मुंबईः ठाकरे सरकार हे घाबरट, पळपुटं आहे. या सरकारचे पेपरफुटीशी थेट संबंध आहेत. या सरकारच्या काळात बलात्कार वाढले, गुन्हेगारीचं रेकॉर्ड वाढले. हे सरकार विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र करत आहे. नव्या विद्यापीठ कायद्याने येणाऱ्या काळात कुलगुरूंचा लिलाव होईल. एकीकडे मोदी भ्रष्टाचार मुक्त कारभार करत आहेत, तर दुसरीकडे भ्रष्टाचार युक्त कारभार सुरू आहे, असा घणाघात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.
राज्यपालांची कटपुतळी…
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी आज बुधवारी मुंबईत भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन केले. यावेळी फडणवीस यांनी ठाकरे सरकारची अक्षरशः पिसे काढली. ते म्हणाले, महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा काळा आहे. त्यावर एक व्यक्ती विद्यापीठाचा, एक राज्यपालाचा आणि तीन व्यक्ती सरकारचे असतील. त्यामुळे या कायद्यामुळे राज्यपालही कटपुतळी बनतील असा दावा त्यांनी केला.
कुलगुरू पदाचा लिलाव होईल…
फडणवीस म्हणाले की, भाजप सरकारने केलेल्या विद्यापीठ कायद्याचे तामिळनाडूच्या राज्यपालांनी कौतुक केले. ते म्हणाले, मी तमिळनाडूतील विद्यापीठात खूप भ्रष्टाचार पाहिला. कुलगुरू निवडीचे 10 कोटी घेतात. त्यांनी हे बोलून दाखवत आम्ही केलेला कायदा जसाच्या तसा तामिळनाडूत लागू केला. मात्र, आता तोच कायदा बदलला आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात कुलगुरू पदाचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही, असा दावा त्यांनी केला. मग असे कुलगुरू काय शिक्षण देतील. ते बोलीच्या दप्पट माल कमवायचं बघतील. या शिक्षणाचे पवित्र क्षेत्र अपवित्र करतील, असा दावा त्यांनी केला.
पिढ्या माफ करणार नाहीत…
फडणवीस म्हणाले, जेवढ्या नेमणुका सरकारने आपल्या हाती घेतल्या आता तिथे युवासेनेची मुले तिथे बसतील. विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे पिढ्या बरबाद करण्याचे षडयंत्र आहे. आपण आज लढलो नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. वेळी आमची विद्यापीठे विकली जात होती, ती राजकारणाची अड्डे बनत होती, तेव्हा तुम्ही काय करत होतात, असा प्रश्न येणाऱ्या पिढ्या विचारतील. एकीकडे मोदी भ्रष्टाचारमुक्त कारभार करत आहेत, तर दुसरीकडे ठाकरे सरकारचा भ्रष्टाचारयुक्त कारभार असल्याचा दावा त्यांनी केला.
LIVE | Addressing #BJYM State Executive Meeting in Mumbai.
भारतीय जनता युवा मोर्चा, प्रदेश कार्यकारिणी बैठकीला मुंबई येथे संबोधित करीत आहे.@BJYM @BJYM4MH https://t.co/bPlPUeixUC— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 5, 2022
कोविडमागे लपतात…
फडणवीस म्हणाले, महाविकास आघाडी सरकार जेव्हा-जेव्हा काळी कामे करते, तेव्हा-तेव्हा कोविडच्या मागे लपते. कोविड आहे. नाही असे नाही. मात्र, सरकारचे मोर्चे आणि त्यांची स्वागतकामे, समारंभासाठी कोविड नसतो. जेव्हा-जेव्हा काळी कामे केली जातात. त्याविरोधात आवाज उठवला की यांना कोविड आठवतो, असा आरोप त्यांनी केला. ते पुढ म्हणाले की, राज्य सरकारने विद्यापीठ कायद्याचे विधेयक अवैध पद्धतीने मंजूर केले. काळ्या रात्री, काळे काम करणारे हे विधेयक पास केले. ही काळी कामं करणारी लोकं आहेत. यांच्याविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा त्यांनी दिला.
इतर बातम्याः
Nashik Corona| नाशिकमध्ये कोरोनाचा वणवा, रुग्णसंख्येचा विस्फोट झाल्याने बाधित हजारापल्याड
Nashik Election| प्रभागरचना 15 जानेवारीपर्यंत लांबणीवर; महापालिका निवडणूक पुढे ढकलणार?
Panchayat Election|नाशिकमध्ये 4 नगरपंचायतींच्या 11 जागांसाठी 38 उमेदवार रिंगणात