परळी : राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी आज वाढदिवसानिमित्त गोपीनाथगड जात गोपीनाथराव मुंडे यांच्या स्मृतिस्थळाचं दर्शन घेतलं. त्याचबरोबर त्यांनी नाथरा इथं पंडित अण्णा मुंडे यांच्या पुतळ्यालाही पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतलं. 15 जुलै हा धनंजय मुंडे यांचा जन्मदिवस आहे. दरवर्षी राज्यभरातून मुंडेंचे समर्थक मोठ्या संख्येने परळीमध्ये त्यांना शुभेच्छा देण्यासाठी येत असतात. परंतु कोरोनामुळे लागू असलेल्या निर्बंधांमुळे यावर्षी धनंजय मुंडे यांचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला. (Social Justice Minister Dhananjay Munde’s birthday celebrated simply)
मंत्रिमंडळातील अनेक सहकारी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि समर्थकांकडून धनंजय मुंडे यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी आज गोपीनाथ गडावर जाऊन गोपीनाथराव मुंडे यांना आदरांजली वाहिली आणि भिवादन केलं. त्याचबरोबर वडील पंडित अण्णा मुंडे यांच्या स्मृतिस्थळावर जात पुष्पहार अर्पण करून दर्शन घेतले. तसंच नाथरा या त्यांच्या जन्मगावी जाऊन त्यांनी हनुमान मंदिरातही दर्शन घेतलं.
समाजकारण आणि राजकारणात मी आज उभा आहे. त्यामध्ये जनतेचे मला मिळालेले अभूतपूर्व प्रेम आणि आशीर्वाद हीच माझी शिदोरी आहे. आज मी राजकारणात जो काही आहे तो जनतेच्या आशीर्वादाने आणि सर्व सहकारी-कार्यकर्त्यांच्या प्रेमामुळे. अत्यंत प्रामाणिकपणे कार्य करत राहून हे प्रेम आणि विश्वास जपून ठेवणे हे माझं आद्यकर्तव्य आहे, अशा शब्दात मुंडे यांनी आपल्या भावना यावेळी बोलून दाखवल्या.
परळीमध्ये धनंजय मुंडे यांचा वाढदिवस अत्यंत साधेपणाने आणि कौटुंबिक वातावरणात केक कापून साजरा करण्यात आला. यावेळी त्यांच्या आई रुक्मिणीबाई मुंडे, पत्नी राजश्री धनंजय मुंडे यांनी औक्षण केले. त्यानंतर परळीतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुंडेंचा सत्कार करण्यात आला. या सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.
यावेळी धनंजय मुंडे यांनी अनेक आठवणींना उजाळा दिला. पूर्वीच्या संघर्षाच्या काळात, ज्या सहकारी- कार्यकर्त्यांनी माझी साथ कधीच सोडली नाही. माझी साथ देण्यामुळे त्यांना अडचणीत आणण्यात आले, त्या सर्व कार्यकर्त्यांचे माझ्या हृदयात स्थान आहे. कोविड विषयक निर्बंध असल्यामुळे जरी सतत भेटीगाठी होत नसल्या तरी माझ्यासाठी खस्ता खाल्लेल्या एकही सहकाऱ्याचा विसर पडू देणार नाही असा विश्वास मुंडेंनी आपल्या सहकाऱ्यांना दिला. तसेच उपस्थित सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केले.
Video : 36 जिल्हे 72 बातम्या | 6 : 30 PM | 15 July 2021 https://t.co/YHTtvlNaMc @CMOMaharashtra @OfficeofUT #Maharashtra #SuperFastNews #DistrictNews #FastNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 15, 2021
इतर बातम्या :
SEBC Category : एसईबीसी प्रवर्गातील नियुक्त्यांबाबत महाविकास आघाडी सरकारचा महत्वाचा निर्णय
Social Justice Minister Dhananjay Munde’s birthday celebrated simply