सेलिब्रिटी मॅनेजर दिशा सालियानचं मृत्यू प्रकरण पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. 2020 मध्ये झालेल्या दिशा सालियान मृत्यूप्रकरणी गुरूवारी महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनात पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला. अशातच मुंबई पोलिसांनी दावा केला की की त्यांना या प्रकरणात गैरप्रकाराचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. दिशाच्या मृत्यूमागे घातपात असल्याचा संशय तिच्या वडिलांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर व्यक्त केला. त्याचप्रमाणे सीबीआयकडून चौकशीची मागणी करण्यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. यानंतर विधानसभेतत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. एसआयटीची स्थापना दिशा सालियानच्या मृत्यूच्या तीन वर्षांनंतर डिसेंबर 2023 च्या विधानसभा अधिवेशनात भाजप नेते नितेश राणे यांनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त राजीव जैन यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. एसआयटीच्या सूत्रांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं त्यांनी दिशाच्या मृत्यूप्रकरणात गैरप्रकाराचा आरोप करणाऱ्या अनेकांना समन्स बजावले होते. यात तिचे कुटुंबीय आणि नितेश राणे यांचाही समावेश...