मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसांनतर 40 हजाराच्या खाली आली आहे. सोमवारी राज्यात 31 हजार 111 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 29 हजार 092 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 94.3 टक्केवर पोहोचला आहे.तर, राज्यातील मृत्यूदर 1.95 वर पोहोचला आहे. तर राज्यात सोमवारी ओमिक्रॉनच्या 122 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 40, मीरा भाईंदर 29, नागपूर 26, औरंगाबाद 14, अमरावती 7, मुंबईत 3 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 1860 वर पोहोचली आहे. तर, 959 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
आज दिवसभरात 39,207 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
गेल्या 24 तासांमध्ये 38824 रुग्णांनी केली कोरोनावर मात
दिवसभरात राज्यात 53 कोरोनाबाधितांचा मृत्यू
वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 32 जणांना कोरोनाची लागण
दिवसभरात 23 व्यक्तींची कोरोनावर मात
एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 42257
सक्रिय रुग्ण – 372
आज दिवसभरात 352 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कालचे कोरोनाबाधित – 179
आजचे कोरोनामुक्त – 98
एकूण सक्रिय रुग्णांची संख्या – 1833
आजचे बाधित मृत्यू – 1
नवी दिल्ली: केंद्र सरकारने सर्व राज्यांना पुन्हा एकदा कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवरून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. केंद्र सरकारने सर्व राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना चिठ्ठी लिहून कोरोना चाचण्या कमी करू नका. चाचण्या वाढवा, अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत. देशातील कोरोना रुग्णसंख्येचा ग्राफ गेल्या काही दिवसांपासून खाली येत आहे. गेल्या 24 तासात देशात 2.38 लाख नवे रुग्ण सापडले आहेत. रविवारच्या तुलनेत कालची रुग्णसंख्या 7.8 टक्क्यांनी कमी आहे. संसर्ग दरातही घट झाली आहे. सोमवारी पॉझिटिव्हीटी रेट 13.11 टक्के होता. हा रेट रविवारी 14. 78 टक्के होता.
मीरा भाईंदर महानगरपालिकेत 1700 ऑक्सिजन बेड्स आहेत..त्यापैकी 194 पेशन्ट्स ऑक्सिजनवर आहे…
काल दिवसभरात 504 नवीन रुग्ण आढळून आले..
मनपा आरोग्य अधिकारी नंदकिशोर लहाने यांनी दिली माहिती…
रेल्वे किंवा खासगी बसेसच्या माध्यमातुन लातूरमध्ये येणाऱ्या प्रवाश्यांची कोविड चाचणी करण्यात येत आहे , यासाठी कोविड तपासणी पथकं नेमण्यात आली आहेत . कोरोनाची संख्या नियंत्रणात ठेवण्यासाठी महानगर पालिकेने हि पथक नेमली आहेत . लातूर जिल्ह्यात काल 410 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत . तर आता पर्यंतच्या कोविड रुग्णांची संख्या 96 हजार 376 इतकी झाली आहे .
जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी कोरोनाबाधित आढळून आल्याने कोरोना आजपासून अधिक कडक करण्यात आले आहेत.
जिल्हा परिषदेत आरोग्य, शिक्षण, महिला व बालकल्याण या विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. सोमवारीही आरोग्य विभागातील काही महिला कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले.
बीड जिल्हा रुग्णालयात कोरोनाचा शिरकाव झाला असून 6 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झालीय. त्यामुळे जिल्हा रुग्णालय प्रशासनात खळबळ माजली आहे. कोरोना बाधित रुग्णात 3 स्टाफ नर्स तर तीन शिकाऊ विध्यार्थ्यांचा समावेश आहे. या सगळ्यांवर कोरोना कक्षात उपचार सुरू आहेत. बाधित कर्मचाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या इतर कर्मचाऱ्यांनी देखील कोरोना चाचणी करून घेतली. मात्र त्यांना बाधा झाली नसल्याचे समोर आले आहे.
देशात गेल्या 24 तासात 2 लाख 38 हजार 018 रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारच्या तुलनेत आज आलेल्या आकडेवारीमध्ये 20 हजार रुग्णांची घट नोंदवण्यात आलीय. तर, मृतांची संख्या देखील कमी झालीय. दिवसभरात 310 जणांचा कोरोनामुळं मृत्यू झालाय. 24 तासात 1 लाख 57 हजार 421 जण कोरोना मुक्त झाले आहेत. देशात सध्या 17 लाख 36 हजार 628 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. तर पॉझिटिव्हीटी रेट देखील कमी होत 14.43 वर आला आहे. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 8891 वर गेली आहे.
India reports 2,38,018 COVID cases (20,071 less than yesterday), 310 deaths, and 1,57,421 recoveries in the last 24 hours.
Active case: 17,36,628
Daily positivity rate: 14.43%8,891 total Omicron cases detected so far; an increase of 8.31% since yesterday pic.twitter.com/CaYmWHCPKX
— ANI (@ANI) January 18, 2022
नागपूर मागील 24 तासात कोरोनाच्या 4 मृत्यू आणि 2451 वर गेलेल्या रुग्ण संख्येने वाढविली प्रशासनाची चिंता
सतत वाढत आहे रुग्ण संख्या
जिल्ह्यात 12 हजारांवर बाधित रुग्ण
टेस्ट करणार्या पैकी दर चौथा रुग्ण येतो आहे पॉझिटिव्ह
9 हजार च्या वर रुग्ण गृह विलगीकरन मध्ये
तर तर 3 हजार च्या जवळ रुग्ण वेगवेगळ्या रुग्णालयात
पुणे शहरात जानेवारी महिन्यात तब्बल 480 पोलीस कोरोनाबधित
430 कर्मचारी तर 50 अधिकाऱ्यांना कोरोनाची लागण…
मास्क विरोधातील कारवाई,नाकाबंदी दरम्यान पोलिसांचा हजारो नागरिकांशी होतोय संपर्क…
सर्वांना सौम्य लक्षणे असून घरीच उपचार सुरु
– कोरोना होम टेस्ट किटची वाढती मागणी,
– टेस्ट पॉझिटिव्ह आल्यास लगेच सरकारी अधिकाऱ्यांना कळवणे बंधनकारक,
– औषध विक्रेत्यांनी किट खरेदी करणाऱ्याचे नाव पत्ता आणि मोबाईल नंबर नोंदवून घेण्याचे आदेश,
– रेकॉर्डची तपासणी आरोग्य निरक्षकामार्फत केली जाणार
ओमिक्रॉनवर येणार स्वतंत्र लस,
– पुण्यातील जिनोव्हा बायोफार्मास्युटिकल्सकडून ओमिक्रॉनवर लस विकसित करण्यात येत आहे,
– एमआरएनए या तंत्रावर आधारित या लसीची मानवी चाचणी लवकरच सुरू होणार,
– त्यामध्ये या लसीची परिणामकारकता आणि प्रतिकारक क्षमतेच्या बाबतीत चाचणी होणार,
– त्यानंतर ती लस बाजारात येणार आहे.
मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने लोकही बदलू लागले आहेत.
दादरच्या भाजी मार्केटमध्ये पूर्वी तुफान गर्दी असायची, दूरदूरवरून लोक भाजी घेण्यासाठी यायचे.
पण आता लोकांची गर्दी कमी होऊ लागली आहे, आज दादरच्या भाजी मार्केटमध्ये पूर्वीपेक्षा कमी लोक दिसतात.
पण यामध्येही अनेक लोक आहेत जे कोरोनाच्या नियमांची पायमल्ली करत आहेत, अनेकांच्या चेहऱ्यावर मास्क नाही.
राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या बऱ्याच दिवसांनतर 40 हजाराच्या खाली आली आहे. सोमवारी राज्यात 31 हजार 111 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 24 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 29 हजार 092 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 68 लाख 29 हजार 992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 94.3 टक्केवर पोहोचला आहे.तर, राज्यातील मृत्यूदर 1.95 वर पोहोचला आहे. तर राज्यात सोमवारी ओमिक्रॉनच्या 122 रुग्णांची नोंद झाली आहे. यात सर्वाधिक रुग्ण पुण्यातील आहेत. पुण्यात 40, मीरा भाईंदर 29, नागपूर 26, औरंगाबाद 14, अमरावती 7, मुंबईत 3 रुग्ण आढळले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 1860 वर पोहोचली आहे. तर, 959 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
31,111 new cases have been reported in the state today
State tally of #COVID19 positive patients is now 72,42,921
District-wise details of cases and deaths until today are as follows:@airnews_mumbai@airnews_nagpur
(5/6) ? pic.twitter.com/3b7LwjA4zq
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) January 17, 2022