Corona, Omicron Cases Maharashtra LIVE: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण वाढत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर (Corona Outbreak) सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची (Corona Patients) संख्या झपाट्याने वाढतेय. राज्यातील कालचा आकडा तर चिंता अधिक वाढवणारा आहे. राज्यात शनिवारी दिवसभरात 41 हजार 434 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 9 हजार 671 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. दिवसभरात राज्यात 13 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात आज 44 हजार 388 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 15 हजार 351 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. राज्यात आज 12 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यामुळे राज्यातील मृत्यू दर 2.4 टक्क्यांवर पोहोचलाय. तर राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.98 टक्के इतकं आहे. सध्या राज्यात 10 लाख 76 हजार 996 लोक होम क्वारंटाईन आहेत. तर 2 हजार 614 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी 2 लाख 2 हजार 259 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव (Corona Outbreak) वाढतोय. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशावेळी राज्य सरकारनं 10 जानेवारीपासून राज्यात कठोर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नवी नियमावलीही (New Corona Guidelines) शनिवार जाहीर करण्यात आली आहे. अशावेळी मुंबईकरांना काहीसा दिलासा देणारी बातमी आहे. कारण मागील तीन दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांचा आकडा 20 हजाराच्या पुढे होता. तो आकडा आज 19 हजारावर आला आहे. दुसरीकडे पुण्यातील रुग्णांचा आकडा मात्र दुपटीने वाढल्याचं पाहायला मिळत आहे.
पिंपरी चिंचवडमध्ये आज तब्बल 15 जणांना ओमिक्रॉनची लागण
सहा पुरुष नऊ महिलांचा समावेश
15 पैकी 04 रुग्ण कॅनडा, 01 मालदीव, 01 दुबई, 01रुग्ण माली व 03 रुग्ण यूएसए मधून आले, तर 05 रुग्ण हे परदेशामधून आलेल्या रुग्णाच्या संपर्कातील आहेत
जिल्ह्यात गेल्या 24 तासांमध्ये 832 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
दिवसभरात 96 रुग्णांची कोरोनावर मात
सध्यास्थितीमध्ये जिल्ह्यात 3345 सक्रिय रुग्ण
पुणे : पुणे महापालिका हद्दीत आज दिवसभरात 4 हजार 29 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे शहरातील सक्रीय रुग्णांची संख्या आता 14 हजार 890 वर पोहोचली आहे. यातील 548 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दिवसभरात एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
राज्यात ब्यूटीपार्लर (Beauty Parlour) आणि जिम(Gym)वरील निर्बंधांत शिथिलता आणण्यात आलीय. जिम आण ब्यूटीपार्लर आता 50 टक्के क्षमतेनं सुरू केली जाणार आहेत. दोन डोस घेतलेल्यांनाच आता याठिकाणी परवानगी असणार आहे. त्यासोबतच मास्क(Mask)चा वापर बंधनकारक करण्यात आलाय. वाढत्या कोरोना(Corona)च्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नागरिकांनी सर्व नियमांचं पालन करावं, असं आवाहन करण्यात आलंय.
नवी मुंबई : राज्यात सध्या कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा कहर सुरू आहे, राज्यातली रोजची रुग्णसंख्या पुन्हा 40 हजारांच्या पुढे गेली आहे, लोकांच्या सुरक्षेसाठी रात्र दिवस तैनात असणाऱ्या, कोरोनाकाळात तुमच्या आमच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या खाकी वर्दीलाही कोरोनाचा विळखा वाढतोय, कोरोनाचा प्रादुर्भाव नवी मुंबईतील वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही मोठ्या प्रमाणात झाला आहे. चार दिवसात 180 वरिष्ठ अधिकाऱ्यांसह 1210 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. एकूण 1390 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील 30 जणांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार करण्यात येत आहेत. मुंबईतल्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्युही झाल्याचे समोर आले आहे.
जगात हा रोग पसरलाय,राज्यात रुग्णांची संख्या वाढतेय
लोकांच्या काळजीपोटी राज्य सरकारला काम करावं लागेल
आटोक्यात आलं तर आम्ही निर्बंध शिथील करु
मात्र, रुग्ण वाढत असताना काळजी घेणं गरजेचं आहे
पाच राज्यांच्या निवडणुकीत सभांना बंदी घातलीय
राज्य सरकार, केंद्र सरकार निवडणूक आयोग लोकांच्या हितासाठी निर्णय घेतंय
धार्मिक कार्यक्रम, लग्न, अंत्यविधी साठी मर्यादा लावली आहे
तिसरी लाट कोरोनाचा शेवट असल्याचं सांगितलं जात आहे त्यामुळं नागरिकांनी कोरोना नियमांचं पालन करावं
नियमांचं पालन न केल्यास दंडात्मक कारवाई करावी लागले
राज्याच्या हिताचा निर्णय असल्यास नियम बदलावे लागतात
केंद्र सरकार राज्य सरकारांना विचारात घेतं का?
ऑक्सिजनची मागणी 270 वरुन 350 मेट्रिक टनवर गेलीय
वाढत्या रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत ऑक्सिजनचा वापर कमी
परिस्थिती अद्याप गंभीर झालेली नाही पण काळजी घेणं गरजेचं
लातूर जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी रुग्ण संख्येत वाढ झाली आहे , काल आणखी 114 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. 322 रुग्णांवर सध्या जिल्ह्यातल्या कोविड सेंटरमध्ये उपचार सुरु आहेत . काल 2 हजार 673 रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. त्यामध्ये 114 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत . आता पर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता 93 हजार 306 वर पोहंचली आहे .
कोरोना नियमांवरुन सर्वसामान्य गोंधळात, सत्यनाश सुरु
राज्यपालांना विचारलं पाहिजे
सर्वसहमतीनं निर्णय घ्यावेत,
शाळा सुरु बंद, कॉलेज सुरु बंद, सर्व गोंधळ सुरु आहे
उद्धवजींच्या म्हणण्याशी लाखपट सहमत
वडेट्टीवार चंद्रपूरला एक बोलणार, टोपे जालन्यात एक बोलणार, अजित पवार शुक्रवारच्या बैठकीत एक बोलणार
तज्ज्ञांना बोलू द्या, तुमचे चार जण बोलून ठरवा
सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे रांगडे नेते
दारूची होम डिलिव्हरी काय करता, पिझ्झाची करा ना रे
गेंडासुद्धा मला भेटून मला म्हणाला, मला त्यांची भाषा कळते, मी जादा संवेदनशील आहे, माझं नाव घेऊ नका, असं गेंडा म्हणत असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले
पंतप्रधान नरेंद्र मोदी वाढत्या कोरोना रुग्णंसख्येबद्दल आढावा बैठक घेणार आहेत. संध्याकाळी साडे चार वाजता नरेंद्र मोदी बैठक घेणार आहेत. देशातील वाढती रुग्णसंख्या आणि लसीकरणाचा आढावा नरेंद्र मोदी घेतील. देशभरात 1 लाख 59 हजार कोरोना रुग्ण आढळले आहेत. उद्यापासून बुस्टर डोसचं लसीकरण सुरु होतंय यासंदर्भात नरेंद्र मोदी बैठक घेणार आहेत.
देशात 1 लाख 59 हजार नवे कोरोना बाधित रुग्ण, ओमिक्रॉन बाधितांची संख्या 3623 वर
India reports 1,59,632 fresh COVID cases, 40,863 recoveries, and 327 deaths in the last 24 hours
Daily positivity rate: 10.21%
Active cases: 5,90,611
Total recoveries: 3,44,53,603
Death toll: 4,83,790Total vaccination: 151.58 crore doses pic.twitter.com/Qmm2qQcHOS
— ANI (@ANI) January 9, 2022
नवी दिल्ली संसदेच्या 400 कर्मचाऱ्यांना कोरोना
सुप्रीम कोर्टातही कोरोनाचा धोका वाढला
160 रजिस्ट्रार कोरोना संक्रमित
सहा न्यायाधीशांनाही कोरोनाची बाधा
नवी दिल्लीत कोरोनाचे संकट वाढले
15 ते 18 वयोगटातील लसीकरणात पुणे जिल्हा अव्वल
तर ठाणे जिल्हा दूसऱ्या क्रमांकावर,
आतापर्यंत पुण्यात 5 लाख 53 हजार 331 जणांनी घेतला डोस,
15 ते 18 वयोगटातील लसीकरणाला जिल्ह्यात आला वेग !
– नागपूर जिल्हयात आठवडाभरात 2653 नव्या कोरोना रुग्णांची भर
– जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर पोहोचला 7.5 टक्क्यांवर
– कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी मनपा प्रशासन अलर्ट मोडवर
नाशिकमध्ये ओमिक्रॉनचे वाढते संकट
जिल्हाधिकारी कार्यालयात वॉर रूम सज्ज
संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर प्रशासन एक्शन मोड वर
सोमवार पासून वॉर रूम होणार कार्यान्वित
प्रत्येक अधिकाऱ्यावर नियोजनाची जवाबदारी
– नागपूर जिल्हयात कोरोना रुग्ण झपाट्याने वाढूनही रुग्णालयात फक्त पाच टक्के रुग्ण दाखल
– गेल्या 24 तासांत 698 नव्या रुग्णांपैकी 37 रुग्ण रुग्णालयात दाखल
– नागपूरात एकूण सक्रिय रुग्णांपैकी 116 रुग्ण रुग्णालयात दाखल
– नागपूरातील 7 हजारपेक्षा जास्त बेड रिकामे
– शहरात एकूण बेडच्या 1.53 टक्केच रुग्ण भरती
ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यांची प्रकृती उत्तम असून ते सध्या गृह विलगिकरणात आहेत. कोरोनावर मात करून लवकरच जनतेच्या सेवेसाठी हजर होईन, असा विश्वास व्यक्त करतानाच गेल्या काही दिवसात संपर्कात आलेल्या व्यक्तींनी काळजी घ्यावी व लक्षणे दिसल्यास तात्काळ कोरोना चाचणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केले आहे.
शिवसेना नेते सचिन अहिर यांना कोरोना संसर्ग
कोरोनाची प्राथमिक लक्षणे जाणवल्यानंतर माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉजीटिव्ह आली आहे. पुढील काही दिवस डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी विश्रांती घेणार आहे. माझी प्रकृती व्यवस्थित असून संपर्कात आलेल्यांनी कृपया चाचणी करून काळजी घ्यावी.
मी लवकरच आपल्या सेवेत दाखल होईल.— Sachin Ahir (@AhirsachinAhir) January 8, 2022