औरंगाबादमध्ये भाजपाचा बॅनर, देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत चर्चा मात्र पंकजा मुंडे यांचीच, काय आहे कारण ?

| Updated on: Jan 25, 2023 | 3:41 PM

राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा फोटो नसल्याने चर्चेला उधाण आले आहे, भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावललं जात असल्याची चर्चाही औरंगाबादमध्ये होऊ लागली आहे.

औरंगाबादमध्ये भाजपाचा बॅनर, देवेंद्र फडणवीस यांचं स्वागत चर्चा मात्र पंकजा मुंडे यांचीच, काय आहे कारण ?
Image Credit source: Google
Follow us on

दत्ता कानवटे, टीव्ही 9 मराठी, औरंगाबाद : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. त्यानिमित्ताने औरंगाबादमध्ये ठिकठिकाणी भाजपाच्या वतिने बॅनर लावण्यात आले आहे. त्या बॅनर आजी माजी आमदार मंत्र्याचे फोटो आहेत. मात्र, राष्ट्रीय नेत्या असलेल्या पंकजा मुंडे यांचा फोटो नसल्याने औरंगाबाद मध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. खरंतर पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज आहे का ? अशी चर्चा वारंवार होत आहे. त्याच निमित्ताने भाजपकडून लावण्यात आलेल्या बॅनरवर पंकजा मुंडे यांचा फोटो नसल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक असताना कार्यालय परिसरातील हे बॅनर लावण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांच्यावर भाजपमधून अन्याय केला जात असल्याची चर्चाही औरंगाबाद शहरात यानिमित्ताने होऊ लागली आहे. पंकजा मुंडे राष्ट्रीय नेत्या असतांना त्यांचा बॅनरवर फोटो नसल्याने भाजपच्या गोटात जोरदार चर्चा होऊ लागली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी भाजपकडून बॅनर लावण्यात आले आहे. त्यावर पंकजा मुंडे यांचा फोटो गायब असल्याचे पाहायला मिळाले आहे.

हे सुद्धा वाचा

राष्ट्रीय नेत्या पंकजा मुंडे यांचा फोटो नसल्याने चर्चेला उधाण आले आहे, भाजपकडून पंकजा मुंडे यांना डावललं जात असल्याची चर्चाही औरंगाबादमध्ये होऊ लागली आहे.

आजी-माजी नेत्यांचे फोटो बॅनरला मात्र पंकजा मुंडे यांचे फोटो नसल्याचे औरंगाबादच्या विभागीय आयुक्त कार्यालयातील चित्र नवा वाद उभा राहण्यासाठी निमित्त ठरू शकतं.,