देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गिफ्ट, वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ

| Updated on: Jul 07, 2024 | 8:27 PM

देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे. विशेष म्हणजे मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्याकडून गिफ्ट, वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ
देवेंद्र फडणवीस
Follow us on

उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वीज कंपनीच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी ऊर्जा विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ केली आहे. विशेष म्हणजे मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे वीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात येत असल्याची माहिती, उमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली आहे.

सह्याद्री अतिथी गृह येथे आज ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या वेतन पुनर्निर्धारण करण्याबाबत बैठक पार पडली. या बैठकीत देवेंद्र फडणीस बोलत होते. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांनी वीज विभागाच्या कर्मचाऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला.

या बैठकीस ऊर्जा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव आभा शुक्ला, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र, महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. पी. अनबलगन, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजीव कुमार या तीनही कंपन्याचे वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी, तसेच संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

तीनही वीज कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के आणि सर्व भत्त्यामध्ये 25 टक्के वाढ देण्याचे मान्य केले आहे. तसेच सहाय्यकांना परिविक्षाधीन कालावधीकरीता 5 हजार रुपयांची वाढ आणि तांत्रिक कर्मचारी यांना मिळणारा 500 रुपयांचा भत्ता आता 1000 रुपये इतका करण्यात आला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.