मुंबई: महाराष्ट्रात (Maharashtra ) कोरोना (Corona) आणि ओमिक्रॉन (Omicron) वेरियंटचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असल्याचं समोर आलं आहे. राज्यात कोरोनाचा कहर सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यात दिवसभरात आढळून येणाऱ्या कोरोनाचा रुग्णांची संख्या 40 हजारांच्या खाली आली आहे. शनिवारी राज्यात 27 हजार 971 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 61 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिवसभरात 50 हजार 142 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 76 लाख 83 हजार 525 वर गेलीय तर आतापर्यंत 72 लाख 92 हजार 791 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत 1 लाख 42 हजार 522 जणांच्या मृत्यूंची नोंद झालीय. शनिवारी राज्यात 85 ओमिक्रॉन रुग्णाची नोंद झाली आहे. राज्यातील ओमिक्रॉन बाधित रुग्णांची संख्या 3125 वर पोहोचली आहे. तर,1674 जण ओमिक्रॉन संसर्गातून मुक्त झाल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.