नाशिक, दि. 11 जानेवारी 2024 | स्वामी विवेकानंद यांचे मार्गदर्शन देशातील युवकांसाठी प्रेरणादायक आहे. देशाची अर्थव्यवस्था जगातील पहिल्या पाचमध्ये आली आहे. देशातील स्टार्टअप कंपन्यांची संख्या जगात पहिल्या तीनमध्ये झाली आहे. एकापेक्षा एक इनोव्हेशन आता देशात होत आहे. देशभरातून विक्रमी संख्येने पेंटेट दाखल होत आहेत. यासर्वांचे आधार भारताचे युवापिढी आहेत. भारताच्या युवकांचे सामार्थ्यमुळे भारताचा डंका जगात वाजत आहे. भारताचा या यशामागे युवापिढी आहे. स्वातंत्र्याच्या या अमृतमहोत्सवात देशाला नवीन उंचीवर नेण्याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही असे काम करा की भारताचे नाव सुवर्ण अक्षरात लिहिले जाईल. यामुळे तुम्हाला मी २१ व्या शतकातील सर्वात भाग्यशील पिढी समजतो. माझा सर्वात जास्त विश्वास भारताच्या युवकांवर आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिकमध्ये सांगितले. राष्ट्रीय युवा दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. देशाच्या अर्थव्यवस्था पहिल्या तीनमध्ये आणण्याचे आपले उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वतंत्र्यापूर्वी अनेकांनी देशासाठी आपले जीवन दिले. त्यांनी देशाला नवी स्वप्न दिले. आता मेरा युवा भारत संघटनेच्या स्थापनेनंतर हा पहिला युवा दिन आहे. संघटनेची स्थापना होऊन ७५ दिवस झाले नाही परंतु एक कोटीपेक्षा जास्त युवकांनी या संघटनेत नाव नोंदणी केली आहे. तरुणांना मोकळीक देण्यासाठी सर्व अडथळे दूर करण्याचा आम्ही प्रयत्न केला. प्रत्येक क्षेत्रात त्यांना वाव देण्याचा आम्ही गेल्या दहा वर्षात प्रयत्न केला आहे. आम्ही एक आधुनिक आणि डायनॅमिक इको सिस्टिम करायला घेतली आहे.
राजमाता जिजाऊ यांना वंदन करण्यासाठी मी महाराष्ट्राच्या वीरभूमीत आलो, याचा मला अतिशय आनंद आहे. मी त्यांना कोटी, कोटी वंदन करतो. जिजाऊंनी शिवाजीसारखा महानायक आपणास दिला. अहिल्यादेवीसारखी महाशक्ती महाराष्ट्राच्या धरतीने दिली. सावित्रीबाई फुले यांनी शिक्षणाचे सार्वत्रिकरण केले. महाराष्ट्राच्या धर्तीवर अनेक महापुरुष घडले.
आजही आपण क्रांतीकारकांची आठवण करतो. त्यांनी इंग्रजांना नेस्तानाबूत केले होते. स्वातंत्र्यापूर्वी महापुरुषांनी देशाला मोठं योगदान दिलं. ते देशासाठी जगले आणि देशासाठीच देह ठेवला. काळ प्रत्येकाला त्याच्या जीवन काळात एक संधी देत असतो. भारताच्या तरुणांना ही संधी आहे. हा अमृत काळाचा कालखंड आहे. आज तुमच्याकडे इतिहास घडवण्याची संधी आहे. इतिहासात आपल्या नावाची नोंद करण्याची संधी आहे.