राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात9,000 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व नवीन 5,756 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,80,350 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,03,486 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.24% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
नागपूर जिल्ह्यात आज 8 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
25 रुग्णांची कोरोना वर मात
तर आज कोरोना मुळे कोणाचाही मृत्यू नाही
एकूण रुग्ण संख्या – 492779
एकूण बरे होणाऱ्यांची संख्या – 482377
एकूण मृत्यू संख्या – 10115
नाशकात आज पूर्ण बरे झालेले रुग्ण – 146
आज रोजी पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 80
नाशिक मनपा – 53
नाशिक ग्रामीण – 21
मालेगाव मनपा – 00
जिल्हा बाह्य – 06
नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 8482
आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 04
नाशिक मनपा – 03
मालेगाव मनपा – 00
नाशिक ग्रामीण – 01
जिल्हा बाह्य – 00
कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्राने आज पुन्हा विक्रम प्रस्थापित करीत लस मात्रांचा (डोस) चार कोटींचा टप्पा पार केला. आज दुपारपर्यंत झालेल्या लसीकरणानंतर राज्यात आतापर्यंत 4 कोटी 24 हजार 701 लसींचे डोस देण्यात आले आहेत, असे आरोग्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी सांगितले.
कोरोनामुळे अनेक जणांची पंढरपूर वारी गेल्या वर्षांपासून चुकत आहे
याला पर्याय काढत पंढरपूर वारी शक्य न झाल्याने, जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील कुंभारी येथील वारकऱ्यांनी गावातच दिंडी प्रदक्षणा घालत वारीचा अनुभव घेतला
या वेळी वारकऱ्यांनी विठ्ठलाचे नाव घेत, टाळ मृदुनगाच्या गजरात आषाढी एकादशी साजरी केली.
पिंपरी चिंचवड
– ‘कोविशिल्ड’ लशीची टंचाई; आज फक्त 4 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार
– पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे
– 4 केंद्रांवर 100 च्या क्षमतेने लस देण्यात येणार आहे. ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आज कोविशिल्ड लस मिळणार नाही.
बुलडाणा
जिल्ह्यातील 90 टक्के शिक्षकांचे लसीकरण पूर्ण, मात्र पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाची भीती कायम, आठवी ते बारावी पर्यंत शाळा सुरू, शाळेत जाण्यापूर्वी शिक्षकांनी लसीकरण पूर्ण करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते, त्यानुसार मुख्याध्यापकांनी लसीकरण न झालेले शिक्षकांना शाळेवर रुजू करूनच घेतलं नाहीय, म्हणून 90 टक्के शिक्षकांनी लसीकरण करून घेतलं
पिंपरी चिंचवड
-भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे फेसबुक अकाऊंट हॅक
-फेसबुक अकाऊंट हॅकरकडून हॅक करण्यात आले आहे त्यावरून पैशांची मागणी केली जात आहे
-या अकाऊंटवरून वैयक्तिक मेसेज पाठवुन पैशाची मागणी किंवा इतर वस्तुंची मागणी करत आहे. फेसबुक अकाऊंटवरून अशा वादग्रस्त पोस्ट किंवा पैशांची मागणी करणे अशा पोस्टला कोणीही प्रतिसाद देवु देऊ नये असे आवाहन आमदार जगताप यांनी केले आहे
-ट्विटरद्वारे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली माहिती
बुलडाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल,
जिल्ह्यात फक्त 16 रुग्णावर उपचार सुरू
रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 99 .21 टक्क्यांवर
तर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी रेट 0. 57 टक्के
एव्हढेच नव्हे तर जिल्ह्यातील आठ तालुक्यात एक रुग्ण सक्रिय
जिल्ह्यात आतापर्यंत 667 रुग्णचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात 87 हजार 209 कोरोनाबधित आढळले
कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी धापेवाडातील पारंपारिक आषाढी उत्सव रद्द
नागरिकांनी सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
नागपूर महानगरासह संपूर्ण विदर्भात श्रद्धास्थान असलेल्या श्री. क्षेत्र धापेवाडा येथील आषाढी महोत्सव यावर्षी रद्द करण्यात आला आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेसाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
नागरिकांनी प्रशासनाच्या या निर्णयाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
गेल्या 280 वर्षापासून अखंडितपणे श्री क्षेत्र धापेवाडा येथे मंदिराच्या परंपरेनुसार आषाढीनिमित्त परीपाठाचे कार्यक्रम होत असतात.
मात्र कोरोना संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता राज्य शासनाने कडक निर्बंध लावले आहे.
सध्या नागपूर जिल्ह्यात स्तर ३चे निर्बंध लागू असल्याने सदर परिपाठ कार्यक्रमास परवानगी देता येणार नाही.
तसेच यासारख्या इतर धार्मिक कार्यक्रमांना देखील परवानगी देता येणार नाही.
त्यामुळे नागरिकांनी हा उत्सव रद्द झाला हे समजून कोणतीही गर्दी करू नये,
प्रशासनाला सहकार्य करावे. घरी रहावे सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पुणे
कोरोना प्रतिबंधक लसींचा साठा उपलब्ध होत असल्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण भागात लसीकरणाचा वेग
आतापर्यंत 20 लाख 8 हजार 189 जणांचे लसीकरण
तर आठ दिवसांपूर्वी (दि. 7 जुलै) एकूण 17 लाख 794 जणांना लस
त्या तुलनेत मागील आठ दिवसात तब्बल 2 लाख 28 हजार जणांचे लसीकरण पूर्ण
दरम्यान, आतापर्यंतच्या एकूण लसीकरणात 15 लाख 21 हजार 906 जणांनी पहिला, तर 4 लाख 86 हजार 283 जणांचे लसीचे दोन्ही डोस पूर्ण
पिंपरी चिंचवड
-‘कोविशिल्ड’ लशीची टंचाई; आज फक्त 4 केंद्रांवर ‘कोव्हॅक्सिन’चा दुसरा डोस मिळणार
-पिंपरी-चिंचवड शहरातील 18 आणि 45 वर्षांपुढील नागरिकांना आज फक्त ‘कोव्हॅक्सिन’ लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे
-4 केंद्रांवर 100 च्या क्षमतेने लस देण्यात येणार आहे. ‘कोविशिल्ड’ लशीचा पुरेसा साठा उपलब्ध झाला नाही. त्यामुळे आज कोविशिल्ड लस मिळणार नाही.
कोल्हापूर :
जिल्ह्यात पाच टक्के पेक्षा जास्त रुग्ण असलेल्या गावातील नागरिकांच्या rt-pcr टेस्टला प्राधान्य दिलं जाणार
जिल्ह्यातील अशा 367 गावांची यादी तयार
आरोग्य विभागाच्या कर्मचार्यांकडून चाचणी केली जाणार
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची माहिती
पुराचा विळखा बसणाऱ्या गावातील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य जाणार
निर्बंध शिथिल झाले असले तरी नियम पाळण्याचे जिल्हाधिकारी रेखावार यांच आवाहन
सोलापूर शहरात तीन दिवसापासून लसीकरण नाही
लसीचा तुटवडा असल्यामुळे शहरातील लसीकरण ठप्प
वारंवार होत आहे शहरातील लसीकरण मोहीम ठप्प
आठवड्यामधून कधी एक दिवस तर कधी दोन दिवस सुरू राहते शहरातील लसीकरण मोहीम सुरू
कोल्हापूर
माजी खासदार राजू शेट्टी दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
लसीचे दोन डोस नंतर ही कोरोनाची लागण
पहिल्या लाटेनंतर दुसऱ्या लाटेत ही शेट्टी यांना कोरोनाचा विळखा
राजू शेट्टी यांची प्रकृती स्थिर,गृहवीलगीकरणात उपचार सुरू
– मुंबईच्या बीकेसीत गेल्या एक आठवड्यापासून लसीकरणासाठी लांब रांग…
– लोकांमध्ये सोशल डिस्टेंसिंग नाही आणि मास्कही नाही…
– लसीकरणासाठी ६०० मीटर लांब रांग…
– भर पावसात छत्र्या, रेनकोट घालून लोक लसीकरणासाठी पोहोचले…
– राजरोसच्या त्रासाला कंटाळले मुंबईकर…
– महिला, वयोवृद्ध आणि तरुणांची तोबा गर्दी…
– २०० डोससाठी हजारोंची रांग, काही जण सात दिवसांपासून लसीच्या प्रतिक्षेत…
– नागपुरात लसीकरणाकडे गर्भवती महिलांची पाठ
– आतापर्यंत केवळ ५७ गर्भवती महिलांनी घेतली कोरोना लस
– १५ जुलैपासून गर्भवती महिलांच्या लसीकरणाला झाली सुरुवात
– चार दिवसांत केवळ ५७ गर्भवती महिलांचं लसीकरण
– गर्भवतींचं लसीकरण वाढवण्यासाठी स्रीरोग संघटनेची मदत
– नागपूर जिल्हयात दरवर्षी ३७ हजार प्रसूती होतात
– जानेवारीनंतर नागपूर जिल्ह्यात सर्वात कमी कोरोना रुग्णांची नोंद
– गेल्या २४ तासांत नागपूर जिल्ह्यात ९ कोरोना रुग्णांची नोंद
– नागपूर शहरात ४, ग्रामीणमध्ये १ तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांची नोंद
– गेल्या तीन दिवसांपासून कोरोना मृत्यूची संख्या शुण्य
– गेल्या २४ तासांत झालेल्या ३४३४ जणांच्या चाचण्यांमधून
९९.७६ चाचण्या निगेटीव्ह