महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE
भिवंडीमध्ये रुग्णालयात 80 टक्के बेड रिकामे ,रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.28 तर रुग्ण दुपट्टीचा कालावधी 335 दिवस
राज्यात आज 21,273 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 34,370 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 52,76,203 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 3,01,041 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 93.02% झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
उस्मानाबाद कोरोना अपडेट :
उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 356 रुग्ण व 08 मृत्यू तर 543 जणांना डिस्चार्ज
उस्मानाबाद तालुका 62, तुळजापूर 55,उमरगा 44, लोहारा 50, कळंब 28, वाशी 31, भूम 41 व परंडा 45 रुग्ण
1 मे – 667 रुग्ण – 19 मृत्यू
2 मे – 486 रुग्ण – 09 मृत्यू
3 मे – 814 रुग्ण – 13 मृत्यू
4 मे – 786 रुग्ण – 11 मृत्यू
5 मे – 783 रुग्ण – 07 मृत्यू
6 मे – 813 रुग्ण – 24 मृत्यू
7 मे – 660 रुग्ण – 08 मृत्यू
8 मे – 628 रुग्ण – 11 मृत्यू
9 मे – 712 रुग्ण – 08 मृत्यू
10 मे – 833 रुग्ण – 14 मृत्यू
11 मे – 676 रुग्ण – 11 मृत्यू
12 मे – 569 रुग्ण – 13 मृत्यू
13 मे – 623 रुग्ण – 08 मृत्यू
14 मे – 458 रुग्ण – 15 मृत्यू
15 मे – 607 रुग्ण – 12 मृत्यू
16 मे – 492 रुग्ण – 09 मृत्यू
17 मे – 547 रुग्ण – 07 मृत्यू
18 मे – 400 रुग्ण – 11 मृत्यू
19 मे – 449 रुग्ण – 08 मृत्यू
20 मे – 534 रुग्ण – 11 मृत्यू
21 मे – 514 रुग्ण – 08 मृत्यू
22 मे – 577 रुग्ण – 11 मृत्यू
23 मे – 392 रुग्ण – 12 मृत्यू
24 मे – 406 रुग्ण – 06 मृत्यू
25 मे – 409 रुग्ण – 08 मृत्यू
26 मे – 306 रुग्ण – 05 मृत्यू
27 मे – 356 रुग्ण – 08 मृत्यू
उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 3909 सक्रिय रुग्ण
उस्मानाबाद – 2 लाख 91 हजार 902 नमुने तपासले त्यापैकी 53 हजार 846 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 18.44 टक्के
48 हजार 728 रुग्ण बरे 90.49 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर
रुग्णांचा मृत्यू 1209 तर 2.24 टक्के मृत्यू दर
सांगली कोरोना / म्युकर अपडेट –
जिल्ह्यात आज दिवसभरात 1010 कोरोना रुग्ण
म्युकर मायकोसीस – एकूण रुग्ण 110, आज 2 रुग्णांचा मृत्यू
जिल्ह्यात आज कोरोनामुळे 35 रुग्णाचा मृत्यू
जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3301 वर
ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 12789 वर
तर उपचार घेणारे 1062 जण आज कोरोना मुक्त
आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 98128 वर
जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 114218 वर
नाशिक कोरोना अपडेट :
आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 1117
आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 728
नाशिक मनपा- 325
नाशिक ग्रामीण- 397
मालेगाव मनपा- 06
जिल्हा बाह्य- 00
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4550
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -36
नाशिक मनपा- 20
मालेगाव मनपा- 00
नाशिक ग्रामीण- 16
जिल्हा बाह्य- 00
नवी मुंबई कोरोना अपडेट :
करोनाबाधितांचा आकडा कमी झाल्याने नवी मुंबईकरांना दिलासा
नवी मुंबईत आज 95 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह
आज 127 रुग्ण बरे होऊन घरी परतले
तर आज 6 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
दिवसाला चार आकडी संख्येत मिळणाऱ्या रुग्णांची संख्या सद्यस्थितीमध्ये दोन आकडी संख्येवर
मागील तीन महिन्यांतील ही दुसऱ्यांदा सर्वात कमी रुग्णसंख्या
सद्यस्थितीत उपचाराधीन रुग्णांची संख्या दोन हजारांपेक्षा कमी
पुणे :
-महापालिकेचा आता ‘व्हॅक्सीन ऑन व्हिल्स’ उपक्रम !
– महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते लोकार्पण
– पुणे महापालिककेला ‘जिव्हीका हेल्थकेअर’ आणि ‘माय व्हॅक्सीन’ची साथ
– लसीकरणासाठी पहिल्या टप्प्यात ५ मोबाईल व्हॅन उपलब्ध
-शहरातील १५ क्षेत्रीय कार्यालयांसाठी ५ मोबाईल व्हॅन उपलब्ध
–व्हॅनमध्ये असेल १ डॉक्टर, २ परिचारिका, १ आरोग्य नोंदणी सहायक, १ आरोग्य समाजसेवक, १ चालक आणि एईएफआय किटसह १ रुग्णवाहिका
येवला : कोरोनाबाधित 19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह
आतापर्यंत 224 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
येवल्यातील 5203 कोरोन बधितांची एकूण संख्या पोहचली
कोरोनावर 4899 जणांनी कोरोनावर मात करत केली घरवापसी
उर्वरित 80 जण उपचार घेत आहे
आज डिस्चार्ज – 27
नागपूर :
नागपुरात आज 476 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
1151 जणांनी केली कोरोनावर मात
तर 16 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
एकूण रुग्ण संख्या – 473172
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 455246
एकूण मृत्यू संख्या – 8854
पुणे :
– दिवसभरात ५८८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात ९२१ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत ३३ रुग्णांचा मृत्यू. त्यातील ११ मृत्यू पुण्याबाहेरील.
– ९९६ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६८१२९.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ७९९०.
– एकूण मृत्यू -८१४८.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४५१९९१.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८१९३.
जालना :
जालना जिल्ह्यात आज 85 कोरोनाच्या रुग्णांची नोंद.
कोरोनामुळे 3 नागरिकांचा मृत्यू
जालना जिल्ह्यात आज सर्वात कमी पॉझिटिव्ह रुग्णाची नोंद तर मृत्यूही घटले
जिल्ह्यात आज नवे आढळले 347 रुग्ण…
तर आज 312 जणांना देण्यात आला डिस्चार्ज…
तसेच 06 रुग्णांचा झाला मृत्यू …
जिल्ह्यात 15 मे नंतर मागील 13 दिवसात 89 रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे 4793 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 6440 रुग्ण कोरोनामुक्त झालेत…
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 39478
सद्यस्थितीत ऍक्टिव्ह रुग्ण – 2783
आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 36249
आतापर्यंत एकूण मृत्यू – 445
पुणे :
राज्यातील चित्रपटगृह आणि नाट्यगृह 50 टक्के क्षमतेनं सुरू करण्याची राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभाग सेलची मागणी,
राज्याचे मुख्यमंत्री उद्वव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुखांना लिहीलं पत्र,
कलाकारांवर उपासमारीची वेळ आलीये, 50 टक्के क्षमतेनं कार्यक्रमांना परवानगी दिल्यास कलाकारांवर उपासमारीची वेळ येणार नाही
कलाकार कोरोनाचे नियम पाळायला तयार ,अनेक शहरात संसर्ग कमी झालाय परवानगी देण्याची मागणी,
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाबासाहेब पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी ….
औरंगाबाद शहरातील नंदलाल धुत रुग्णालयात दीड लाख रुपयांसाठी कोरोना रुग्णाचा मृतदेह तब्बल आठ तास रोखून धारल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालयात धाव घेऊन प्रशासनाला धारेवर धरल्यानंतर आणि मृतदेह जर दिला नाही तर रुग्णलाय फोडून टाकण्याची धमकी दिल्यानंतर रुग्णालयाने कोरोना रुग्णाचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. राजीव जावळीकर आणि मंगेश साळवे या दोन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी रुग्णालय प्रशासनाला धारेवर धरले होते
कोरोना लसीकरणावरील केंद्र सरकारचं स्पष्टीकरण
लसीकरण मोहीमेबद्दलच्या खोट्या माहितीवर स्पष्टीकरण
सात प्रश्नांच्या माध्यामातून उत्तर देत दिलं स्पष्टीकरण
निती आयोग आणि केंद्रीय आरोग्य मंत्रलयाचं स्पष्टीकरण
केद्र सरकारकडून परदेशी कंपन्याशी बोलणं सुरू आहे – केंद्र सरकार
परदेशी कंपन्यानाचे आपले काही कमिटंमेंटस – केंद्र सरकार
परदेशातील आरोग्य नियंत्रणकांनी परवानग्या दिलेल्या लसीकरणाला भारतातही आपात्कालीन वापरासाठी परवानगी – केंद्र सरकार
केद्र सरकारकडून राज्यांना योग्य प्रमाणात लस दिली जात आहे – केद्र सरकार
लहान मुलांवरील कोरोना लसीची चाचणी सुरू त्यानंतरचं लहान मुलांना लस देता येणार – केंद्र सरकार
सांगली –
इस्लामपूर येथील प्रकाश कोव्हिड हॉस्पिटलमधील डॉक्टर संपावर
काम बंदकरून डॉक्टर व नर्सिंग स्टाफचे कोरोना रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू
हॉस्पिटलच्या डॉक्टरांसह 5 जणांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा निषेधार्थ सुरू केले आंदोलन
प्रशासनाकडून चुकीची पद्धतीने कारवाई झाल्याचा करण्यात आला आहे आरोप
कोल्हापूर
चंद्रकांत पाटील –
कोव्हिडसाठी सरकार रोज एक निर्णय घेत आहे, काय करायचं त्यांना कळतं नाहीये
होमक्वॉरंटाईनचा निर्णय अवघ्या काही वेळात बदलला
धरसोड वृत्तीच हे सरकार आहे
गेल्या 24 तासात भारतात 2 लाख 11 हजार 298 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे
तर 3 हजार 847 रुग्णांना प्राण गमवावे लागले
कालच्या दिवसात देशात 2 लाख 83 हजार 135 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले
सोलापूर – लॉकडाऊनमुळे बुकिंग झालेले पंधराशे विवाह रद्द
एप्रिल मे मध्ये 3500 पेक्षा होते जास्त होते लग्न
तर पंधराशे लग्नासाठी मंगल कार्यालयात आले होते बुकिंग
मंगल कार्यालयातील बुकिंग यामुळे लॉकडाऊनमुळे रद्द
सोलापूर –
महापालिकेत शव आणि रुग्णवाहिका खरेदी दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्याचे निलंबन
औषध भांडार विभागातील तत्कालीन मिश्रक प्रदीप वेदपाठक यांच्याकडे होती खरेदीची जबाबदारी
शहरातील रुग्णांनी आण करण्यासाठी रुग्णवाहिका तर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शेवाई का खरेदी करण्याचा होता प्रस्ताव
याची जबाबदारी महापालिका औषध भंडार विभागातील मिश्रक प्रदीप वेदपाठक यांच्याकडे
मात्र प्रदीप वेदपाठक यांनी दिरंगाई केल्याचा ठपका
पालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केले निलंबित
पिंपरी चिंचवड
-पिंपरी चिंचवड मध्ये वारंवार विनंती करून ही नागरिक नियमांचे उल्लंघन करत असल्याचे पुन्हा एकदा समोर
-शहराच्या उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या आणि आय टी कर्मचाऱ्यांची वस्ती असलेल्या पिंपळे सौदागर भागात पोलिसांनी सायंकाळी अचानक कारवाई करत 41 जणांकडून 32 हजार रुपये दंड वसूल केला आहे
-पिंपळे सौदागर मधल्या ओपन गार्डन मध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक फिरण्यासाठी बाहेर पडल्याचे समोर आलंय
-उच्चभ्रू वस्तीतील उच्च शिक्षित नागरिकच नियम पायदळी तुडवत असल्याने कोरोना चे नागरिकांना खरेच गंभीर्य आहे का असा प्रश्न या निमित्ताने उपस्तिथ
पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी
पुणे शहरात दहा दिवसांत चार हजार खाटा झाल्या रिकाम्या…
सध्या विविध रुग्णालयात 3 हजार 693 जण घेतायत उपचार
दहा दिवसांपूर्वी 7 हजार 768 इतके रुग्ण होते उपचार घेत…
रुग्णसंख्या कमी झाल्याने रुग्णालयातील मोठा ताण झाला कमी…
पालिकेच्या नायडू रुग्णालयात 170 पैकी 100 खाटा रिकाम्या…
शहरात एकूण साडे सहा हजारांहून अधिक खाटा रिकाम्या…
औरंगाबाद –
औरंगाबाद जिल्ह्यातील काही दिवसांची लसीकरणाची चिंता मिटली..
महानगरपालिकेला 20 हजार कोविशील्ड लसींचा साठा प्राप्त..
आज होणार 70 केंद्रांवर लसीकरण..
लसींच्या तुटवड्यामुळे बऱ्याचदा लसीकरण झाले होते स्थगित
20 हजार लसी मिळाल्यामुळे दिलासा
औरंगाबादसाठी अजूनही मोठ्या प्रमाणात लसींची मागणी
औरंगाबाद –
अखेर त्या कोरोनाबाधित डॉक्टर तरुणाचा मृत्यू
एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या डॉ. राहुल पवार यांचा मृत्यू
काही दिवसांपूर्वी डॉ. राहुल पवार यांच्या उपचारासाठी झाली होती पोस्ट व्हायरल
लातूर येथील खाजगी मेडिकल कॉलेज मध्ये करत होता कोरोना रुग्णांवर उपचार
कोरोना रुग्णांची सेवा करताना झाली होती कोरोनाची बाधा
प्रकृती गंभीर झाल्यानंतर मित्रांनी पैसे जमा करून औरंगाबादच्या एमजीएम रुग्णालयात केले होते दाखल
उपचारासाठी आर्थिक मदत करण्यासाठी सोशल मीडियात पोस्ट झाली होती व्हायरल
व्हायरल पोस्ट नंतर मदतीसाठी अनेक हात आले होते पुढे
पण अखेर राहुल पवार या डॉक्टर तरुणाचा उपचारादरम्यान झाला मृत्यू
ऊसतोड कामगार कुटुंबातील तरुण जिद्दीच्या जोरावर बनला होता डॉक्टर
नाशिक – नाशिकमध्ये आज 30 केंद्रांवर होणार लसीकरण
शहरातील 27 केंद्रांवर कोव्हीशिल्ड,
तर 3 केंद्रांवर कोव्हेक्सीन चे लसीकरण
लसींच्या तुटवड्या मुळे सध्या एक दिवसाआड लसीकरण सुरू
लसींचा पुरवठा लवकर करावा अशी मागणी
नाशिक – खाजगी रुग्णालयात लसीकरणासाठी ज्यादा दर
तब्बल 4 पट ज्यादा दर आकारून केलं जातंय लसीकरण
कोव्हीशिल्ड साठी 850 तर कोव्हेक्सीन साठी 1250 दर निश्चित
शासनाने निश्चित केलेलं दर आकारण्याचे आदेश
मात्र खाजगी रुग्णालयांना शासन आदेशाचा विसर..
दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी
नागपूर ृ-
नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये म्युकरमायकोसिससाठी तीन वार्ड
गेल्या काही दिवसात म्युकर चे रुग्ण वाढत असल्याने करण्यात आली स्पेशल वॉर्ड ची निर्मिती
त्यात 100 बेड ची व्यवस्था आहे
सध्या मेडिकल मध्ये 89 रुग्ण घेत आहे उपचार
आवश्यते नुसार या ठिकाणी डॉक्टरांची टीम शस्त्र क्रिया करत आहे
नाशिक – खाजगी हॉस्पिटलच्या मनमानी विरोधात आता शिवसेना मैदानात
वाढीव बिल घेणाऱ्या खाजगी हॉस्पिटलवर तात्काळ कारवाई करा
शिवसेना विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांचा इशारा
आयुक्तांनी कारवाई न केल्यास सेना स्टाईल धडा शिकवू
औरंगाबाद –
औरंगाबादच्या वोखार्ट कंपनीत उत्पादित होणार कोरोना लस
इंग्लडच्या कंपनीच्या मदतीने उत्पादित केली जाणार कोरोना लस
इंग्लड स्थित कंपनीशी कराराची चर्चा अंतिम टप्प्यात
लसींचे एक अब्ज डोस उत्पादित करण्याची कंपनीची क्षमता
सिरम नंतर लस उत्पादन करणारी वोखार्ट ठरणार राज्यातील दुसरी कंपनी
सांगली –
कोरोना रुग्णालयातील भरमसाठ बिलांमुळे गोरगरीब रुग्ण आज आर्थिक संकटात सापडलेले असताना
सांगलीचे नमराह कोविड सेंटर गोरगरीब रुग्णांसाठी आर्थिक “संजीवनी” देणारे ठरले आहे
अवघे अडीच हजार रुपये प्रतिदिन ऑक्सिजन बेड बिल आकारले जातात
त्यामुळे सध्याच्या कोरोना परिस्थिती वैद्यकीय क्षेत्रासाठी रोल मॉडेल ठरले आहे
कोल्हापूर
महिन्याभरानंतर कोल्हापूरकरांना दिलासा
जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 25 वरून 18 टक्क्यांवर
जिल्ह्यात केलेल्या सात दिवसांच्या कडक लॉकडाऊन चा सकारात्मक परिणाम
टेस्टिंगची वाढून ही पॉझिटिव्हीटी रेट कमी झाल्यान दिलासा
जिल्ह्यात काल दिवसात आढळले नवे 2599 रुग्ण तर 45 जणांचा मृत्यू
वर्धा
– जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत घट पण व्हेंटिलेटर अन् आयसीयू बेड फुल्लच
– ऑक्सिजन बेड आणि साधे बेड रिक्त
– ५८ कोविड बाधित देताहेत मृत्यूशी झुंज
– ४५४ रुग्णांवर होताहेत हॉस्पिटलमध्ये उपचार
– रुग्णालयात एकूण १२३० बेड यापैकी ७७६ बेड रिक्त तर ४५४ रुग्णांवर रुग्णालयात उपचार
– मागील चोवीस तासात आढळले 239 रुग्ण
– जिल्ह्यात आजपर्यंत आढळलेले कोरोना रुग्ण – 47274 रुग्ण
– आजपर्यंत एकूण कोरोनामुक्त – 42642 रुग्ण
-जिल्ह्यात झालेल्या एकूण मृत्यू – 1254
– जिल्ह्यात ऍक्टिव्ह रुग्ण – 3378
पुणे
सर्व खासगी रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीची किंमत एकच असावी, पुणे महापालिकेची भूमिका
लसीच्या एका डोससाठी 900 रुपयांपेक्षा जास्त पैसे घेणाऱ्या खासगी रुग्णालयांवर महापालिका करणार कारवाई
स्थायी समितीच्या बैठकीत करण्यात आला या बाबतचा ठराव
खासगी रुग्णालये एका डोससाठी 800 ते 1200 रुपये घेत असल्याच्या नागरिकांनी केल्या होत्या तक्रारी
पुणे
भारत बायोटेक कंपनीकडून मांजरी येथील कोरोना लसीच्या प्लांटमधून येत्या ऑगस्ट महिन्यांच्या अखेरीस कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन सुरू होणार
त्यासाठी विविध स्तरावर तयारी सुरू असून, या प्लांटमधून जास्तीत जास्त लसीचे उत्पादन घेण्याचे नियोजन
या कंपनीकडून पहिल्या टप्प्यात शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांची भरती प्रक्रिया सुरू
भारत बायोटेकच्या हैदराबाद आणि नॅशनल इन्स्ट्यिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) मधील निवृत्त शास्त्रज्ञांचीही मदत घेण्यात येणार
दुसऱ्या टप्प्यात अन्न व औषध प्रशासन, महावितरण, केंद्रीय आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, कामगार विभागाच्या परवानग्या घेण्याचे काम सुरु
तसेच, तिसऱ्या टप्प्यात यंत्रसामग्री तपासणीचे काम पूर्ण करण्यात येणार
केंद्र आणि राज्य सरकारकडून ३० ते ४५ दिवसांत आवश्यक परवाने घेण्यात येतील
यानंतर ऑगस्टअखेर प्रत्यक्ष लस उत्पादित करण्याचे नियोजन
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची माहिती
पुणे :
महापालिकेच्या आरोग्य विभागाने उभारली ऑक्सिजनची लायब्ररी
घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांना या लायब्ररीतून ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटरची सेवा दिली जाणार
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार रुग्णांना 7 दिवस, 15 दिवस किंवा एका महिन्याच्या कालावधीसाठी 5 ते 10 लिटरचे ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर लायब्ररीतून उपलब्ध करून दिले जाणार
ज्या रुग्णांना ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर हवा असेल तर त्याचा कोविड पॉझिटिव्ह अहवाल, नोंदणीकृत डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन बंधनकारक
संशयित रुग्ण असेल तर किंवा डिस्चार्ज दिलेला रुग्ण असेल तर किती दिवसांसाठी ऑक्सिजनची गरज आहे, यासाठीचे डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन आवश्यक
रुग्णाचे हमीपत्र आणि त्यासोबत नाव, पत्ता, आणि आधारकार्ड हा पुरावा द्यावा लागणार
पुणे
महापालिकेच्या 54 केंद्रांवर कोविशिल्ड, तर 15 केंद्रांवर कोव्हॅक्सिन लसीचे डोस उपलब्ध
या सर्व ठिकाणी लसीचे प्रत्येकी 100 डोस उपलब्ध
उपलब्ध लसीच्या साठ्यापैकी 60 टक्के लस ही ऑनलाईन बुकिंग करून अपॉईन्मेंट घेतलेल्या 45 वर्षांवरील नागरिकांना पहिला डोस म्हणून दिली जाणार
तर, 20 टक्के लस ही 45 वर्षे वयावरील नागरिकांना लसीकरण केंद्रावर ऑन दी स्पॉट नोंदणी करून पहिला डोस म्हणून दिली जाणार
तसेच, 20 टक्के लस ही 45 वर्षांवरील नागरिकांना ज्यांनी 84 दिवसांपूर्वी पहिला डोस घेतला आहे, त्यांना दुसरा डोस म्हणून देण्यात येणार
तर 29 एप्रिल पूर्वी कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना 15 केंद्रांवर दुसरा डोस देण्यात येणार
राज्यात गेल्या 24 तासांत 24,752 नवे रुग्ण सापडले,
गेल्या 24 तासांत 453 रुग्णांचा मृत्यू
राज्यात एकूण 3,15,042 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत
राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 56,50,907 एवढी झालीये
23,065 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत
राज्यात आजपर्यंत एकूण 52,41,833 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेलेत
यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 92.76 % एवढे झालेय
सातारा
सातारा जम्बो कोव्हीड रुग्णालयातील 45 सफाई कर्मचारी आणि वार्ड बॉय यांचे कामबंद आंदोलन सुरू
2 महिने पगार न दिल्याने केले कामबंद आंदोलन
काम बंद केल्याने कोव्हीड रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर
सातारा जम्बो रुग्णालयाचा कारभार ठरतोय वादाच्या भोवऱ्यात