राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 11 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates
पुणे कोरोना अपडेट
दिवसभरात 287 पॅाझिटीव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात 228 रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत 10 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 5
-227 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या 481834
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 3085
– एकूण मृत्यू -8652
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- 6074
नागपूर मनपा केंद्रामध्ये 45 वर्षावरील नागरिकांसाठी सोमवारी कोविशील्ड उपलब्ध
शासनाकडून मर्यादित प्रमाणात कोविशील्ड लसी प्राप्त झाल्यामुळे फक्त 45 वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या केंद्रांवर सोमवारी होणार आहे.
या वयोगटातील नागरिकांना कोविशील्ड लस नि:शुल्क दिली जाईल.
नागपूर महानगरपालिका आणि अन्य शासकीय केंद्रांवर कोविशील्ड तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत.
अकोला कोरोना अपडेट
अकोल्यात आज दिवसभरात 2 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एकही मृत्यू नाही
आतापर्यंत 1130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू
आतापर्यंत 56514 जणांनी केली कोरोनावर मात
तर सध्या 44 रुग्ण उपचार घेत आहेत
तर दिवसभरात 7 जण कोरोनामुक्त झाले आहेत
नागपूर कोरोना अपडेट –
नागपुरात आज 16 नवीन कोरोना रुग्णांची नोंद
28 जणांनी केली कोरोनावर मात
तर 2 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू
एकूण रुग्णसंख्या – 477331
एकूण बरं होणाऱ्यांची संख्या – 468157
एकूण मृत्यूसंख्या – 9034
औरंगाबाद :-
शेतीच्या वादातून दोन गटात तुफान हाणामारी
औरंगाबाद जिल्ह्यातील सावखेड गंगा गावातील घटना
मारहाणीत सैन्यात नौकरीला असलेला तरुण गंभीर जखमी
आज सकाळी 11 वाजता घडली घटना
घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल
जखमी तरुणाला वैजापूरच्या रुग्णालयात केले दाखल
पाच ते सहा जणांनी मिळून केली जवानाला मारहाण
शेतीच्या वादातून घडली घटना
सोलापूर– जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तिसऱ्या स्तरातील निर्बंध सुरूच राहणार
पुढील आदेश येईपर्यंत तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधांना मुदतवाढ
दुपारी चार वाजेपर्यंत सुरू राहणार सर्वप्रकारच्या आस्थापना
दर शनिवार-रविवारी राहणार विकेंड लॉकडाऊन,
रेस्टॉरंटमधील पार्सल सेवा मात्र सुरूच राहणार
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश
नागपूर –
नागपुरात विकेंड लॉक डाऊन , मात्र नागपूरकर रस्त्यावर
अत्यावश्यक सेवा वगळता मार्केट बंद
बाजारपेठा पूर्णतः बंद आहे मात्र रस्त्यावर गर्दी आहे
रविवार सुट्टी चा दिवस असल्याने नागपूरकर पडले बाहेर
नागपुरात कोरोना रुग्ण संख्या आणि मृत्यू च प्रमाण कमी
मात्र तिसरी लाट आणि डेल्टा प्लस चा धोका लक्षात घेता लावण्यात आले निर्बंध
सोलापूर- कोरोना प्रतिबंधक लस मिळत नसल्याने विडी कामगार महिलांनी केला रस्ता रोको
लसिचा पुरवठा झाला नसल्याने शहरातील लसीकरण केंद्रावर आज लसीकरण मोहीम आहे बंद
वारंवार लसीकरण मोहीम ठप्प होत असल्याने विडी कामगार महिलाना मारावे लागत आहे लसीसाठी हेलपाटे
अक्कलकोट सोलापूर रस्त्यावरील मुद्रा सन साठी आरोग्य केंद्र समोर कामगार महिलांचा रास्तारोको
एक-दोन दिवसांचा अपवाद वगळता सोलापूर शहरात होत आहे वारंवार लसीकरण मोहीम ठप्प
नवी मुंबईत 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले
रुग्ण संख्या वाढत असल्याने घेण्यात आला निर्णय
मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी शनिवारी आदेश काढून निर्बंध वाढविले
नियमांचं पालन करण्याचे महानगरपालिकेने केले आवाहन
कोल्हापूर :
कोरोनामुळे नऊ वर्षाच्या मुलीचा मृत्यू
गडहिंग्लज तालुक्यातील नूल इथंली घटना
कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात सुरू होते उपचार
कोरोना महामारीच्या काळात पहिल्यांदाच जिल्ह्यात इतक्या कमी वयाच्या रुग्णाचा मृत्यू
आरोग्य यंत्रणेत खळबळ,
तिसऱ्या लाट लहान मुलांसाठी घातक असल्याचं सांगितलं जातं असतानाच घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थ्यांनी पालक हेच चिंतेत
पुणे-
– शहरातील लसीकरण आज बंद राहणार,
– महापालिका प्रशासनाला शनिवारी ३४ हजार १०० डोस मिळाले होते, त्याद्वारे १९० केंद्रांवर लसीकरण करण्यात आले,
– महापालिकेकडे लस शिल्लक असली तरी प्रशासकीय सोईसाठी दर रविवारी लसीकरण केंद्रांना सुट्टी देण्याचा प्रशासनाचा निर्णय,
– यापूर्वी शनिवारी ५० टक्के व रविवारी ५० टक्के लसीकरण केंद्र सुरू ठेवले जात होते,
– त्यामुळे लसीकरण केंद्रांवरील डॉक्टर व इतर कर्मचारी यांना एक दिवस सुट्टी मिळत होती,
– तर नागरिकांना आठवड्याचे सर्व दिवस लस उपलब्ध होत होती.
औरंगाबाद :-
औरंगाबाद शहरात आज पुन्हा लसींचा साठा संपला
एकाच दिवसात संपला सहा हजार लसींचा साठा
आज पुन्हा बंद राहणार लसीकरण मोहीम
फक्त दोन आरोग्य केंद्रावर मिळणार 400 नागरिकांना लस
सातत्याने लस तुटवडा होत असल्यामुळे औरंगाबादकर नागरिक हैराण
नाशिक
– आज रविवार असल्याने नाशिक शहरातील सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद
– को वॅक्सिंनचे फक्त 8 हजार डोस शिल्लक,कोविशिल्डचा लस साठा पूर्णपणे संपला
– नागरिकांचा लस घेण्यासाठी चांगला प्रतिसाद असताना लस साठा संपल्याने नाराजी
– आतापर्यंत नाशिक जिल्ह्यात 12 लाखाहून अधिक नागरिकांच झालं लसीकरण
नागपूर –
नागपुरात गेल्या दहा दिवसांत 1 लाख 37 हजार नागरिकांचंच झालं लसीकरण
यातील 2 दिवस आकडा 30 हजार च्या पुढे गेला मात्र आठ दिवसात दर दिवशी 5 हजार पेक्षा ही कमी नागरिकांचं लसीकरण झालं
प्रशासन गंभीर नसल्याचं चित्र
तिसरी लाट आणि डेल्टा प्लस चा धोका वर्तविण्यात येत असताना लसीकरणाला गती मिळत नाही
यामुळे चिंता वाढण्याची शक्यता
नागपुरात कोरोना चा सध्या पॉझिटिव्हीटी रेट 0.41 टक्के वर
नागपूर –
नागपुरात आता कोरोना सोबतच डेंगू च नवं संकट
शहरात 170 रुग्णांना झाली डेंगू ची बाधा
आरोग्य यंत्राने पुढे नवी चिंता
कोरोना च संकट कमी होत असताना आता पावसाळ्यात डेंगू ने डोकं वर काढलं त्यामुळे प्रशासनाला नवीन संकटाचा सामना करावा लागत आहे
मे महिन्यात डेंगू चे केवळ 12 रुग्ण होते ते आता 170 वर पोहचले
डेंगू पासून रक्षण करण्यासाठी स्वच्छता पाळण्याचे आरोग्य यंत्रणेच आवाहन
नागपूर –
नागपुरातील ते 11 नमुने डेल्टा प्लसचे नाहीत
11 जणांचे डेल्टा प्लस संशयित म्हणून नमुने तपासणी साठी हैद्राबाद ला पाठविण्यात आले होते
त्याचा अहवाल प्राप्त झाला असून ते डेल्टा प्लस चे नसल्याचं झालं स्पष्ट
आरोग्य यंत्रणेला मिळाला दिलासा
कोल्हापूर वरून आलेले दोन आणि शहरातील 9 असे 11 जणांचे नमुने डेल्टा प्लस च्या संशयावरून निरी कडे पाठविण्यात आले होते
निरीने ते हैद्राबादला पाठविले
त्याचा अहवाल प्राप्त झाला असून ते डेल्टा प्लस चे रुग्ण नसल्याचं आलं समोर