महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE
पुणे – पुणे जिल्ह्यात पॉझिटिव्ह रुग्ण आणि पॉझिटिव्हीटी रेट कमी होताना दिसत आहे. एप्रिलचा तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यामध्ये सर्वात जास्त म्हणजेच 34 टक्के पॉझिटिव्हिटी रेट होता. आता हा दर 10 टक्क्यांवर आला आहे.
-1 लाख 3 हजार रुग्ण जिल्ह्यात सक्रिय होते .आज तीच संख्या 32 हजारांवर वर आली आहे.
-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसंदर्भात पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिका तसेच ग्रामीण भागत विशेषतः चिल्ड्रन कोविड सेंटर उभारणार आहोत. तसेच औषधे उपकरणे याचीदेखील जुळवाजुळव सुरू करण्यात आलेले आहे.
-कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सीजनचा मोठा तुटवडा जाणवत होता. त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यामध्ये 49 ऑक्सिजन जनरेटर प्लांट उभे केले जातील. त्यापैकी दहा प्लान्ट हे कार्यान्वित झालेले आहेत.
-कोरोनाच्या दुसऱ्या लाटे नंतर पुणे जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे रुग्ण वाढू लागलेले आहेत. सध्या पुणे जिल्ह्यात 520 रुग्ण हे म्युकरमायकोसिसवर उपचार घेत आहेत. त्यापैकी काही जणांची शस्त्रक्रिया झालेले आहे. महापालिका आणि ग्रामीण भागात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची शोधमोहीम सुरू आहे.
सातारा कोरोना अपडेट
आज सातारा जिल्ह्यात 2257 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह
दिवसभरात 24 बाधितांचा मृत्यू
दिवसभरात 2398 नागरिकांना दिला डिस्चार्ज
आज अखेर सातारा कोरोनारुग्णांची आकडेवारी
एकूण नमुने – 761815
एकूण बाधित रुग्ण– 162734
घरी सोडण्यात आलेल्या व्यक्ती – 137441
एकूण मृत्यू -3616
सध्या एकूण 21651 रुग्णांवर उपचार सुरु
सातारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली माहिती
मुंबईत आज कोरोनाचे 1 हजार 48 कोरोना रूग्ण
मुंबईत आज 25 जणांचा कोरोनाने मृत्यू
मुंबईत आज 1 हजार 359 रुग्ण कोरोनामुक्त
जळगाव :
महापालिकेचे 5 भाजप नगरसेवक शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा चर्चेला दुजोरा, 5 नगरसेवकांचा शिवसेना प्रवेश जवळपास निश्चित झाला असून, हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची गुलाबराव पाटील यांची माहिती
यापूर्वी भाजपचे 27 नगरसेवक फुटल्याने जळगाव महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे
नाशिक :
आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 2302
आज पॉझिटिव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 858
नाशिक मनपा- 341
नाशिक ग्रामीण- 475
मालेगाव मनपा- 22
जिल्हा बाह्य- 20
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4637
आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -48
नाशिक मनपा- 17
मालेगाव मनपा- 08
नाशिक ग्रामीण- 23
जिल्हा बाह्य- 00
– नागपूर जिल्ह्याला पुन्हा दिलासा, २४ तासांत ३९२ रुग्णांची नोंद
– नागपूर शहरात २२४ तर ग्रामीण भागात १४६ रुग्ण
– जिल्हयात गेल्या २४ तासांत १४ जणांचा मृत्यू
– २४ तासांत ९९३ रुग्ण झाले कोरोनामुक्त
– जिल्ह्यात सध्या ७४७८ सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिकेचा निर्णय
उच्च शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या १८-४४ वयोगटातील विद्यार्थ्यांना, वैध कागदपत्र सादर केल्यास, कस्तुरबा, राजावाडी, कुपर या लसीकरण केंद्रांमध्ये लस देण्यात येईल.
सोम-मंगळ-बुधवारी लाभार्थी येथे थेट जाऊ शकतात.
वाशिम कोरोना अपडेट :
जिल्ह्यात मागील दीड महिन्यातील एका दिवशी आढळलेला सर्वात कमी नव्या कोरोना रुग्णांचा आकडा
जिल्ह्यात आज नवे 153 रुग्ण मुंबई महापालिकेचा निर्णय
तर आज 406 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
तसेच 04 रुग्णांचा मृत्यू झाला
जिल्ह्यात 15 मे नंतर मागील 15 दिवसात 99 रुग्णांचा मृत्यू झाला असून नवे 5151 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 7121 रुग्ण कोरोनामुक्त झालेत
जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 39841
सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 2455
आतापर्यन्त डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 36930
आतापर्यंत एकूण मृत्यू – 455
पुणे : पुण्यातील परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महापालिकेची लसीकरण मोहीम
दर आठवड्याच्या मंगळवारी आणि बूधवारी होणार लसीकरण
कमला नेहरू रुग्णालयात होणार विशेष लसीकरण मोहीम
विद्यार्थ्यांना नोंदणी करण्याची गरज नाही, वॉक इन पद्धतीने होणार लसीकरण
मात्र परदेशातील शिक्षणाचा पुरावा लागणार महापौर मुरलीधर मोहोळ यांची माहिती
परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना होणार फायदा
भंडारा ऑक्सिजन बेड / आयसोलेशन बेड/ऑक्सीजन उपलब्धतेची माहिती
बेड शिल्लक :
आयसीयुचे बेड– 139 रिकामे
आयोसोलेशन बेड–793 रिकामे
ऑक्सिजनचे बेड 268 रिकामे
भंडारी जिल्ह्यात दिड महिण्यापुर्वी जिल्ह्यात आयसीयु व आँक्सिजन बेड सुध्दा मिळत नव्हते. दिड महिण्यापुर्वी कोवीड रुग्णांना बेडस मिळवण्यासाठी तारेवरची कसरत कराव लागायची.
नंदुरबार : नंदुरबार जिल्ह्यात ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, सर्वसाधारण बेडबाबत माहिती
सर्वसाधारण बेड
जिल्ह्यात सर्वसाधारण बेड- 1272
सद्यस्थितीला सर्वसाधारण रिक्त बेड – 1066
व्हेंटिलेटर बेड
जिल्ह्यात व्हेंटिलेटर बेड- 162
सद्यस्थितीला रिक्त व्हेंटिलेटर बेड – 60
सध्या व्हेंटिलेटर बेडवर उपचार घेणारे रुग्ण – 102
ऑक्सिजन बेड
जिल्ह्यात ऑक्सिजन बेड- 574
सद्यस्थितीला रिक्त ऑक्सिजन बेड – 512
ऑक्सिजन बेडवर उपचार 62 रुग्णांवर उपचार
उस्मानाबाद जिल्ह्यातील बेड उपलब्धतेची माहिती
नॉर्मल बेड – 4 हजार 584 त्यापैकी 3 हजार 119 उपलब्ध
आयसीयुचे बेड– 263 पैकी 83 रिकामे
व्हेंटिलेटर बेड – 143 पैकी 30 रिकामे
ऑक्सिजन बेड – 965 पैकी 350 रिकामे
वर्धा :
ऑक्सिजन बेड / व्हेंटिलेटर बेड / साधे बेड उपलब्धतेची माहिती :
जिल्ह्यात रुग्णालयात एकूण बेड क्षमता- 1230
सध्या स्थितीत – 908 बेड रिक्त
रुग्णालयात उपचार घेत असलेले रुग्ण – 322
– व्हेंटिलेटर बेड – एकूण 92 बेड यापैकी 73 रुग्ण रुग्ण उपचार घेत आहे 19 व्हेंटिलेटर बेड रिक्त आहे
– ऑक्सिजन बेड – एकूण 970 बेड यापैकी 195 रुग्ण उपचार घेत आहे 775 ऑक्सिजन बेड रिक्त आहे
– साधे बेड रुग्णालयात – एकूण 110 बेड यापैकी सर्व बेड खाली आहे
बारामती :
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक
– बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान सभागृहात बैठक
– अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होतेय बैठक
– बारामतीतील कोरोना परिस्थितीबद्दल अजित पवार घेणार आढावा
गेल्या 24 तासात देशात कोरोनाचे 1 लाख 73 हजार रुग्ण
गेल्या 24 तासात 2 लाख 84 हजार 601 जणांना देण्यात आला डिस्चार्ज
देशात 22 लाख 28 हजार 724 जणांवर सध्या उपचार सुरु
गेल्या 15 दिवसात बाधीत पेक्षा डिस्चार्ज आकडा मोठा
#COVID19 | At 1.73 lakh daily new cases, a declining trend in new cases is maintained. Active caseload further declines to 22,28,724 with active cases decrease by 1,14,428 in last 24 hours: Union Health Ministry pic.twitter.com/3tzms4vSKl
— ANI (@ANI) May 29, 2021
औरंगाबाद –
औरंगाबाद म्युकरमायकोसिसचे 53 बळी..
म्युकरमायकोसिसच्या एकूण रुग्णांची संख्या 576 वर..
अनेक रुग्णालयांनी लपवली होती म्युकरमायकोसिसची खरी रुग्णसंख्या..
मृत्यूचे आणि म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे प्रमाण पाहता आरोग्य विभागाला मोठा धक्का…
म्युकरमायकोसिसची आणखी रुग्णसंख्या समोर येण्याची शक्यता
वर्धा
– जिल्ह्यात आता आरोग्य केंद्रातही होणार आता ‘आरटीपीसीआर’
– दररोज ५० स्टॅब कलेक्शनचे नियोजन
– जिल्ह्यात २८ प्राथमिक आरोग्य केंद्र असून २७ केंद्रावर आरटीपीसीआर चाचणीची व्यवस्था
– पूर्वी सामान्य रुग्णालय , उपजिल्हा रुग्णालय , ग्रामीण रुग्णालय आणि सावंगी , सेवाग्राम रुग्णालयातच होत होती आरटीपीसीआर चाचणी
– ग्रामीण भागातील रुग्णांचे निदान व्हावे म्हणून निर्णय
– या सर्व ठिकाणी मोफत होणार चाचणी
वर्धा
– जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे आतापर्यंत ६२ रुग्ण
– म्युकरमायकोसिसमुळे एकही रुग्णाचा मृत्यू नाही
– सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात सुरू आहे रुग्णांवर उपचार
-६२ रुग्ण रुग्णालयात उपचाराकरिता दाखल झाले होते. यातील १२ जणांना पूर्णतः बरे झाल्यानंतर सुटी देण्यात आली आहे.
– रुग्णालयाला जिल्हा सामान्य रुग्णालयांकडून औषधांचा पुरवठा
बारामती :
पियाजिओ कंपनीच्या वतीने बारामतीसाठी ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर…
– बारामतीसाठी दहा, तर जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सात कॉन्सनट्रेटर…
– उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते कॉन्सनट्रेटर प्रदान
औरंगाबाद –
पोलिसांनी विनामास्क असल्याने आडवल्यामुळे पोलिसांना धक्काबुक्की..
दोन महिला आणि जमावाने पोलिसांना शिवीगाळ करत केली धक्काबुक्की…
पोलिसांच्या अंगावर धावून जात दिल्या मारण्याच्या धमक्या..
बॅरिकेट्स काढा अन्यथा अंगावर वर्दी ठेवणार नाही अश्या दिल्या होत्या धमक्या..
एका पोलिसाच्या वर्दी वरील नेमप्लेट घेतली काढून..
दोन तरुण आणि दोन महिलांविरोधात सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
औरंगाबाद –
कोरोनामुळे औरंगाबाद शहर जिल्ह्यात अनेक मुलांचे हरवले छत्र
औरंगाबादेत 234 मुलांनी गमावले पालक
11 मुलांनी गमावले आई आणि वडीलही
तर 223 मुलांपैकी कुणी गमावली आई तर कुणी गमावले वडील
कोरोनामुळे काहींना गमावला मायेचा पदर तर कुणी वडिलांची पाठेवरची थाप गमावली..
234 मुलांच्या पुनर्वसनासाठी शासन करणार प्रयत्न
पुणे
राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची पुर्नरचना
5 नवीन सदस्यांची केली निवड,
नैसर्गिक आपत्तीत सदस्य सुचविणार पर्याय,
अतिवृष्टी, पुर, भूकंप, चक्रीवादळ याचा प्रामुख्याने आपत्ती व्यवस्थापनात अभ्यास केला जाणाराय,
राज्याचे मुख्यमंत्री या प्राधिकरणाचे अध्यक्ष तर उपमुख्यमंत्री उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील व मदत पुर्नवसन मंत्री हे पदसिद्ध सदस्य असतील,
राजेंद्र पवार, प्रभाकर देशमुख, संजय लाखे, महेश कांबळे आणि रवी सिन्हा या पाच नवीन सदस्यांचा समावेश आहे
सोलापूर – कोरोनाची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल
तपासणी अहवाल पॉझिटिव आल्यानंतर स्वतःची आणि कुटुंबियांची माहिती देण्यास टाळाटाळ करणाऱ्या चार जणांवर गुन्हा दाखल
मृदुला देवस्थळे यांची आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह
मात्र त्या खासगी दवाखान्यात उपचार घेत असल्याचे सांगून राहत उद्या घरात
त्यांच्या संपर्कातील तीन जणांना पालिका प्रशासन पाठवणार होते क्वारटाइन सेंटरला
मात्र पालिका प्रशासनाच्या डॉक्टराना प्रतिसाद न दिल्यामुळे फौजदार चावडी पोलिसात फिर्याद
औरंगाबाद –
औरंगाबादेत म्युकरमायकोसिसचा कहर
औरंगाबादेत 300 च्या वर म्युकरमायकोसिसचे रुग्ण
फक्त शहरात आढळले 311 रुग्ण तर सर्वाधिक रुग्ण घाटी रुग्णालयात घेतायत उपचार ..
काहींना गमवावा लागला डोळा तर काहींचा काढला जबडा..
म्युकरमायकोसिसची नाकापासून होते सुरुवात तर पसरतो मेंदूत..
म्युकरमायकोसिसच्या औषधीच्या तुटवड्यामुळे उपचारात मोठे अडथळे
पुणे
राज्यातील 18 साखर कारखान्याचे ऑक्सिजन प्लांट महिनाभरात होणार सुरू,
ऑक्सिजन प्लांटसाठी लागणारी रेडी टू युज ही यंत्रसामुग्री परदेशातून मागवण्यासाठी 18 कारखान्यांनी केलं बुकींग,
साधारण 50 लाख ते 1 कोटीच्या आसपास येणार खर्च,
मात्र 18 कारखान्यात प्रकल्प सुरू झाल्यास दीड हजार ऑक्सिजन सिलेंडर होणार उत्पादित,
उस्मानाबाद जिल्ह्यातील ( धाराशिव साखर कारखान्याचा ) ऑक्सिजन प्लांटही सुरू झालाय, या जिल्ह्यासाठी हा महत्वाचा ठरतोय,
साखर आयुक्त कार्यालयाकडे या 18 कारखान्यांनी नोंदणी केलीये
– उमरेडचे काँग्रेस आमदार राजू पारवेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
– ‘कोरोनात निराधार, विधवा झालेल्या महिलांसाठी योजना आखा’
– ‘योजना आखून कोरोनात विधवा झालेल्या निराधार महिलांना मदत करा’
– कोरोना निराधार पालकत्व योजना राज्यभर राबवण्याची मागणी
– आ. राजू पारवे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी
– कोरोनामुळे घरचा कर्ता पुरुष गेल्याने अनेक परिवारावर ओढवलं संकट
मुंबई –
लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला
नवी नियमावली मंगळवारी येणार
1 जूनपासून शासकीय, खासगी कार्यलये 50 टक्के क्षमतेने सुरु होण्याची शक्यता
7 ते 11 सुरु असलेल्या अत्यावश्यक सेवेतील दुकाना वेळ वाढवून मिळणार
जिल्हाबंदी मात्र 10 जूननंतर उठवण्याची शक्यता
– व्हेंटीलेटरवर गेलेल्या ५५ टक्क्यांवर कोरोना रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू
– नागपूरातील मेयो, मेडीकलसह खाजगी कोरोना रुग्णालयातली स्थिती
– १ मार्च २०२० ते २७ एप्रिल २०२१ पर्यॅत मेयोत व्हेंटीलेटरवरील २०८१ रुग्णांचा मृत्यू
– कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत व्हेंटीलेटरवरील सर्वाधीक मृत्यू
नागपूर –
– कोरोनाच्या संकटात नागपूर मनपाची आरोग्यासाठी केवळ २ टक्के तरतूद
– महानगरपालिकेच्या बजेटसाठी अवघ्या ५५.४४ कोटींची तरतूद
– आरोग्यासाठी नगरसेवकांची ४०० ते ५०० कोटींच्या तरतुदीची होती मागणी
– तोकड्या बजेटने मनपा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना कसा करणार?
– नागपूर महानगरपालिकेला नागरिकांच्या आरोग्याची काळजी आहे?
– मनपाच्या आरोग्य बजेटवर सर्वसामान्यांचा संताप
पुणे
मास्क न घालता प्रवास करणाऱ्या कोलकाता राईडर्सचा खेळाडू राहुल त्रिपाठी याच्यावर पुणे पोलिसांची कारवाई
पुणे पोलिसांनी ठोठावला त्रिपाठीला पाचशे रुपयांचा दंड
पु्ण्यातील कात्रज-कोंढवा रस्त्यावरील खडीमशीन चौकात करण्यात आली ही कारवाई
नागपूर : कोरोनाची साथ ओसरली असताना म्युकरमायकोसिसचे नवीन संकट ओढावले आहे. नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ९६० रुग्णांची नोंद झाली असून ७७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. धक्कदायक म्हणजे, कोरोनाचा मृत्यूदर १.८७ टक्के असताना म्युकरमायकोसिसचा दर ७.९४ टक्क्यांवर पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर ४८.८१ टक्के आहे. लक्षणे दिसताच उपचार घेतल्यास हा आजार बरा होत असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. लोकमत
महाराष्ट्राला मोठा दिलासा, कोरोनाबाधितांच्या संख्येत घट
राज्यात गेल्या 24 तासांत 20 हजार 740 नवे कोरोनाबाधित रुग्ण
424 रुग्णांचा मृत्यू
तर 31 हजार 671 रुग्णांची कोरोनावर मात