Maharashtra Assembly Elections : भाजपला राज्यात अभूतपूर्व यश, गेम नेमका कुठं पलटला? फडणवीसांनी सांगितला तो क्षण

| Updated on: Nov 23, 2024 | 3:31 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, भाजपचे उमेदवार जवळपास 130 जागांवर आघाडीवर आहेत. महायुतीला दणदणीत यश मिळालं आहे, यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Maharashtra Assembly Elections : भाजपला राज्यात अभूतपूर्व यश, गेम नेमका कुठं पलटला? फडणवीसांनी सांगितला तो क्षण
Follow us on

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल हाती येत आहेत. 2019 मध्ये विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर राज्यातील दोन प्रमुख पक्षात फूट पडली होती. तसेच राज्यात महायुतीचं सरकार आल्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली मोठं मराठा आंदोलन उभं राहिलं. या सर्व पार्श्वभूमीवर या निकालाकडे राज्याचंच नाही तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. अखेर आता जवळपास निवडणूक निकालाचं चित्र स्पष्ट झालं आहे. महायुतीला राज्यात स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे, तर महाविकास आघाडीची प्रचंड पिछेहाट झाली आहे.

भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे, भाजपचे उमेदवार जवळपास 130 जागांवर आघाडीवर आहेत. तर त्यानंतर शिवसेना शिंदे गट 55 जागांवर आघाडीवर आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटानं देखील जोरदार मुसंडी मारली आहे, अजित पवार यांचे उमेदवार 40 जांगावर आघाडीवर आहेत. मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडी केवळ 50 जागांवर आघाडी आहे.

दरम्यान यावर आता भाजप नेते आणि मुख्यमंत्रिपदाचे प्रबळ दावेदार देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. हा आमच्या एकजुटीचा विजय आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, महाविकास आघाडीनं आम्हाला ठरवून टार्गेट केलं, जेव्हा एखाद्याला ठरवून टार्गेट केलं जातं तेव्हा ते लोकांच्या लक्षात येतं. त्यामुळे मतदार आमच्या बाजुनं राहिले. यावेळी विरोधकांनी पुन्हा एकदा फेक नॅरेटीव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला, मात्र यावेळी त्यांचा प्रयत्न फसला. आम्ही अधुनिक अभिमान्यू आहोत, चक्रव्यूह तोडून दाखवला असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.

आमच्या पक्षानं आमच्या कार्यकर्त्यांनी केवळ भाजपसाठी काम केलं नाही तर महायुतीमध्ये जेवढे मित्र पक्ष होते त्यांच्या उमेदवारांसाठी देखील काम केलं. हा आमच्या एकजुटीचा विजय आहे. लाडक्या बहिणींचे विशेष आभार मानतो. मी महाराष्ट्राच्या जनतेपुढे नतमस्तक आहे. मराठा आणि ओबीसी समाज हा पहिल्यापासून आमच्या पाठिशी आहे, होता आणि राहील. जेपी नड्डा आणि अमित शाह यांचे आभार मानतो. या निकालानं पुन्हा एकदा सिद्ध केलं की राज्यातील जनता ही महाराष्ट्राच्या पाठिशी आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.