धुळे : शिरपूरमधून धक्कादयाक घटना समोर आली आहे. बँकेवर दरोडा (Bank robbery) टाकण्याच्या उद्देशाने आलेल्या संशयित आरोपीने सुरक्षा रक्षकाच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकत हल्ला केला. या घटनेत सुरक्षा रक्षक गंभीर जाखमी झाला आहे. ही घटना सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद झाली आहे. या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध घेत आहेत. सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. अज्ञात व्यक्तीने मागून येऊन अचानक सुरक्षा रक्षकाच्या डोळ्यात तिखट टाकले. यावेळी सुरक्षा रक्षकाने संबंधित व्यक्तीला पकडण्याचा प्रयत्न केला असता, त्याच्यावर कोयत्याने देखील वार करण्यात आला. या घटनेत सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. बँकेच्या बाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकावर अज्ञात आरोपीने हल्ला केला. सुरक्षा रक्षकाच्या डोळ्यात मिरची पुड टाकण्यात आली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे सुरक्षा रक्षक गोंधळून गेला. मात्र तशाही परिस्थितीमध्ये सुरक्षा रक्षकाने आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र आरोपीने त्यानंतर सुरक्षा रक्षकावर कोयत्याने वार केले. या घटनेमध्ये सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे. संबंधित आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या हल्ल्यामध्ये सुरक्षा रक्षक गंभीर जखमी झाला आहे. आरोपीने त्याच्यावर कोयत्याने वार केल्याने त्याच्या डोक्यावर आणि शरीराच्या इतर ठिकाणी जखमा झाल्याने मोठा रक्तस्त्राव झाला. सुरक्षा रक्षकाला जखमी अवस्थेमध्ये रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळतचा शिरपूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन, घटनेची माहिती घेतली. अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
भरारी पथकाची थरारक कारवाई! गोव्याची दारु विकायचा प्लान फसला, सापळा रचून 50 लाखाची अवैध दारु जप्त