नागपूर : 29 ऑगस्ट 2023 । महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे एका प्रकरणामुळे अडचणीत आले आहेत. नागपूरच्या एका वकिलाने त्यांना थेट न्यायालयीन प्रक्रियेत ओढले होते. विशेष म्हणजे देवेंद्र फडणवीस यांना न्यायालयात खेचणारा हा वकील जेलमध्ये असून त्यांच्यावर नुकताच मकोका कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे. त्या वकिलासोबत त्याच्या सहा साथीदारांनाही मोक्का लावण्यात आला आहे. मात्र, त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्या प्रकरणात कारवाईची टांगती तलवार कायम आहे.
नागपूरचे वकील सतीश उके यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या गुन्हेगारी प्रकरणांची माहिती लपवल्याचा आरोप सतीश उके यांनी केला होता. तसेच वकील उके यांनी फडणवीस यांच्याविरोधात स्थानिक न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.
सतीश उके यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर काही दिवसांनी ईडीने उके अटक केली. नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टचे (एनआयटी) विभागीय अभियंता पंकज पाटील यांच्या या तक्रारीनंतर उके यांची तब्बल १२ तास चौकशी केली होती. टी कागदपत्र तयार करणे आणि त्या माध्यमांतून ब्लॅकमेल करणे असा वकील उके यांच्यावर मुख्य आरोप होता. या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली. सध्या वकील उके हे तुरुंगात सजा भोगत आहेत. ही दिवसांपूर्वी वकील उके यांना नागपूर पोलिसांनी MCOCA लावला. वकील उके यांच्यासह अन्य सहा आरोपी यांच्यावरदेखील MCOCA अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.
वकील सतीश उके यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2014 च्या निवडणूक प्रतिज्ञापत्रात दोन गुन्हे लपविल्यासंदर्भात याचिका दाखल केली होती. मात्र, नागपूर न्यायालयाच्या निर्णयाविरोधात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणावर खालच्या न्यायालयात सुनावणी घ्यावी असा निर्णय दिला होता.
त्यानुसार नागपूर खंडपीठाने नागपूर खंडपीठाने या प्रकरणी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेतली. दोन्हीं बाजूचा अंतिम युक्तिवाद पूर्ण झाला आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस यांचे वकील सुबोध धर्माधिकारी यांनी बाजू मांडताना ‘हे दोन गुन्हे नजरचुकीने सुटले आहे, यापेक्षा अधिक गंभीर गुन्ह्याची माहिती प्रतिज्ञापत्रात दिली आहे’ अशी माहिती युक्तिवादारम्यान दिली.