राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात कालपर्यंत 3 कोटी 63 लाख 44 हजार 581 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. तर 10 जुलै 2021 रोजी 3,66,036 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 95.91% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 12 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates
नागपूर :
उदयाला मनपा केंद्रामध्ये कोव्हिशिल्डचे लसीकरण नाही
शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोव्हिशिल्ड लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर मंगळवारी कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त राम जोशी यांनी दिली.
१८ वर्षावरील आणि ४५ वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला आणि दूसरा डोज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडीकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केन्द्र येथे उपलब्ध आहे.
पुणे :
दिवसभरात २८७ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ.
– दिवसभरात २२८ रुग्णांना डिस्चार्ज.
– पुण्यात करोनाबाधीत १० रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०५.
-२२७ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
– पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८१८३४.
– पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- ३०८५.
– एकूण मृत्यू -८६५२.
-आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४७००९७.
– आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ६०७४.
मुंबई : संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील उद्योग क्षेत्रासाठी देखील कोव्हिडविषयक टास्क फोर्स स्थापन करावा त्याचप्रमाणे मुख्यमंत्री सचिवालयामार्फत याचे संनियंत्रण करावे असे निर्देश मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दिले. कोव्हिड काळातदेखील उद्योगांचे अर्थचक्र सुरू राहावे, उत्पादनांमध्ये अडथळे येऊ नये या दृष्टीने व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
गेल्या 24 तासात भारतात 37 हजार 154 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे
तर 724 रुग्णांना प्राण गमवावे लागले
कालच्या दिवसात देशात 39 हजार 649 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले
कोल्हापूर :
कोल्हापूर शहरातल्या लसीकरण केंद्रांवर गर्दीच गर्दी
ग्रामीण भागात लसीकरण पूर्णपणे बंद
मात्र शहरातल्या काही केंद्रांवर लस उपलब्ध
भरपावसात छत्री घेऊन कोल्हापूरकर लसीकरणाच्या रांगेत
दुसऱ्या डोस साठी कोल्हापूरकरांची मोठी गर्दी
आजच्या दिवशी दिव्यांग आणि परदेशी जाणाऱ्या नागरिकांना प्राधान्याने लस दिली जाणार
सिरोंचा आल्लापल्ली आष्टी राष्ट्रीय महामार्ग करिता नऊशे कोटी रुपये मंजूर
दोन वर्षापासून रखडले होते राष्ट्रीय महामार्गाचे काम
सिरोंचा ते आष्टी 140 किलोमीटर मार्ग वन विभागाच्या जंगलातून जात असल्यामुळे
नवीन मार्ग तयार करण्यासाठी वन विभागाकडून आर कातीत विलंब
नितीन गडकरी च्या प्रयत्नाने मार्ग च्या काम लवकरच सुरू होणार
दोन वर्षानंतर गडचिरोली वासियांना राष्ट्रीय महामार्गाच्या कामाबाबत दिलासा
मुंबईच्या नागपाडा भागातून नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने एक कोटीची ड्रग जप्त केली
काल रात्री येथे एनसीबीने धाड़ टाकून ही ड्रग जप्त केली
या प्रकरणात एका महिला ड्रग पेडलरला अटक करण्यात आली आहे
पुढील तपास मात्र शुरू आहे
मुंबईत तीन दिवसांच्या ब्रेकनंतर आजपासून पुन्हा लसीकरण सुरु झालं आहे
– घाटकोपर राजावाडी वॅक्सिनेशन सेंटरबाहेर लोकांची तोबा गर्दी झालीये…
– सकाळी सहा पासून हजारोंचेया संख्येत लोकांनी रांग लावलीये… सोशल डिस्टेंसिंगचा फज्जा ऊडालाय…
– मुंबईतील सर्व लसीकरण केंद्रांवर आज लसीकरण सुरु असणार आहे.
– सध्या मुंबईत 1 लाख 35 हजार लसीचे डोस उपलब्ध आहेत.
मात्र, पुढील दोन दिवस हे डोस पुरतील, त्यामुळे लस मिळाली नाही तर बाहेर कसं पडायचं या विवंचनेत सध्या मुंबईकर रांगेत तिष्ठत ऊभे दिसत आहेत
औरंगाबाद –
कोरोना ओसरल्याने औरंगाबाद शहरातील 18 खाजगी कोविड सेंटर बंद
मनपाने याआधी 21, तर खाजगी रुग्णालयांनी केले 18 कोविड रुग्णालये बंद
मोठ्या प्रमानात खाजगी रुग्णालयाकडून कोविड सेंटर बंद करण्यासाठी मनपाला अर्ज
संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता 55 कोविड रुग्णालये सुरुच
सोलापूर –
आजपासून जिल्हा परिषदेच्या 83 शाळा आजपासून भरणार
शैक्षणिक वर्षात बंद असलेल्या जिल्हा परिषदेच्या 83 शाळा सुरू होणार
कोरणा मुक्त गावात आठवी ते बारावीच्या शाळा सुरु करण्यास दिली आहे शासनाने परवानगी
जिल्ह्यात 1 हजार 24 पैकी 678 गावे कोरोना मुक्त
यातील 335 गावात शाळा सुरु करण्यास जिल्हा प्रशासनाने दिली आहे परवानगी
कोरोनामुक्त गावात जिल्हा परिषदेच्या 83 शाळा
– नागपूरच्या मेडीकलमध्ये डेंग्यू तपासणी कीट नाहीत
– डेंग्यू संशयित रुग्णांना दिला जातो खाजगीत जाण्याचा सल्ला
– नागपूरात डेंग्यूचा प्रकोप वाढतोय, गेल्या १० दिवसांत २०० रुग्ण
– डेंग्यूच्या निदानासाठी वापरली जाणारी कीट नसल्याने रुग्णांना मनस्ताप
– गरीब रुग्ण खाजगी लॅबमधून तपासणीसाठी पैसे कुठुण आणणार?
– डेंग्यूचे अनेक संशयित रुग्ण रोज मेडीकलमध्ये तपासणीसाठी येतात
महाराष्ट्रात कालपर्यंत 3 कोटी 63 लाख 44 हजार 581 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले
10 जुलै 2021 रोजी 3,66,036 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले
महाराष्ट्रात कालपर्यंत 3 कोटी 63 लाख 44 हजार 581 नागरिकांचे लसीकरण करण्यात आले. दि. 10 जुलै 2021 रोजी 3,66,036 लाभार्थ्यांना लसीकरण करण्यात आले.#MahaVaccination pic.twitter.com/JrEFJgc6v5
— Rajesh Tope (@rajeshtope11) July 11, 2021