Devendra Fadnavis : ‘सावरकर गोमांस खायचे’, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

| Updated on: Oct 03, 2024 | 1:58 PM

Devendra Fadnavis : "गांधी हे हिंदू सांस्कृतिक रुढीवादाचे मूर्तिमंत उदाहरण होते. पण ते कट्टर शाकाहारी होते. त्याचवेळी तो लोकशाहीवादी नेते असल्याचे गुंडुराव म्हणाले. तर मोहम्मद जिना हे कधीच कट्टरपंथी नव्हते. पण सावरकर कट्टर होते. काही लोकांचा असा पण दावा आहे की जिना निषेध मानलेल्या डुकराचे मास चवीने खायचे"

Devendra Fadnavis : सावरकर गोमांस खायचे, काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
आरोग्य मंत्र्यांच्या विधानाने तापले राजकारण
Follow us on

कर्नाटकचे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री दिनेश गुंडुराव यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल वक्तव्य केलं आहे. त्यावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ‘स्वातंत्र्यवीर सावरकर ब्राह्मण होते. पण ते गोमांस खात होते’ असा दावा गुंडुराव यांनी केला. इतकेच नाही तर त्यांनी गोमांस खाण्याचा प्रचार केल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला. “सावरकरांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नाही. याबाबतीत त्यांचे विचार अत्यंत पुढारलेले होते” असे गुंडुराव म्हणाले. त्यांचे विचार कट्टर असले तरी दुसऱ्या बाजूने ते आधुनिक होते असे ते म्हणाले. एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सावरकरांनी कधीच गोहत्येचा विरोध केला नाही. याबाबतीत त्यांचे विचार अत्यंत पुढारलेले होते, असे गुंडुराव म्हणाले. त्यांचे विचार कट्टर असले तरी दुसऱ्या बाजूने ते आधुनिक होते असे ते म्हणाले. ब्राह्मण असले तरी सावरकर सार्वजनिक गोमांस खायचे. त्याचा प्रचार करायचे, असा गुंडुराव म्हणाले. त्यांनी भाषणात महात्मा गांधी आणि पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद जिना यांचा उल्लेख केला. गांधी हे हिंदू सांस्कृतिक रुढीवादाचे मूर्तिमंत उदाहरण होते. पण ते कट्टर शाकाहारी होते. त्याचवेळी तो लोकशाहीवादी नेते असल्याचे गुंडुराव म्हणाले. तर मोहम्मद जिना हे कधीच कट्टरपंथी नव्हते. पण सावरकर कट्टर होते. काही लोकांचा असा पण दावा आहे की जिना निषेध मानलेल्या डुकराचे मास चवीने खायचे. पण नंतर ते मुस्लिमांचे हिरो ठरले, असा सूर पण गुंडुराव यांनी आळवला.

स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल फडणवीस काय म्हणाले?

काँग्रेस नेते दिनेश गुंडुराव यांनी स्वातंत्र्यवीर सावकरांबद्दल जे वक्तव्य केलं, त्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारलं. फडणवीस म्हणाले की, “यांना सावरकर बद्दल काहीच माहिती नाही. सावरकरांनी गायीवरील आपले विचार योग्य पद्धतीने मांडले होते. त्यांचं म्हणणं होतं की, गाय शेतकऱ्याच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत मदत करते. म्हणून आम्ही गायीला एक ईश्वरीय दर्जा दिला आहे. सावरकरांबद्दल चुकीचे वक्तव्य करणे हे राहुल गांधींनी सुरू केले आहे, त्यालाच इतर नेते पुढे नेत आहेत”