पुणे : पुणे, शिर्डी आणि कोल्हापूरमधील प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. पुणे (pune) शिर्डी आणि कोल्हापूरमधील (kolhapur) विमानतळांवरून लवकरच विमानांच्या उड्डानांची संख्या वाढवली जाणार आहे. उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. एप्रिलच्या पहिल्या पंधरवाड्यानंतर किंवा महिन्याच्या शेवटी परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षा झाल्यानंतर उन्हाळी सुट्यांना सुरुवात होते. या काळात प्रवाशांची संख्या जास्त असते. प्रवाशांची संख्या लक्षात घेऊन, संबंधित ठिकाणांवरून विमानांची उड्डाणे वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पुणे विमानतळ प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. शिर्डीला कायमच भाविकांची गर्दी असते. उन्हाळ्यामध्ये गर्दी आणखी वाढते. त्यामुळे शिर्डी विमानतळावरून देखील विमानाच्या फेऱ्या वाढवण्यात येणार आहेत. पुण्यातील विमान उड्डाने ही टप्प्या टप्प्याने वाढली जाणार आहेत.
कोरोना काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय विमान सेवा बंद होती. मात्र आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने आजपासून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवेच्या पार्श्वभूमीवर सर्वच विमान कंपन्यांनी या आधीच आपली तयारी पूर्ण केली आहे. भारतीय विमान कंपन्यांसोबतच एमिरेट्स सारख्या परदेशी विमान कंपन्या देखील नियमित उड्डाणे पुन्हा सुरू करणार आहोत. राजधानी दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून नियमित आंतरराष्ट्रीय उड्डाणांमध्ये वाढ होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे तोट्यात गेलेल्या विमान कंपन्यांसाठी हा मोठा दिलासा मानला जात आहे.
आजपासून पूर्ण क्षमतेने आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाली आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झाल्याने परदेशात जाणाऱ्या विमानांची संख्या देखील वाढणार आहे. विमान कंपन्यांच्या आपसातील स्पर्धेचा प्रवाशांना फायदा होऊ शकतो. विमान प्रवास स्वस्त होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. यापूर्वी काही ठराविकच विमानांचे उड्डाण होत असल्यामुळे तिकिटांच्या दरात देखील प्रचंड वाढ झाली होती.
Petrol,Diesel Price: आठवड्याभरात पाचव्यांदा दरवाढ, जाणून घ्या आपल्या शहरातील पेट्रोल, डिझेलचे भाव
आजपासून आंतरराष्ट्रीय विमानांच्या नियमित उड्डाणास परवानगी; विदेशवारी स्वस्त होणार?
यात्रा ऑनलाइन लवकरच घेऊन येतेय स्वतः चे IPO, सेबी पुढे मांडला प्रस्ताव!