LadKi Bahin Yojana : ‘..तर लाडकी बहीण योजना बंद होणार’, पाहा काय म्हणाले अजित पवार?

| Updated on: Oct 28, 2024 | 6:37 PM

लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे, ते बारामतीमध्ये बोलत होते.

LadKi Bahin Yojana : ..तर लाडकी बहीण योजना बंद होणार, पाहा काय म्हणाले अजित पवार?
Follow us on

निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे, विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला. ते बारामतीमध्ये आयोजित सभेत बोलत होते. त्यांनी लाडकी बहीण योजनेवरून विरोधकांवर निशाणा साधला. लाडकी बहिणींच्या खात्यात आचारसंहिता लागण्यापूर्वीच ऑक्टोबर नोव्हेंबरचे पैसे जमा झाले आहेत, त्यांना पैसे मिळताच तर तुमच्या का? पोटात दुखते असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. जर विरोधक सत्तेत आले तर लाडकी बहीण योजना बंद पाडण्याच्या हालचाली होऊ शकतता, योजनेसाठी पुन्हा आपलं सरकार आलं पाहिजे असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.

अजित पवार भावुक

दरम्यान यावेळी बोलताना अजित पवार चांगलेच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार यांना उभं करणं माझी चुक होती. जो काम करतो त्याच्याकडून चुका होतात. मी मोठ्या मनानं माझी चूक कबूल करतो. मात्र आता कोणाचं चुकलं? पहिला फॉर्म मी भरणार होतो. आम्ही सगळे तात्यासाहेब पवारांची फॅमीली. आम्ही बिकट परिस्थितीमधून वर आलो. आईने आधार दिला. आईने सांगितलं माझ्या दादाविरोधात फॉर्म भरू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्तींनी समजून सांगायला पाहिजे होतं. मात्र फॉर्म भरायला कोणी सांगितला तर साहेबांनी मग साहेबांनी आमचं घर फोडलं का? असा सवाल करताच अजित पवार यांना अश्रू अनावर झाले.

अजित पवार यांच्या डोळ्यात स्टेजवर अश्रू आल्याचं दिसताच तिथे उपस्थित असलेल्या महिला कार्यकर्त्या देखील चांगल्याच भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. दादा आता रडायचं नाही तर लढायचं अशी जोरदार घोषणाबाजी सभेसाठी आलेल्या या महिलांनी केली.  मी निवडणूक लढणार नव्हतो मात्र कार्यकर्त्यांचा आग्रह आणि महायुतीमध्ये ही जागा राष्ट्रवादीला सुटली असंही यावेळी अजित पवार यांनी म्हटलं आहे.