Devendra Fadnavis : किडक्या डोक्याच्या लोकांनी श्रीमंत शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली; फडणवीसांचा निशाणा नेमका कुणावर?

| Updated on: May 29, 2022 | 12:15 PM

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्या गादीचा एक सन्मान आहे. त्यामुळे त्यांनी कोणतंही मत व्यक्त केलं असलं तरी मी त्यावर बोलणार नाही.

Devendra Fadnavis : किडक्या डोक्याच्या लोकांनी श्रीमंत शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली; फडणवीसांचा निशाणा नेमका कुणावर?
किडक्या डोक्याच्या लोकांनी श्रीमंत शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली; फडणवीसांचा निशाणा नेमका कुणावर?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नागपूर: संभाजी छत्रपती (sambhaji chhatrapati) यांना अपक्ष उमेदवार म्हणून उभं करण्यामागे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांची खेळी होती, असा गंभीर आरोप श्रीमंत शाहू छत्रपती महाराज (shrimant Shahu chhatrapati) यांनी केला होता. श्रीमंत शाहू छत्रपती यांनी केलेल्या या आरोपामुळे भाजपची चांगलीच कोंडी झाली असून शिवसेनेने या मुद्द्यावरून भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. काही किडक्या डोक्यांच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून श्रीमंत शाहू महाराजांना चुकीची माहिती दिली. अशा प्रकारची माहिती देऊन या लोकांनी एकीकडे संभाजी छत्रपती यांना खोटं ठरवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे शाहू महाराज आणि संभाजीराजे यांच्यात काही तरी अंतर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न केला याचं दु:ख वाटतं, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. तसेच मला भेटण्यापूर्वीच संभाजीराजेंनी अपक्ष निवडणूक लढणार असल्याचं जाहीर केलं होतं, असा खुलासा करत फडणवीस यांनी शाहू महाराजांनी केलेला आरोप खोडण्याचा प्रयत्नही केला.

देवेंद्र फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. शाहू महाराज आमचे छत्रपती आहेत. त्या गादीचा एक सन्मान आहे. त्यामुळे त्यांनी कोणतंही मत व्यक्त केलं असलं तरी मी त्यावर बोलणार नाही. त्या संदर्भात स्वत: संभाजीराजेंनी दिलेली प्रतिक्रिया बोलकी आहे. संभाजीराजेंनी ट्विट करून सांगितलंय की, मी छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून सांगतो, मी जे बोललो ते सत्य बोललो. ही प्रतिक्रिया पुरती बोलकी आहे. मला एकाच गोष्टीचं दु:ख आहे की, काही किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून महाराजांना चुकीची माहिती दिलेली दिसते. हे लोक एकीककडे महाराजांना अशी माहिती देऊन संभाजीराजेंना खोटं ठरवत आहेत. दुसरीकडे महाराज आणि युवराजांमध्ये काही तरी अंतर आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. असं काम करत आहेत. त्यांच्या या वागण्याबद्दल दु:ख आहे, असं फडणवीस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

ते लोक उघडे पडतील

संभाजीराजे माझ्याकडे आभार मानायला आले होते. त्यापूर्वीच त्यांनी कोणत्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही. मी स्वतंत्र उभा राहणार आहे हे आधीच जाहीर केलं होतं. मला भेटल्यावर त्यांनी हेच सांगितलं. मी कोणत्याही पक्षाचं तिकीट घेणार नाही. माझी अपेक्षा आहे, आमच्या घराण्याची परंपरा पाहता. मागच्यावेळी राष्ट्रपती कोट्यातून मला राज्यसभेत पाठवलं. तसंच सर्व पक्षांनी मिळून अपक्ष म्हणून मला समर्थन दिलं पाहिजे. त्यावेळी त्यांना मी आमच्या पक्षाचा निर्णय माझ्या हातात नसतो. आमच्या हायकमांडच्या हाती असतो. पण तुम्हाला सर्वचजण पाठिंबा देत असतील तर अशा परिस्थितीत जरूर हायकमांडशी चर्चा करेल, असं मी त्यांना सांगितलं होतं. मला या व्यतिरिक्त काही सांगायचं नाही. काही लोक ज्या प्रकारचं राजकारण करतात ते उघडे पडतील, असंही ते म्हणाले.