नाशिकः जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 3 हजार 234 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 442 रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 22 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे. कोरोनाच्या ओमिक्रॉन विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासन दक्ष झाले आहे. दक्षिण आफ्रिकेत स्पर्धा जिंकून आलेल्या स्पर्धकांच्या कोरोना टेस्ट निगेटीव्ह आल्या आहेत. त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या घेतलेल्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांची कठोर अंमलबजावणी करणे अनिवार्य असल्याचे सांगितले आहे. ओमिक्रॉनचे 32 म्यूटन्ट आहेत. त्यात लगेच निर्बंध घातले जाणार नाहीत. मात्र, संख्या वाढल्यास निर्बंध लादावे लागतील, असा देण्यात आला आहे.
जिल्ह्याचे चित्र
नाशिक विभागातून आजपर्यंत लॅबमध्ये 79 लाख 54 हजार 739 अहवाल पाठविण्यात आले असून त्यापैकी 9 लाख 98 हजार 560 अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. नाशिक जिल्ह्यात आजपर्यंत 4 लाख 12 हजार 369 कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून, 4 लाख 03 हजार 182 रुग्ण पूर्णपणे बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तसेच 464 रुग्णांवर उपचार सुरू असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.77 टक्के इतके आहे. आजपर्यंत 8 हजार 724 रुग्णांचा मृत्यू झाला असून, जिल्ह्याचा मृत्यूदर 2.11 टक्के आहे.
उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण
नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 58, बागलाण 11, चांदवड 11, देवळा 6, दिंडोरी 15, इगतपुरी 3, कळवण 4, निफाड 95, सिन्नर 74, सुरगाणा 1, त्र्यंबकेश्वर 1, येवला 9 अशा एकूण 288 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 135, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 5, तर जिल्ह्याबाहेरील 14 रुग्ण असून असे एकूण 442 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 12 हजार 400 रुग्ण आढळून आले आहेत.
नियम पालनाचे आवाहन
सध्या जगभरात ओमिक्रॉनची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दक्ष व्हावे. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. सुरक्षित अंतराचे पालन करावे. प्रत्येकाने मास्क वापरावे. लसीकरणाकडे पाठ फिरवू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.
सद्यस्थितीत 442 रुग्णांवर उपचार सुरू आहे. उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 22 ने घट झाली आहे. तसेच आत्तापर्यंत 8 हजार 724 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
– अनंत पवार, जिल्हा नोडल अधिकारी
फडणवीसांनी मिळवलेले मराठा आरक्षण महाविकास आघाडी सरकारने घालवले, विनायक मेटेंचा हल्लाबोल
साहित्य संमेलनात राजकीय कलगीतुरा; महापौरांचा बहिष्कार, भाजप नेत्यांची नावे नसल्याने नाराज