jalna lathi charge | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा नेमकं काय म्हणाले फडणवीस

| Updated on: Sep 01, 2023 | 9:00 PM

जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेवर देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी या घटनेवरुन देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केलीय. त्यामुळे फडणवीस यांनी शरद पवार यांना या मुद्द्यावरुन काही प्रश्न विचारले आहेत.

jalna lathi charge | उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया, पाहा नेमकं काय म्हणाले फडणवीस
Follow us on

जालना | 1 सप्टेंबर 2023 : जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून आज लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्जच्या घटनेवर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “जालन्यातील घटना खरोखर दुर्देवी आणि गंभीर आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: त्याठिकाणी असलेल्या उपोषणकर्त्यांशी बोललो होते. आमचा विविध प्रकारे संवाद सुरु होता. त्यांनी उपोषण मागे घ्यावं, कारण मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर सरकार गंभीरपणे काम करत आहे. पण हा विषय न्यायालयाशी संबंधित विषय आहे. तो एका दिवसात सुटणार नाही. तो सोडवण्याकरता वेगवेगळे प्रयत्न सुरु आहेत, अशाप्रकारे आम्ही त्यांची समजूत काढत होतो. पण ते ऐकत नव्हते”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“उपोषणकर्त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. ही राज्याची जबबादारी आहे की, अशाप्रकारे उपोषण होत असेल, तब्येत खबार होत असेल तर त्यांना रुग्णालयात दाखल करणं जरुरीचं आहे. प्रशासन कालही त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी गेलं होतं. पण त्यांनी तुम्ही उद्या या, असं सांगितलं. प्रशासन आज पुन्हा गेलं आणि विनंती केली. पण आज पोलिसांना घेरुन दगडफेक करण्यात आली. 12 पोलीस जखमी झाले. त्यानंतर तिथे लाठीचार्ज करण्यात आला”, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

‘अशाप्रकारे सरकारला कुणाला मरु देता येणार नाही’

“लाठीचार्जमध्ये कुणी जखमी होऊ नये यासाठी प्रयत्न केला गेला. लाठीचार्ज कमी झाला, अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडण्यात आला ते नसतं झालं तर पोलीस पथकाला अतिशय वाईट परिस्थितीला सामोरं जावं लागलं असतं. राज्य सरकार या विषयी अतिशय संवेदनशील आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“आम्ही मराठा समजाला आरक्षणाला दिलं होतं. पण नंतर सर्वोच्च न्यायालयात आरक्षण का टिकलं नाही यांची आपल्या सर्वांना कल्पना आहे. पण आताही एकनाथ शिंदेंनी समिती तयार केली आहे. वेगवेगळ्या मागण्यांवर प्रयत्न सुरु आहेत. मराठा आंदोलावर सरकार गंभीर असल्यामुळे कायदा कुणीही हातात घेऊ नये”, असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलं.

“विशेषत: अशाप्रकारे लोकं एखाद्या व्यक्तीला उपोषणाला बसवून, सगळ्यांनी त्याला घेरुन ठेवायचं आणि मरण्यावर ठेवायचं, सरकार बघ्याची भूमिका घेऊ शकत नाही. सरकारला त्यांना वाचवायलाच लागेल. अशाप्रकारे सरकारला कुणाला मरु देता येणार नाही. त्यामुळे पोलिसांना भूमिका घ्यावी लागली. या प्रकरणी चौकशी केली जाईल. कुणाचीही चूक आढळ्यास कारवाई केली जाईल. सर्वांनी शांतता राखावी, अशी माझी विनंती आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांचे शरद पवार यांना सवाल

“माझी विरोधी पक्षांना विनंती आहे. मी हे शब्द वापरतोय त्याबद्दल माफ करा. पण बहती गंगा में हात धुना बंद करा. कालपर्यंत जे लोकं मराठा आरक्षण मिळू शकत नाही. मराठ्यांना आरक्षणाची आवश्यकता नाही असे म्हणणारे ज्येष्ठ नेते आज अचानक लगेच प्रतिक्रिया देत आहेत. सरकारने जाणीवपूर्वक केलं का, एका समाजाबद्दल आकस आहे का? असा सवाल विचारत आहेत, असं फडणवीस म्हणाले.

“माझा त्यांना सवाल आहे, त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं, त्या समाजाच्या आरक्षणाबद्दल काय केलं ते दाखवावं, आम्ही मराठा समाजाला आरक्षण दिलं. हायकोर्टात टिकवून दाखवलं. तुमच्या सरकारच्या काळात ते सुप्रीम कोर्टात गेलं. पण हरकत नाही. हे जे लोक राजकारण करत आहे त्यांनी ते बंद करावं. हे अशोभनीय आहे. मुख्यमंत्री मराठा आरक्षणासाठी कारवाई करत आहे. त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.