Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह एकाचाही मृत्यू नाही

| Updated on: Jun 28, 2021 | 12:18 AM

काल दिवसभरात राज्यात 9 हजार 812 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 8 हजार 752 जणांनी कोरोनावर मात केलीय. 179 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 1 लाख 30 हजार 527 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi

Maharashtra Coronavirus LIVE Update : अकोल्यात आज दिवसभरात 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह एकाचाही मृत्यू नाही
CORONA
Follow us on

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 9 हजार 812 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहे. तर 8 हजार 752 जणांनी कोरोनावर मात केलीय. 179 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहिली तर 1 लाख 30 हजार 527 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi 27 June 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus Corona variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 27 Jun 2021 07:16 PM (IST)

    अकोल्यात आज दिवसभरात 5 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह एकाचाही मृत्यू नाही

    अकोला  कोरोना अपडेट

    अकोल्यात आज दिवसभरात 5 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही

    आतापर्यंत 1126 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 57568 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    तर सध्या 422 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 16 जण कोरोनामुक्त झाले आहेत

  • 27 Jun 2021 07:15 PM (IST)

    सोलापूर शहरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी

    सोलापूर –सोलापूर शहरात संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी

    त्यानंतर शहरात राहणार संचारबंदी

    शासनाच्या नव्या आदेशानुसार पालिका आयुक्तांचे आदेश

    उद्यापासून होणार अंमलबजावणी

    पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांचे आदेश


  • 27 Jun 2021 07:14 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात 31 नवे कोरोना रुग्ण, एकाचा मृत्यू

    उस्मानाबाद – जिल्ह्यात आज कोरोनाचे 31 नवीन रुग्ण तर 1 रुग्णाचा  मृत्यू

    जिल्ह्यात आता केवळ 681 सक्रिय रुग्ण

    आजवर 58 हजार 196 पैकी 56 हजार 142 रुग्ण उपचारनंतर बरे , 96.47 % रिकव्हरी दर

    आजवर 1 हजार 373 मृत्यू , मृत्यूदर 2.35 %

  • 27 Jun 2021 07:13 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 274 पॉझिटिव्ह कोरोना रुग्णांची वाढ 

    पुणे कोरोना अपडेट

    दिवसभरात 274 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – दिवसभरात 257  रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधीत 17 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 11

    -296 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 478584

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2419

    – एकूण मृत्यू -8571

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज  466594

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 5271

  • 27 Jun 2021 05:29 PM (IST)

    नागपुरात कोरोनाच्या नव्या 22 रुग्णांची नोंद, एकाचाही मृत्यू नाही

    नागपूर कोरोना अपडेट

    नागपुरात आज कोरोनामुळे शून्य मृत्यू

    22 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    तर 69 जणांनी केली कोरोनावर मात

    एकूण रुग्णसंख्या – 476984

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 467533

    एकूण मृत्यूसंख्या – 9025

  • 27 Jun 2021 05:01 PM (IST)

    गडचिरोली जिल्हयात स्टेज 3 नुसार नवीन आदेश जारी

    गडचिरोली जिल्हयात स्टेज 3 नुसार नवीन आदेश जारी

    उद्यापासून दुकाने दुपारी 4  वाजेपर्यंतच सुरु, सार्वजनिक कार्यक्रमांच्या उपस्थितीवरही मर्यादा

    शासनाने राज्यात निर्बंध लागू केल्यानंतर जिल्हयातही स्टेज 3 नूसार कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनेंतर्गत उद्या  28 जून पासून निर्बंध लागू करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी दीपक सिंगला यांनी याबाबत लेखी आदेश आज जारी केले आहेत

    .यामध्ये सर्व प्रकारच्या खाजगी आस्थापनांसह दुकाने, हॉटेल सकाळी 7 ते दुपारी4  वा.पर्यंत सुरू ठेवता येतील.

    अत्यावश्यक सेवा, कृषि विषयक सेवा दुकाने संपुर्ण आठवडाबर सुरू राहतील तर उर्वरित सर्व दुकाने शनिवार व रविवारी बंद असतील.

    याच बरोबर सार्वजनिक कार्यक्रम व लग्न समारंभाकरीता फक्त 50  लोकांच्या उपस्थितीला मंजुरी असेल.

    शाळा महाविद्यालये पुढील आदेशापर्यंत विद्यार्थ्यांच्या उपस्थितीसह सुरू करण्यास मनाई करण्यात आली आहे.

    रेस्टॉरंट , उपहारगृह सोमवार ते शुक्रवार चे सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50 % डायनिंग क्षमतेसह सुरू ठेवण्याची मुभा असेल.

    खाजगी/शासकीय कार्यालयातील उपस्थिती- 50% उपस्थितीसह सुरु ठेवता येईल.

  • 27 Jun 2021 12:46 PM (IST)

    पुण्यातील 13 तालुक्‍यांत एकूण 91 हॉटस्पॉट गावे

    पुणे –

    – ग्रामीण भागात अद्यापही करोना संसर्ग आटोक्‍यात येत नसून, पंधरा दिवसांपूर्वी कमी झालेली हॉटस्पॉट संख्येत 7 ने वाढली,

    – सध्या 13 तालुक्‍यांत एकूण 91 हॉटस्पॉट गावे आहेत.

    – त्यामध्ये खेड, जुन्नर आणि पुरंदर तालुक्‍यात सर्वाधिक हॉटस्पॉट संख्या आहे,

    – ज्या गावात दहापेक्षा जास्त करोना बाधित संख्या आहे, ते गाव हॉटस्पॉट म्हणून जाहीर केले जाते,

    – मागील बारा दिवसांपूर्वी हॉटस्पॉट गावांची संख्या 84 इतकी होती. आज ही संख्या 91 वर पोहचली,

    – यामध्ये खेड तालुक्‍यात 4 ने हॉटस्पॉट गावांची संख्या वाढली आहे. जुन्नरमध्ये आणि पुरंदरमध्येही प्रत्येकी 5 ने वाढ झाली आहे.

    – तर मावळ, हवेली, शिरूर, वेल्हा तालुक्‍यात हॉटस्पॉट संख्येत घट झाल्याचे दिसून येते.

  • 27 Jun 2021 12:21 PM (IST)

    नाशिक शहरात कोरोना काळात तब्बल 69 मुली घर सोडून गेल्याची धक्कादायक नोंद

    – नाशिक शहरात कोरोना काळात तब्बल 69 मुली घर सोडून गेल्याची धक्कादायक नोंद

    – यात सर्व 18 वर्षा खालील मुलींची नोंद

    – ऑनलाइन शिक्षणामुळे मुला मुलींच्या हातात आलेला स्मार्टफोन ठरला कारणीभूत

    – प्रेम प्रकरण,वेगवेगळ्या भूलथापाना बळी पडत मुलींनी सोडलं घर

    – मागील वर्षात 37 तर या वर्षात 17 मुलींना आपल्या घरी पाठवण्यात पोलिसांना यश

  • 27 Jun 2021 10:57 AM (IST)

    औरंगाबादेत सुट्टीच्या दिवशी लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी

    औरंगाबाद –

    औरंगाबादेत सुट्टीच्या दिवशी लसीकरण केंद्रावर तुफान गर्दी

    लस घेण्यासाठी नागरिकांची उडाली झुंबड

    सर्वच वयोगटातील नागरिकांनी केली गर्दी

    औरंगाबाद शहरातील सर्वच लसीकरण केंद्रे झाले फुल्ल

    लसीकरण करताना कर्मचाऱ्यांची होतेय तारांबळ

  • 27 Jun 2021 10:13 AM (IST)

    गेल्या 24 तासात भारतात 50 हजार 40 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

    गेल्या 24 तासात भारतात 50 हजार 40 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे

    तर 1 हजार 258 रुग्णांना प्राण गमवावे लागले

    कालच्या दिवसात देशात 57 हजार 944 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

  • 27 Jun 2021 08:49 AM (IST)

    नाशकात सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र राहणार बंद

    नाशिक –

    – आज शहरातील सर्व कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र राहणार बंद
    – रविवार असल्याने राहणार बंद
    – मनपा आरोग्य विभागाची माहिती
    – लसीकरण केंद्रावर गर्दी न करण्याच आवाहन

  • 27 Jun 2021 08:48 AM (IST)

    आठवडा भरातच नाशकातील मॉल्सला पुन्हा टाळे

    – आठवडा भरातच नाशकात मॉल्सला पुन्हा टाळे
    – कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाचा निर्णय
    – विकेंड विवाह सोहळे ही रद्द
    – 3 आणि 4 जुलैला विवाह सोहळ्याना परवानगी,फक्त 50 लोकांच्या उपस्थिती मध्यच करता येणार विवाह सोहळा
    – डेल्टाचा धोका लक्षात घेता जिल्हा आरोग्य विभाग हायलर्टवर

  • 27 Jun 2021 07:57 AM (IST)

    सोलापूर शहरात आज कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार नाही

    सोलापूर– आज शहरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण होणार नाही

    लसीचा साठा न आल्याने लसीकरण केंद्रावर लसीकरण होणार नाही

    लसीचा साठा उपलब्ध झाल्यानंतर पालिका प्रशासनाकडून नागरिकांना दिली जाणार माहिती

  • 27 Jun 2021 07:57 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद

    – नाशिक जिल्ह्यात लसीकरणाला चांगला प्रतिसाद
    – आतापर्यंत 13 लाख नागरिकांचे लसीकरण झाले पूर्ण
    – त्यात 10 लाख 59 हजार 103 जनांचा पहिला डोस तर 2 लाख 57 हजार 782 जणांचा दुसरा डोस पूर्ण
    – तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता लसीकरण मोहिमेला वेग
    – नागरिकांमध्ये ही चांगली जनजागृती
    – ग्रामीण भागात ही चांगला प्रतिसाद

  • 27 Jun 2021 07:55 AM (IST)

    सिरम इन्स्टिट्यूट आणि अमेरिकन औषध कंपनीने तयार केलेल्या नोव्होव्हँक्स लसीच्या चाचणीला होणार लवकरच सुरुवात

    तिसऱ्या लाटेआधीच लहान मुलांसाठी दिलासादायक बातमी

    पुण्यात सिरम इन्स्टिट्यूट आणि अमेरिकन औषध कंपनी यांनी तयार केलेल्या नोव्होव्हँक्स या लसीच्या चाचणीला होणार लवकरच सुरुवात,

    पुण्यातील भारती विद्यापीठ आणि केईएम हॉस्पिटलमध्ये लहान मुलांवर होणार चाचणी,

    2 ते 11 आणि 12 ते 17 या दोन वयोगटातील 920 लहान मुलांवर होणार चाचणी,

    जूलैमध्ये चाचणीला होणार सुरुवात,

    पहिल्या टप्प्यात 12 ते 17 या वयोगटातील मुलांना लस दिली जाईल,

    आणि देशात 10 ठिकाणी सिरमच्या नोव्होव्हँक्स या कंपनीला क्लीनीकल ट्रायल साठी परवानगी देण्यात आलीये

  • 27 Jun 2021 07:53 AM (IST)

    सोलापुरात रेमडिसिव्हीर इंजेक्शन आता खुल्या बाजारात मिळणार

    सोलापूर –

    रेमडिसिव्हीर इंजेक्शन आता खुल्या बाजारात मिळणार

    कोरोनाबाधीतांची संख्या कमी झाल्याने आणि रेमडिसिव्हर इलेक्शनच्या साठा  आता मुबलक

    त्यामुळे रेमडिसिव्हर  इंजेक्शन बरोबरच इतर तत्सम औषधे आजपासून खुल्या बाजारात उपलब्ध

    शासनाच्या निर्देशानुसार 11 एप्रिलपासून रेमडिसिव्हर इंजेक्शनचे वितरण जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात मार्फत होते सुरू

    रुग्णालयांना अथवा रुग्णांना औषधाची गरज भासेल त्यांनी घाऊक  किंवा किरकोळ औषध विक्रेत्यांशी संपर्क साधण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

  • 27 Jun 2021 07:53 AM (IST)

    सोलापूर शहरात कोरोनाची स्थिती आटोक्यात, मात्र नव्या निर्बंधाबाबत आज होणार निर्णय

    सोलापूर –

    शहरात कोरोनाची स्थिती आटोक्यात

    मात्र नव्या निर्बंधाबाबत आज होणार निर्णय

    शहरातील कोरोना प्रादुर्भावाचा जून महिन्यातील दर 0.31 तव 1.17 राहिल्यामुळे शहर दुसऱ्या टप्प्यात कायम

    मात्र राज्यातील काही जिल्ह्यातील परिस्थिती आटोक्यात येत नाही

    त्यामुळे तिसऱ्या लाटाची शक्यता गृहीत धरून राज्य सरकारने तिसरा टप्पा लागू करण्याचे केले आहे सूतोवाच

    शासनाच्या नव्या आदेशानुसार शहर व ग्रामीण भागातील स्थिती काय आहे याचा जिल्हाधिकारी घेणार आढावा

    आढाव्यानंतर सोलापूर शहराचा समावेश दुसऱ्या टप्प्यात राहणार की तिसऱ्या टप्प्यात राहणार याचा होणार निर्णय

  • 27 Jun 2021 07:52 AM (IST)

    महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या  प्रभावामुळे कर्नाटक सीमेवर तपासणी

    सोलापूर – महाराष्ट्रातील कोरोनाच्या वाढत्या  प्रभावामुळे कर्नाटक सीमेवर तपासणी

    महाराष्ट्रातील कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या प्रवाश्यांची आंतरराज्य सीमेवर कडक तपासणी

    महाराष्ट्रात कमी होत असलेला कोरोनाचा प्रभाव पुन्हा वाढत असल्याचे दिसत असल्याने पुन्हा आंतरराज्य सीमेवर तपासणी

    कोरोना निगेटिव्ह असल्याशिवाय करून कर्नाटकातील कलबुर्गी जिल्ह्यात प्रवेश नाही

  • 27 Jun 2021 07:14 AM (IST)

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी अहमदनगरला उद्यापासून नवीन नियमावली लागू

    अहमदनगर

    कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी अहमदनगरला उद्यापासून नवीन नियमावली लागू

    जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी काढला आदेश

    नगर जिल्हा कारोना संसर्गाच्या तिसऱ्या लेवलमध्ये असून त्यानूसार उद्यापासून नवीन निर्बंध जिल्ह्यात लागू होणार

    शनिवारी आणि रविवारी मेडिकल वगळता सर्व बंद राहणार

    तर इतर दिवशी सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सर्व आस्थापना आणि दुकाने सुरू राहणार

    अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने दुपारी ४ वाजेपर्यंत खुली

    – सायंकाळी ५ नंतर संचारबंदी लागू, त्या आधी दिवसभर जमावबंदी

    – विवाहासाठी ५० तर अंत्यविधीसाठी २० जण उपस्थित राहू शकणार

    – हॉटेल ५० टक्के क्षमतेने

    सार्वजनिक वाहतूक १०० टक्के सुरू

    – शनिवार व रविवार सर्व बंद

  • 27 Jun 2021 06:42 AM (IST)

    नागपूर शहरात कालच्या दिवसभरात तब्बल 30 हजार 313 नागरिकांचं लसीकरण

    नागपूर :

    नागपूर शहर आणि जिल्हयात 47,184 नागरिकांचे लसीकरण पूर्ण

    काल नागपूर शहरात रेकॉर्ड ब्रेक 30,313 जणांचे लसीकरण

    मनपा आणि शासकीय केंद्रावर 28,012 जणांचं लसीकरण

    खाजगी केंद्रांवर 2,301 जणांचं झालं लसीकरण

  • 27 Jun 2021 06:41 AM (IST)

    राज्यात कालच्या दिवसभरात 9 हजार 812 नवे कोरोनाबाधित, 179 रुग्णांचा मृत्यू

    राज्यात कालच्या दिवसभरात 9 हजार 812 नवे कोरोनाबाधित रुग्ण, दिवसभरात 8 हजार 752 रुग्णांची कोरोनावर मात तर 179 रुग्णांचा मृत्यू