मनोहर शेवाळे, टीव्ही 9 मराठी, मालेगाव : एकीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) यांचे राजकीय बळ वाढत असतांना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मंत्री दादा भुसे ( Dada Bhuse ) हे मालेगाव धडक कारवाई करत आहे. मालेगाव महानगर पालिकेच्या माध्यमातून कचरा संकलित करण्याचे एका ठेकेदाराला देण्यात आले होते. त्यामध्ये ठेकेदाराकडून कचरा संकलित करत असतांना वजन काट्यावर फसवणूक करत असल्याचे मंत्री दादा भुसे यांनी उघडकीस आणले आहे. स्वतः दादा भुसे यांनी छापा टाकत कारवाई केल्यानं खळबळ उडाली आहे.
मालेगाव महानगर पालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या कचरा संकलन केंद्रावर स्वतः दादा भुसे यांनी छापा टाकत कारवाई केल्यानं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होऊ लागली आहे. यामध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा यानिमित्ताने समोर आला आहे.
मालेगाव शहरात कचरा संकलन करणाऱ्या वाहनांच्या वजन काट्यावरच मोठा घोटाळा केला जात होता. याशिवाय कचरा संकलित करणारी अनेक वाहनं तशीच धुळखात पडल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांचे यामध्ये दुर्लक्ष असल्याचे समोर आले असून त्यांचाही या घोटाळ्यात सहभाग आहे का ? अशी चर्चा आता होऊ लागली आहे. त्यामुळे स्वतः दादा भुसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
महानगर पालिकेच्या कचरा संकलन प्रकरणी चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. यामध्ये शहरातील कचरा संकलित करत असतांना होणारा घोटाला कोट्यवधी रुपयांचा आहे. त्यामुळे मालेगावकरांची मोठी फसवणूक होत असल्याचे समोर आले.
नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांनी वजन काटा सील करण्याचे आदेश दिले आहे. याशिवाय कचरा संकलित करणारी वाहने देखील तपासण्याचे आदेश दिले आहे. त्यामुळे मालेगाव महानगर पालिकेतील मोठा घोटाळा यानिमित्ताने समोर आला आहे.
दादा भुसे यांना काही दिवसांपूर्वी गोपनीय माहितीद्वारे कचरा संकलन करणाऱ्या ठेकेदाराकडून फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली होती. ठेकेदार वजन काट्यावर छेडछाड करत असल्याची माहिती मिळाली होती.
त्यावरून दादा भुसे यांनी अचानक कचरा संकलन होणाऱ्या ठिकाणी छापा टाकला यांनी तपासणी सुरू केली. यावेळी पालिकेच्या अधिकाऱ्यांची मोठी धावपळ बघायला मिळाली. दादा भुसे यांनी यावेळी पाहणी करत घोटाला सुरू असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वजन काट्यावरच फेरफार केल्याचे उघड झाले असून यावरून दादा भुसे यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले होते. शहरात सुरू असलेला हा कचरा घोटाळा चर्चेचा विषय ठरत असून भुसे यांनी मुख्यमंत्र्यांकडे कारवाईची मागणी केली आहे.