‘त्या’ विद्यार्थ्यांचा कॅनडा, अमेरिका, जपानला शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा; ठाणे पालिकेचं ‘वॉक इन’ लसीकरण

| Updated on: Jun 05, 2021 | 11:23 AM

परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या ठाण्यातील विद्यार्थांचा मार्ग मोकळा झाला आहे. (COVID-19 in Thane: 419 students traveling abroad get vaccinated)

त्या विद्यार्थ्यांचा कॅनडा, अमेरिका, जपानला शिक्षणासाठी जाण्याचा मार्ग मोकळा; ठाणे पालिकेचं वॉक इन लसीकरण
कोरोना लसीकरण
Follow us on

ठाणे: परदेशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या ठाण्यातील विद्यार्थांचा मार्ग मोकळा झाला आहे. या विद्यार्थ्यांचे वॉक इन पद्धतीने लसीकरण करण्यात आले आहे. आतापर्यंत 419 विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांचा अमेरिका, जपान, कॅनडा, फ्रान्स आणि स्पेनला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. (COVID-19 in Thane: 419 students traveling abroad get vaccinated)

परदेशातील विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षणासाठी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे, अशा विद्यार्थ्यांची लसीकरणाअभावी शैक्षणिक संधी वाया जावू नये म्हणून ठाणे पालिकेने लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून दिली होती. ठाणे महापालिका क्षेत्रातील विद्यार्थ्यांना माजीवडा येथील पोस्ट कोविड लसीकरण केंद्रात 31 मेपासून ‘वॉक इन’ लसीकरण महापालिकेच्यावतीने सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत 419 विद्यार्थ्यांना देण्यात आली असून यामध्ये युएस, कॅनडा, जपान, फ्रांस तसेच स्पेन या देशात उच्च शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना समावेश आहे.

म्युकरमायकोसिसच्या चार रुग्णांवर शस्त्रक्रिया

ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात यापूर्वी 5 म्युकरमायकोसिस रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया केल्यानंतर आता अजून 4 रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे. आतापर्यंत एकूण 9 रुग्ण उपचारांनंतर सुखरूप घरी परतले आहेत. कोरोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस या नवीन बुरशीजन्य रोगावर वेळेत योग्य उपचार घेतल्यास म्युकरमायकोसिस पूर्ण बरा होऊ शकतो. ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने हे शक्य करून दाखवले असून आजपर्यंत 9 म्युकरमायकोसिस रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यास डॉक्टरांच्या टीमला यश आहे.

सद्यस्थितीत कोरोना झाल्यानंतर म्युकरमायकोसिस लक्षणे असणाऱ्या रुग्णांना महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात तात्काळ दाखल करून त्यांच्यावर त्वरित उपचार करण्यात येत आहेत. पहिल्या टप्प्यात 5 तर सध्या 4 रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या असून योग्य उपचारांनंतर सर्व रुग्ण सुखरूप घरी परतले आहेत. म्युकरमायकोसिसच्या उपचार पद्धतीसाठी डेंटिस्ट, ईएनटी सर्जन आणि आय स्पेशालिस्ट,भूलतज्ञ आदी डॉक्टरांच्या एकत्रित टीमने या सर्व शस्त्रक्रिया केल्या आहेत. (COVID-19 in Thane: 419 students traveling abroad get vaccinated)

 

संबंधित बातम्या:

VIDEO : उल्हानगरमधील फिल्मी थरार, चोरी पकडली जाण्याच्या भीतीने चोराची थेट नदीत उडी, व्हिडीओ व्हायरल

ठाणे महापालिकेचे श्वानांच्या लसीकरणासाठी दीड कोटी; राष्ट्रवादी म्हणते, आधी माणसांचं लसीकरण करा

15 जूनपर्यंत मालमत्ता कर भरा, 10 टक्के सूट मिळवा; ठाणे पालिकेचं नागरिकांना आवाहन

(COVID-19 in Thane: 419 students traveling abroad get vaccinated)