दिवाळीनंतर कोरोना पुन्हा फोफावण्याची शक्यता, राजेश टोपे यांचा सावधानतेचा इशारा

| Updated on: Oct 19, 2021 | 4:24 PM

कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाही तर रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. टोपे यांनी दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच टास्क फोर्सने तसा अंदाज व्यक्त केल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

दिवाळीनंतर कोरोना पुन्हा फोफावण्याची शक्यता, राजेश टोपे यांचा सावधानतेचा इशारा
RAJESH TOPE
Follow us on

मुंबई : राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली असली तरी योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. कोरोना प्रतिबंधक नियम पाळले नाही तर रुग्णसंख्या पुन्हा वाढू शकते. या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सावधानतेचा इशारा दिला आहे. टोपे यांनी दिवाळीनंतर रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच टास्क फोर्सने तसा अंदाज व्यक्त केल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. ते नाशिकमध्ये माध्यमाच्या प्रतिनिधींशी बोलत होते.

दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता

“सध्या कोठेही तिसऱ्या लाटेची सुरुवात नाही. मात्र, दिवाळीनंतर कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. टास्क फोर्सने तसा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. पॉझिटिव्हीटी दर कमी झालेला आहे. तसेच सध्या कोरोना चाचणीसुद्धा कमी केलेल्या नाहीयेत, ” असे राजेश टोपे म्हणाले.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली

तसेच पुढे बोलताना कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी झाली आहे. कोरोनामुळे मुंबईत एकाचाही मृत्यू झालेला नाही. हा लसीकरणाचा फायदा आहे. सध्या रुग्णसंख्या कमी झालेली आहे. त्यामुळे अर्थव्यवस्था सुरु झाली पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी काळजीपूर्वक निर्बंध शिथिल केले आहेत, असे राजेश टोपे म्हणाले.

लसीकरणासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता

तसेच लहान मुलांच्या लसीकरणाबाबत राज्य सरकारने पूर्ण तयारी केली असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले “लहान मुलांना देण्यासाठी लस उपलब्ध झाली आहे. लहान मुलांच्या लसीकरणाला परवानगी दिली असेल तर आपण तयार आहोत. लसीकरणासाठी जनजागृती करण्याची आवश्यकता आहे. केंद्र सरकारने लहान मुलांना लस देण्याची परवानगी द्यावी,” अशी मागणीदेखील राजेश टोपे यांनी केली.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 13,058

देशात 24 तासात डिस्चार्ज – 19,470

देशात 24 तासात मृत्यू – 164

एकूण रूग्ण – 3,40,94,373

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 1,83,118

एकूण डिस्चार्ज (रिकव्हरी) – 3,34,58,801

एकूण मृत्यू  – 4,52,454

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 98,67,69,411

इतर बातम्या :

राजकारणातल्या दोन सख्ख्या मित्रांची कहाणी, दत्ता मेघेंच्या मृत्यूपत्रात गडकरींचं नाव, मित्रत्व असावं तर असं!

VIDEO: ईडीची पुढची कारवाई अशोक चव्हाणांवर?; चंद्रकांतदादा म्हणतात, माझ्या हसण्यातून काय तो अर्थ काढा

सरकारचा मोठा निर्णय ! राज्यात उपहारगृहे, हॉटेल्स रात्री 12 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा

(corona cases may increase in maharashtra after diwali festival said health minister rajesh tope)