Dilip Walse Patil : अजान सुरू झाले अन् गृहमंत्र्यांनी भाषण थांबवले
शिरूर तालुक्यातील मलठण येथील जाहीर कार्यक्रमादरम्यान दिलीप वळसे पाटलांचे (Dilip Walse Patil) व्यासपीठावर भाषण सुरू होते. याचवेळी मशिदीत अजान सुरू झाले. यावेळी गृहमंत्र्यांनी भाषण थांबवून एक वेगळा संदेश यावेळी दिला.
राज्यात मशिदीवर चालणाऱ्या अजानवरून (Azan) राजकारण (Politics) सुरू झाले. त्यात मनसेने आक्रमक भूमिका घेत मशिदीसमोर हनुमान चालीसा लावण्यास सुरू केल्याने जातीय तेढ निर्माण होत असताना राज्याच्या गृहमंत्र्यांनी एक जातीय, धार्मिक समानतेचा संदेश दिलाय. शिरूर तालुक्यातील मलठण येथील जाहीर कार्यक्रमादरम्यान दिलीप वळसे पाटलांचे (Dilip Walse Patil) व्यासपीठावर भाषण सुरू होते. याचवेळी मशिदीत अजान सुरू झाले. यावेळी गृहमंत्र्यांनी भाषण थांबवून एक वेगळा संदेश यावेळी दिला. अजान संपल्यानंतर वळसे पाटलांनी पुन्हा भाषण सुरू केले.
Latest Videos