना डिस्चार्ज

    आज रोजी पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 765

    नाशिक मनपा- 337 नवे रुग्ण

    नाशिक ग्रामीण- 411 नवे रुग्ण

    मालेगाव मनपा- 017 नवे रुग्ण

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4479

    आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यू -65

    नाशिक मनपा- 38 जणांचा मृत्यू

    मालेगाव मनपा- 03 जणांचा मृत्यू

    नाशिक ग्रामीण- 24 जणांचा मृत्यू

     

  • 25 May 2021 07:41 PM (IST)

    अकोल्यात आज दिवसभरात 163 नवे कोरोना पॉझिटिव्ह, 13 जणांचा मृत्यू

    अकोला कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 163 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात 13 जणांचा मृत्यू झाला

    आतापर्यंत 1028 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.  आतापर्यंत 47354 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

    तर सध्या 5875 रुग्ण उपचार घेत आहेत

    दिवसभरात 528 जण कोरोना मुक्त झाले.

  • 25 May 2021 07:40 PM (IST)

    भंडारा जिल्ह्यात आज 119 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, 169 जणांना डिस्चार्ज

    भंडारा : भंडारा जिल्ह्यात आज 119 कोरोना पॉझिटिव्ह

    जिल्ह्यात आज 169 रुग्णांना डिस्चार्ज

    जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 56143

    आज दिवसभरात 01 रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू

    आतापर्यंत कोरोनामुळे एकूण 1045 जणांचा मृत्यू

  • 25 May 2021 07:36 PM (IST)

    निकृष्ट व्हेंटिलेटर प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका, औरंगाबाद खंडपीठाची राजकारण्यांना तंबी

    औरंगाबाद : निकृष्ट व्हेंटिलेटर प्रकरणाला राजकीय वळण देऊ नका

    उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाची राजकारण्यांना तंबी

    तुम्ही व्हेंटिलेटरमधील तज्ज्ञ नाहीत, तुम्ही दर्जा ठरवू नका

    व्हेंटिलेटरबाबत न्यायालयाने राजकारण्यांना सुनावले खडे बोल

    घाटीतील 150 व्हेंटिलेटर खराब असल्याचा आघाडीतील नेत्यांचा होता आरोप

    कोरोनाप्रकरणी सुरू असलेल्या याचिकेत कोर्टाने सुनावले खडे बोल

    “तुम्ही तज्ज्ञ नाहीत,उगाच रुग्णांच्या जीवाशी खेळू नका”

    औरंगाबाद खंडपीठाचे खडे बोल

  • 25 May 2021 06:40 PM (IST)

    गोंदिया जिल्ह्यात दिवसभरात 111 कोरोनाबाधितांची नोंद

    गोंदिया जिल्हा कोरोना अपडेट

    आज वाढलेले रुग्ण – 111

    आज झालेले मृत्यू – 06

    आज बरे झालेले रुग्ण – 74

    एकूण रुग्ण – 40380

    एकूण मृत्यू – 675

    एकूण बरे झालेले रुग्ण – 39017

    एकूण उपचार घेत असलेले रुग्ण – 688

  • 25 May 2021 05:47 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात एकाच दिवशी दहा कोरोनाग्रस्तांचा मृत्यू

    वाशिम कोरोना अलर्ट

    जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    जिल्ह्यात आज 10 रुग्णांचा मृत्यू

    आज 335 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद

    तर आज 486 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 11 दिवसात 79 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 4132 कोरोना रुग्ण आढळले. तर या दरम्यान 5728 रुग्ण कोरोनामुक्त झाले.

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 38817

    सध्या सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या – 2854

    एकूण कोरोनामुक्त रुग्ण – 35527

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 435

  • 25 May 2021 05:02 PM (IST)

    म्युकरमायकोसिस संदर्भात पुणे जिल्हाधिकारी-खासगी हॉस्पिटल चालकांची बैठक 

    पुणे – म्युकरमायकोसिस संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावली खासगी हॉस्पिटल चालकांची बैठक

    – म्युकरमायकोसिसचे रुग्ण शोधण्यासाठी जिल्हा प्रशासन करणार डोअर टू डोअर सर्वेक्षण

    – म्युकरमायकोसिसचे बाहेरील 19 जिल्ह्याचे रुग्ण सध्या पुण्यात उपचार घेत आहेत

    – जिल्ह्यातील 53 हॉस्पिटलमध्ये 591 रुग्ण सध्या उपचार घेत आहेत

    – गेल्या पाच दिवसात जिल्ह्यात म्युकरमायकोसिससाठी 2860 इंजेक्शनचे वाटप

    – तर जिल्ह्यातील 207 रुग्णांनी आतापर्यंत महात्मा फुले योजनेचा लाभ घेतलाय

  • 25 May 2021 04:57 PM (IST)

    होम आयसोलेशन बंद करण्याचा निर्णय अव्यवहार्य, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची टीका 

    पुणे: पुण्यातील लाट ओसरत आहे. त्यामुळे होम आयसोलेशनचा बंद करणे हा निर्णय अव्यवहार्य

    पुणे माहपालिकेचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची टीका

    राज्य सरकारने पुणे शहरात रुग्णसंख्या कमी होत असताना असा निर्णय कसा घेतला ?

    राज्य सरकारने निर्णय घेतला असेल तर त्याचं आम्हाला पालन करावं लागेल

    फ्लॅट, बंगलो मोठ्या इमारतीत राहणारे लोक कोविड सेंटरमध्ये कसे राहतील ?

    त्यामुळे या निर्णयाचा फेरविचार करावा

    मुरलीधर मोहोळ यांची मागणी

  • 25 May 2021 04:07 PM (IST)

    राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद, पाहा संपूर्ण जिल्ह्यांची यादी

    मुंबई : राज्यात 18 जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद

    होम आयसोलेशन बंद केलेले जिल्हे

    बुलडाणा

    कोल्हापूर

    रत्नागिरी

    सांगली

    यवतमाळ

    अमरावती

    सिंधुदुर्ग

    सोलापूर

    अकोला

    सातारा

    वाशिम

    बीड

    गडचिरोली

    अहमदनगर

    उस्मानाबाद

    रायगड

    पुणे

    नागपूर

  • 25 May 2021 03:56 PM (IST)

    नाशिकमध्ये व्होकाहार्ट हॉस्पिटलने अवाजवी बील आकारल्याचा आरोप

    नाशिक – नाशिकच्या नामांकित व्होकाहार्ट हॉस्पिटलने अवाजवी बील आकारल्याने सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र भावे आक्रमक

    – हॉस्पिटलमध्ये कपडे काढून अर्धनग्न अवस्थेत केलं ठिय्या आंदोलन

    – व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल

    – विमा कंपनीकडून बील मिळूनही हॉस्पिटलने 1 लाख 50 हजार रुपये परत देण्यास दिला नकार

    – अवाजवी बील दिल्याचा जितेंद्र भावेंसह नातेवाईकांचा आरोप

  • 25 May 2021 03:40 PM (IST)

    परभणी जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 7 रुग्ण  

    परभणी : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे 7 रुग्ण

    रुग्णांवर जिल्हापरिषदेच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरु

    आयटीआय कोविड सेंटर तसेच जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

  • 25 May 2021 03:27 PM (IST)

    ठाणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण 65 रुग्ण 

    ठाणे : जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे एकूण 65 रुग्ण

    एकूण मृत्यू -8

    शासकीय रुग्णालयात 10 जणांवर उपचार सुरू

    इतर रुग्णांवर खासगी रुग्णालायात उपचार

  • 25 May 2021 03:16 PM (IST)

    सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार, महापालिका 2 दिवसात जागतिक निविदा काढणार

    सीरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार

    महापालिकेच्या मागणीला सीरमचा सकारात्मक प्रतिसाद

    मात्र लसीसाठी आवश्यक परवानगी केंद्राकडून आणावी

    सिरम इन्स्टिट्यूटचं महापालिकेला पत्र

    पुण्याला सिरममधून लस मिळावी यासाठी तीन आठवड्यापासून महापालिका करतेय पाठपुरावा

    आता केंद्र सरकार महापालिकेला परवानगी देणार का ?  याकडे लक्ष

    सीरमच्या पत्रानंतर महापालिकेने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना लिहिलं पत्र

    तर महापालिका दोन दिवसात जागतिक निविदा काढणार

  • 25 May 2021 02:46 PM (IST)

    सिरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार 

    पुणे –

    सिरम इन्स्टिट्यूट पुणे महापालिकेला लस देण्यास तयार

    महापालिकेच्या मागणीला सिरमचा सकारात्मक प्रतिसाद

    मात्र लसीसाठी आवश्यक परवानगी केंद्राकडून आणावी…

    सिरम इन्स्टिट्यूटच महापालिकेला पत्र

    पुण्याला सिरम मधून लस मिळावी यासाठी तीन आठवड्यापासून
    महापालिका करतेय पाठपुरावा

    आता केंद्र सरकार महापालिकेला परवानगी देते का ? याकडे लक्ष..

    सिरमच्या पत्रानंतर महापालिकेने केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन यांना लिहिलं पत्र…

    तर महापालिका दोन दिवसात जागतिक निविदा काढणार

  • 25 May 2021 02:20 PM (IST)

    पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसने आतापर्यंत 20 जणांचा बळी

    पुणे –

    पुणे जिल्ह्यात म्युकर मायकोसिसने आतापर्यंत 20 जणांचा बळी

    जिल्ह्यात एकूण ३५३ म्युकर मायकोसिस रुग्ण

    सर्वाधिक ११ मृत्यू पुणे शहर हद्दीत

    उपचारानंतर २१२ रुग्ण म्युकर मायकोसिसमधून बाहेर

    सध्या ११५ जणांवर उपचार सुरु

  • 25 May 2021 01:00 PM (IST)

    इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करतो, चंद्रकांत खैरे यांची इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका

    औरंगाबाद ब्रेकिंग :-

    लॉकडाऊन प्रकरणी चंद्रकांत खैरे यांची इम्तियाज जलील यांच्यावर सडकून टीका

    इम्तियाज जलील दादागिरी आणि ब्लॅकमेलिंगचे काम करतो

    इम्तियाज जलील दुकाने उघडायला आला तर शिवसैनिक उत्तर देतील

    लॉक डाऊन उघडलं तर तिसऱ्या लाटेचा धोका

    इम्तियाज जलीलवर प्रशासनाने तातडीने कारवाई करावी

    माजी खासदार चंद्रकांत खैरे यांची मागणी

  • 25 May 2021 12:19 PM (IST)

    नाशिकच्या खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी

    – नाशिकच्या खासगी रुग्णालयात लसीकरणाला परवानगी

    – नाशिकच्या 14 खासगी रुग्णालयात होणार कोरोनाचे लसीकरण

    – 18 वर्षीय पुढील नागरिकांना लसीकरणासाठी खासगी रुग्णालयाला मनपाची परवानगी

    – मुंबई पाठोपाठ आता नाशिकमध्ये होणार खासगी रुग्णालयात कोविड लसीकरण

    – रेडियन प्लस,साई सिद्धी,सुविचार,मयूर,सायखेडकर, सुश्रुषा, प्रसन्न ,मॅग्नम, गंगा ,साफल्य, नव संजीवनी ,नेम्स, मानवता कॅन्सर ,चिरंजीव ,कृष्णा ,बिरला ,अरिहंत,अंतरा, तुळशी ,सप्तशृंगी या 14 रुग्णालयात होणार लसीकरण

  • 25 May 2021 12:02 PM (IST)

    24 एप्रिल ते 24 मे एका महिन्यात पुणे जिल्ह्यातील रुग्णसंख्येत मोठी घट

    पुणे –

    – 24 एप्रिल ते 24 मे एका महिन्यात पुणे जिल्ह्यात मोठी रुग्णसंख्या घटतीय

    – महिनाभरात 2 लाख 12 हजार 531 वाढ

    – महिनाभरात 2 लाख 71 हजार 18 कोरोनामुक्त

    – महिनाभरात तब्बल 3 हजार 922 जण मृत्यूमुखी

    – महिनाभरात 10 लाख 31 हजार जणांच्या कोरोना चाचण्या

    – महिनाभरात सर्वाधिक 60 हजार 521 ऍक्टिव्ह रुग्ण घटले

  • 25 May 2021 10:13 AM (IST)

    देशात 24 तासात 1,96,427 नवे रुग्ण

    दिल्ली –

    देशात 24 तासात नवे रूग्ण – 1,96,427

    देशात 24 तासात मृत्यू – 3,511

    देशात 24 तासात डीस्चार्ज – 3,26,850

    एकूण रूग्ण – 2,69,48,874

    एकूण मृत्यू – 3,07,231

    एकूण डीस्चार्ज – 2,40,54,861

    एकूण एक्टीव्ह रूग्ण – 25,86,782

    आत्तापर्यंत लसीकरण झालेली संख्या -19,85,38,999

    केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

  • 25 May 2021 09:50 AM (IST)

    यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने हिरावले 41 मुलाचे आई-वडील

    यवतमाळ –

    यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाने हिरावले 41 मुलाचे आई-वडील

    जिल्हा आरोग्य यंत्रणेकडून या मुलांच्या संगोपनासाठी धावपळ

    जिल्ह्यात 24 मुले आणि 17 मुलीचे आई वडील हिरावले

    या बालकांना संगोपनासाठी दरमहा 1100 रु मदत दिली जाणार

  • 25 May 2021 09:49 AM (IST)

    सांगलीत रुग्णाची माहिती लपवल्यास वैद्यकीय परवाना रद्द

    सांगली –

    रुग्णाची माहिती लपवल्यास वैद्यकीय परवाना रद्द

    जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डूडी याचा

    ग्रामीण भागातील डॉक्टरांना दिला इशारा

    ग्रामीण भागात कोरोना रुग्णाची होत आहे झपाट्याने वाढ
    जिल्हा आरोग्य विभागाने केला सर्व्हे

    ग्रामीण भागात खाजगी रुग्णालयात उपचार घेऊन लोक तपासणी न करता अंगावर काढत आहेत आजार

    ही गंभीर बाब सर्व्हे दरम्यान आली लक्षात

    त्यामुळे ग्रामीण भागात रुग्णची होत आहे वाढ

  • 25 May 2021 09:48 AM (IST)

    बारामतीत कोरोना बाधितांची संख्या होतेय कमी

    बारामती –

    – बारामतीत कोरोना बाधितांची संख्या होतेय कमी

    – काल दिवसभरात १७२ जणांना कोरोनाची लागण

    – ९०९ जणांची झाली होती काल तपासणी

    – बारामतीत कोरोना बाधितांची संख्या घटू लागल्याने नागरीकांना दिलासा

  • 25 May 2021 08:53 AM (IST)

    वर्षभरात कोरोना नियमांच उल्लंघन करणाऱ्या पुणेकरांकडून तब्बल 29 कोटीचा दंड वसूल

    वर्षभरात कोरोना नियमांच उल्लंघन करणाऱ्या पुणेकरांकडून तब्बल 29 कोटीचा दंड वसूल,.

    वर्षभरात 6 लाख 97 हजार 97 जणांवर केली दंंडात्मक कारवाई

    तर मे महिन्यात 20 दिवसात वसूल केले 5 कोटी 8 लाख रुपये,

    लॉकडाऊनच्या काळात संचारबंदी असताना नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी ही आतापर्यंत कारवाई करण्यात आलीये,

    अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर पडल्यास कारवाई करण्यात येतीये,

    ग्रामीण भागातही 1 कोटी 83 लाख 72 हजाराचा दंड वसूल करण्यात आलाय,

    पुण्यातील दंडाची रक्कम ही 29 कोटी 73 लाख 80 हजार 220 रुपयांवर गेलीये

  • 25 May 2021 08:37 AM (IST)

    पुणेकरांना लस द्यायला सिरम इन्स्टिट्यूट तयार मात्र महापालिकेला केंद्राची परवानगी लागणार

    पुणे

    पुणेकरांना लस द्यायला सिरम इन्स्टिट्यूट तयार मात्र महापालिकेला केंद्राची परवानगी लागणार,

    सिरम इन्स्टिट्यूटनं महापालिकेला पाठवलं पत्र,

    गेल्या आठवड्यात महापालिकेनं पुण्याला सिरम इन्स्टिट्यूटनं लस देण्याची केली होती मागणी,

    त्यावर सिरम इन्स्टिट्यूटनं उत्तर दिलंय, केंद्रीची परवानगी मिळाल्यास निश्चित लस देऊ,

    महापालिकेनं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना परवानगी मागितली असल्याची माहिती ,

    महापालिका येत्या दोन दिवसात काढणार लसीसाठी ग्लोबल टेंडर,

    मात्र पुणेकरांना लस द्यायला सिरम इन्स्टिट्यूट तयार,गेल्या आठवड्यात महापौर आणि आयुक्त विक्रम कुमारांनी सिरम इन्स्टिट्यूटला दिली होती भेट

  • 25 May 2021 08:36 AM (IST)

    सोलापुरात 92 वर्षाच्या आजीने केली कोरोनावर मात

    सोलापुरात 92 वर्षाच्या आजीने केली कोरोनावर मात

    लक्ष्‍मीबाई दत्‍ता भोसले असे कोरोनावर मात केलेल्या 92 वर्षीय आजीचे नाव

    सोलापुरातील सलगर वस्ती येथील भोसले कुटुंबीयांनी  घरी रांगोळी काढून केक कापून केले  आजीचे स्वागत

  • 25 May 2021 08:35 AM (IST)

    एक जुननंतर लॉकडाऊनला एमआयएमचा विरोध

    औरंगाबाद –

    एक जुननंतर लॉकडाऊनला एमआयएमचा विरोध

    एक जुननंतर दुकाने उघडण्याचा इम्तियाज जलील यांनी दिला ईशारा

    प्रशासनाने कितीही कडक भूमिका घेतली तर आम्ही दुकाने उघडणारच

    औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी घेतली स्पष्ट भूमिका

    प्रशासनाचे आदेश झुगारून उघडी करणार दुकाने

    इम्तियाज जलील यांच्या कडक भूमिकेमुळे प्रशासनाची वाढली चिंता

  • 25 May 2021 07:04 AM (IST)

    पुणे जिल्ह्यात सुमारे 25 लाख 25 हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस

    पुणे :

    जिल्ह्यात सुमारे २५ लाख २५ हजार नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लस

    त्यामध्ये पुणे शहरात सुमारे साडेनऊ लाख, पिंपरी चिंचवड पावणेपाच लाख आणि ग्रामीण भागातील अकरा लाख नागरिकांचा समावेश

    जिल्ह्यात ३८ टक्के नागरिकांना लसीचा पहिला डोस तर, ११ टक्के नागरिकांना दोन्ही डोस मिळाले

    जिल्ह्यातील ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ नागरिकांचे ८० टक्के लसीकरण

    लशीच्या तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटातील केवळ ५० हजार नागरिकांना पहिला डोस

  • 25 May 2021 07:04 AM (IST)

    ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा प्रशासनाचा ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार

    पुणे :

    ऑक्सिजन तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाचा ऑक्सिजन निर्मितीसाठी पुढाकार

    यासाठी जिल्ह्यात 49 ऑक्सिजन प्लांट प्रस्तावित

    49 पैकी 8 प्लांटचे काम पूर्ण देखील झाले आहे. यामुळे सध्या 30 हजार 93 एलपीएमने ऑक्सिजन क्षमता वाढली

    ससूनमध्येही एक ऑक्सिजन प्लॅन्ट वाढविण्यात येणार असून, क्षमता दुपट्टीने वाढविण्यात येणार

    तर सध्या 41 ऑक्सिजन प्लॅन्टचे काम प्रगतिपथावर आहे.

  • 25 May 2021 07:02 AM (IST)

    पुणे जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची शोधमोहीम सुरु

    पुणे :

    जिल्ह्यातील म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची शोधमोहीम सुरु

    कोरोनाच्या अनुषंगाने म्युकरमायकोसिस आजाराचे सर्वेक्षण, प्रतिबंध, उपचार व नियंत्रणाबाबत जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आदेश

    रुग्णांची वेळेत माहिती मिळण्यासाठी ग्रामीण भागातील सर्व आरोग्य यंत्रणेला 27 मेपर्यंत जलद सर्वेक्षणाची एक फेरी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश

    तर जिल्ह्यातील 15 एप्रिलनंतर कोरोना उपचार घेऊन घरी आलेल्यांची यादी तयार करण्यात येणार

  • 25 May 2021 07:01 AM (IST)

    कोरोना रुग्णांना घरी सोडण्यापूर्वी त्यांची संपूर्ण तपासणी करण्याच्या सूचना

    पुणे :

    कोरोनाचा उपचार करताना प्राणवायूचा वापर, स्टिरॉईड औषधे आणि मधुमेह अशी एकत्रित पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांना घरी सोडण्यापूर्वी त्यांची संपूर्ण तपासणी करण्याच्या सूचना

    राज्याचे तांत्रिक सल्लागार डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिल्या सूचना

    म्युकोरमायकोसिस रुग्णांची वाढती संख्या पाहता लवकर निदान आणि उपचारांसाठी रुग्णालयांना देण्यात आल्या या सूचना

  • 25 May 2021 06:59 AM (IST)

    कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न, 1098 मदत क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

    पुणे

    कोरोना संसर्गामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या संगोपनाचा प्रश्न

    अशा बालकांची माहिती नागरिकांनी 1098 मदत क्रमांकावर देण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांचे आवाहन

    कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसंबंधी सुरक्षिततेबाबत आणि संबंधित बालकांना त्यांचे न्याय्य हक्क मिळवून देऊन त्यांचे संगोपन व उपाययोजना करण्यासाठी जिल्हास्तरावर कृतिदलाची स्थापना