उद्धव ठाकरे यांनी दोस्तीचा हात दिला तर काय करणार? देवेंद्र फडणवीस पाहा काय म्हणाले?

| Updated on: Oct 28, 2024 | 9:41 PM

"भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजवर टीका केली तर पक्ष कमजोर होईल. त्यामुळे मला टार्गेट केलं जातं. माझ्यावरच विरोधकांची तोफ धडाडते. मला अभिमन्यू सारखं घेरलं जातं. पण मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्र तोडून यायचं मला माहीत आहे. मी तोडू शकतो", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

उद्धव ठाकरे यांनी दोस्तीचा हात दिला तर काय करणार? देवेंद्र फडणवीस पाहा काय म्हणाले?
उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस
Follow us on

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘टीव्ही9 सत्ता संमेलन’ कार्यक्रमात विशेष मुलाखत दिली. यावेळी त्यांनी विविध प्रश्नांवर रोखठोक उत्तरे दिली. यावेळी त्यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दोस्तीचा हात मिळवायला आले तर काय निर्णय घेणार? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली. “दोस्ती करायची आहे हे उद्धव ठाकरेंनीच विचारलं पाहिजे. ते माझं अस्तित्व संपवायला निघाले आहेत. माझं अस्तित्व संपवण्यास निघालेला व्यक्ती माझ्याशी दोस्ती करेल का. राजकारणात जर तरला जागा नसते. वास्तव हे वास्तव आहे. त्यावेळी काय होतं यावर परिस्थिती निर्भर असते”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली. यावेळी त्यांना तुम्हीच विरोधकांच्या रडावर का? असादेखील प्रश्न विचारण्यात आला. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली. “कारण भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. भाजवर टीका केली तर पक्ष कमजोर होईल. त्यामुळे मला टार्गेट केलं जातं. माझ्यावरच विरोधकांची तोफ धडाडते. मला अभिमन्यू सारखं घेरलं जातं. पण मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्र तोडून यायचं मला माहीत आहे. मी तोडू शकतो”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“१९८० मध्ये मराठा आंदोलन सुरू झालं. अण्णासाहेब पाटील यांनी काँग्रेस सरकारला आरक्षणासाठी तीन दिवसाचा अल्टिमेटम दिला होता. सरकारने दिलं नाही. त्यांनी गोळी मारून जीव दिला. तेव्हापासून मराठा समाजाचं आंदोलन सुरू आहे. शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री झाले. काँग्रेसचे अनेक मुख्यमंत्री झाले. पण आरक्षण दिलं नाही. आमच्या सरकारने आरक्षण दिलं. पण ठाकरे सरकारने घालवलं. शिंदे सरकारने १० टक्के आरक्षण दिलं. राज्यात आरक्षण सुरू आहे. आंदोलकांना हे आरक्षण नको. त्यांना ओबीसीतून आरक्षण हवं. मी त्यांना म्हटलं तुम्हाला ओबीसीतून आरक्षण हवं तर तुम्ही शरद पवार आणि उद्धव ठाकरेंकडून लिहून घ्या की तुमचं सरकार आलं तर ओबीसीतून आरक्षण द्यायला तयार आहे. तुम्ही त्यांना पाठिंबा द्या”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस जरांगे यांच्याबद्दल काय म्हणाले?

यावेळी देवेंद्र फडणवीस यांना मराठा नेते मनोज जरांगे पाटील आपल्या विरोधात का टीका करतात? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “मनोज जरांगे माझ्या विरोधात का? हे त्यांना विचारलं पाहिजे. ज्या गोष्टी माझ्या अंतर्गत येत नाही. माझ्याकडे जे खातं नाही त्याबाबत ते मलाच दोषी ठरवलं जात आहे. माझ्या विरोधात बोलल्याने त्यांना फायदा होईल. म्हणून ते बोलत आहेत”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस शेतकरी आत्महत्येवर काय म्हणाले?

“एक जरी शेतकऱ्यांनी आत्महत्या करणं हे राज्यासाठी लज्जास्पद आहे. आत्महत्येची विरासत काँग्रेसने दिली आहे. आकड्यात जाणार नाही. पण त्याचं एक प्रमुख कारण म्हणजे विदर्भात शेती केवळ पाण्यावर आवलंबून आहे. पाच वर्षात आमच्या सरकारने विदर्भात २५ हजार कोटींचे इरिगेशनचे प्रकल्प केले. आता हळूहळू पाणी येत आहे. आम्हाला मोदींनी पाठिंबा दिला. पैसे दिले. ९५ प्रकल्प आम्ही पूर्ण केले. वैणगंगा आणि वैनगंगा नदीजोड प्रकल्पातील अडचणी दूर केल्या आहेत. हा प्रकल्प झाला तर १० लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येईल. ८० हजार कोटी खर्च होईल. विदर्भातील दुष्काळ दूर होईल”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.