शिंदे सेना अन् उद्धव सेनेत थेट 26 ठिकाणी सामना? कोणत्या मतदार संघातून कोण उमेदवार

| Updated on: Oct 25, 2024 | 6:17 PM

शिवसेना कोणाची हे आता जनतेच्या न्यायालयात ठरणार आहे. त्यामुळे या 26 मतदार संघामध्ये विजयासाठी दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आणि पक्षाचे नेते प्रतिष्ठा पणाला लावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उबाठाने उमेदवार दिला आहे.

शिंदे सेना अन् उद्धव सेनेत थेट 26 ठिकाणी सामना? कोणत्या मतदार संघातून कोण उमेदवार
Follow us on

राज्यात दोन वर्षांपूर्वी शिवसेनेत बंडखोरी झाली. त्यानंतर निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला शिवसेना पक्ष अन् चिन्ह दिले. त्या विरोधात उद्धव ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सर्वोच्च न्यायालयात निकाल लागत नसल्यामुळे आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, असे उद्धव ठाकरे यांनी अनेक वेळा म्हटले आहे.

आता जनतेच्या न्यायालयात निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीत 26 मतदार संघात थेट एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यात लढत होणार आहे. या लढतीत कोण बाजी मारणार हे 23 नोव्हेंबर रोजी स्पष्ट होणार आहे.

शिवसेना कोणाची हे आता जनतेच्या न्यायालयात ठरणार आहे. त्यामुळे या 26 मतदार संघामध्ये विजयासाठी दोन्ही शिवसेनेचे उमेदवार आणि पक्षाचे नेते प्रतिष्ठा पणाला लावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात शिवसेना उबाठाने उमेदवार दिला आहे.

हे सुद्धा वाचा

या ठिकाणी रंगणार शिवसेनेत लढती

कोपरी-पाचपाखाडी

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): केदार दिघे
  • शिवसेना (शिंदे गट): एकनाथ शिंदे

सावंतवाडी

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): राजन तेली
  • शिवसेना (शिंदे गट): दीपक केसरकर

कुदाल (मालवान)

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): वैभव नायक
  • शिवसेना (शिंदे गट): निलेश राणे

रत्नागिरी

  • शिवसेना (उद्धव ठाकरे) : सुरेंद्रनाथ माने
  • शिवसेना (शिंदे गट): उदय सामंत

दापोली

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): संजय कदम
  • शिवसेना (शिंदे गट): योगेश कदम

पाटण

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): हर्षद कदम
  • शिवसेना (शिंदे गट): शंभूराज देसाई

संगोला

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): दीपक आबा साळुंखे
  • शिवसेना (शिंदे गट): शाहजी बापू पाटील

परांडा

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): राहुल ज्ञानेश्वर पाटिल
  • शिवसेना (शिंदे गट): तानाजी सावंत

कर्जत

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): नितिन सावंत
  • शिवसेना (शिंदे गट): महेंद्र थोर्वे

मालेगाव बाह्य

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): अद्वय किराया
  • शिवसेना (शिंदे गट): दादा भुसे

नांदगाव

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): गणेश धात्रक
  • शिवसेना (शिंदे गट): सुहास कांडे

वैजापूर

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): दिनेश परदेशी
  • शिवसेना (शिंदे गट):रणेश बोरणारे

संभाजीनगर पश्चिम

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): राजू शिंदे
  • शिवसेना (शिंदे गट): संजय शिरसाट

संभाजीनगर सेंट्रल

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): किशनचंद तनवानी
  • शिवसेना (शिंदे गट): प्रदीप जैस्वाल

सिल्लोड

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): सुरेश बुनकर
  • शिवसेना (शिंदे गट): अब्दुल सत्तार

कलमनुरी

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): डॉ. संतोष तल्फ़े
  • शिवसेना (शिंदे गट): संतोष बांगर

रामटेक

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): विशाल बरबटे
  • शिवसेना (शिंदे गट): आशीष जैस्वाल

मेहकर

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): सिद्धार्थ खरात
  • शिवसेना (शिंदे गट): संजय पायमुलकर

पाचोरा

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): वैशाली के सूर्यवंशी
  • शिवसेना (शिंदे गट): किशोर धनसिंह पाटील

ओवळा-माजिवडा

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): नरेश मनेरा
  • शिवसेना (शिंदे गट): प्रताप सरनाईक

मागाठणे

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): अनंत (बाळा) नर
  • शिवसेना (शिंदे गट): मनीषा वायकर

कुर्ला

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): प्रवीणा मोराजकर
  • शिवसेना (शिंदे गट): मंगेश कुडालकर

माहीम

  • शिवसेना (उद्धव ठाकरे):महेश सावंत
  • शिवसेना (शिंदे गट): सदा सरवणकर

महाड

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): स्नेहल जगताप
  • शिवसेना (शिंदे गट): भरत गोगवले

राधानगरी

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): के. पी. पाटील
  • शिवसेना (शिंदे गट): प्रकाश अबितकर

राजापूर

  • शिवसेना (उद्धव ठाकरे): राजन साळवी
  • शिवसेना (शिंदे गट): किरण सामंत