पुणे : जिल्ह्यातील दौंडमधल्या भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू उपसा करणाऱ्या 20 यांत्रिक बोटी (Boat) महसूल आणि पोलिसांनी (Police) संयुक्तरित्या कारवाई करत जिलेटिनच्या सहाय्याने उद्धवस्त केल्या आहेत. यावेळी एक कोटी 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. भीमा नदीच्या पात्रात यांत्रिक बोटीच्या सहाय्याने दिवसाढवळ्या अवैध वाळू उपसा केला जात होता. हा प्रकार राजरोसपणे सुरू होता. दौंडचे उपविभागीय पोलीस अधिकारी (officer) राहुल धस, तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांनी थेट भीमा नदीच्या पात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या माफियांच्या 20 यांत्रिक बोटी नष्ट केल्या आहेत. यावेळी पोलीस आणि महसूल विभागाने केलेली संयुक्त कारवाई तब्बल 10 तास सुरु होती. वाळू माफियांचा दौंडमध्ये अतिरेक सुरु होता आहे. छुप्या मार्गाने केली जाणारी वाळू चोरी देखील डोकेदुखी ठरत आहे. मात्र, पोलीस अधिकाऱ्यांच्या या मोठ्या कारवाईमुळे वाळू चोरीला आळा बसू शकेल असं बोललं जातंय.
दौडमधील भीमा नदीच्या पात्रात अवैध वाळू माफियांवर कारवाई करुन पोलीस आणि महसूल विभागाने चांगलाच चोप दिल्याचं बोललं जातंय. याठिकाणी वाळू माफियांनी अवैधरित्या वाळू चोरी करण्याचा खुलेआम बाजार मांडला होता. मात्र, आता याला कुठेतरी आळा बसल्याचं बोललं जातंय. महसूल विभाग आणि पोलिसांच्या या कारवाईत 20 यांत्रिक बोटी नष्ट करण्यात आल्या आहेत. तर 10 तास चाललेल्या या कारवाईत एक कोटी 33 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
वाळू चोरीला आळा बसेल?
महसूल विभाग आणि पोलिसांनी दौंडमधील 20 यांत्रिकी बोटी नष्ट केल्या आहेत. मात्र, या कारवाईनंतर तरी वाळू माफियांचे उद्योग थांबतील का, याची सध्या दौंडमध्ये चांगलीच चर्चा आहे. महसूल विभाग आणि पोलिसांनी वेळोवेळी वाळू माफियांच्या मुसक्या आवळल्यास वाळू माफियांना लगाम बसू शकेल. आता दौंडमधील केलेल्या या कारवाईत वाळू माफियांवर लगाम लागू शकेल का, हे पाहणं महत्वाचं ठरेलं.
राज्यात फक्त पुण्यातील दौंडमध्येच नाही तर इतर ठिकाणी देखील वाळू माफियांचा हैदोस आहे. वाळू माफियांवर कारवाई केल्याप्रकरणी अधिकाऱ्यांवर हल्ले करण्यात आल्याचेही प्रकार राज्यात घडले आहेत. आता या सर्व प्रकरणाकडे गंभीरतेनं पाहत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाई करणं गरजेचं आहे. सातत्याने अशा प्रकारची कारवाई केल्यास अवैध वाळू उपसा होणार नाही आणि वाळू उपश्यावरही आळा बसेल.
इतर बातम्या