मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या 40 हजारांच्या खाली आली आहे. मंगळवारी राज्यात 14 हजार 372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 30 हजार 93 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 524 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77 लाख 35 हजार 481 वर गेलीय तर आतापर्यंत 73 लाख 35 हजार 481 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 3221 वर पोहोचली आहे. तर,1689 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
#Maharashtra #COVID19 Updates for today
*⃣New Cases – 14,372
*⃣Recoveries – 30,093
*⃣Deaths – 94
*⃣Active Cases – 1,91,524
*⃣Total Cases till date – 77,35,481
*⃣Total Recoveries till date – 73,97,352
*⃣Total Deaths till date – 1,42,705
*⃣Tests till date – 7,47,82,391(1/5)?
— PIB in Maharashtra ?? (@PIBMumbai) February 1, 2022
24 जानेवारीपासून नंदुरबार जिल्ह्यातील पाचवी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू झाल्यात शाळा सुरू झाल्यानंतर तब्बल 70 हजार विद्यार्थ्यांनी शाळेच्या पहिल्या आठवड्यात दांडी मारल्याचे समोर आलाय तर 89 शिक्षकांना कोरोणाची बाधा झाल्याने 20शाळा बंद करण्यात आल्या आहेत तर 21 हजार विद्यार्थ्यांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला आहे.
भारतात 1 लाख 61 हजार 386 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर देशात 16 लाख 21 हजार 603 सक्रिय कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे.
– नाशिकमध्ये गेल्या 24 तासात 6 कोरोना बाधितांच्या मृत्यूची नोंद
– 1486 रुग्ण कोरोना बाधित आढळून आल्याने पुन्हा आरोग्य विभाग चिंतेत
– मृत्यूचा आकडा वाढल्याने सर्वांचीच धाकधूक वाढली
धक्कादायक, नागपूर जिल्हयात पाच लाख लोकांनी घेतला नाही लसीचा दुसरा डोज
– कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मृत्यू झालेल्या 90 टक्के लोकांचे लसीकरण नाही
– लस न घेतलेल्यांसाठी तिसरी लाट धोकादायक
– लस घेण्याचं नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
– नागपूर जिल्ह्यात 15 ते 18 वयोगटातील 60टक्के लसीकरण पूर्ण
मंगळवारी राज्यात 14 हजार 372 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 94 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 30 हजार 93 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यात सध्या 1 लाख 91 हजार 524 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 77 लाख 35 हजार 481 वर गेलीय तर आतापर्यंत 73 लाख 35 हजार 481 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 3221 वर पोहोचली आहे. तर,1689 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.