‘त्या’ 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स कसं पाजलं?; चौकशीत समोर आलं धक्कादायक कारण!

| Updated on: Feb 02, 2021 | 7:44 PM

यवतमाळ येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटाझर पाजण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. (doctor is culprit in yavatmal sanitizer incident: report)

त्या 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स कसं पाजलं?; चौकशीत समोर आलं धक्कादायक कारण!
Follow us on

यवतमाळ: यवतमाळ येथे पोलिओ लसीकरणा दरम्यान 12 लहान मुलांना सॅनिटाझर पाजण्यात आल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यामुळे एका अंगणवाडी सेविकेवर कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, या प्रकरणाची चौकशी करण्यात आली असून त्यातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. डॉक्टर मोबाईलमध्ये बिझी असल्यामुळेच या बालकांना सॅनिटाझर पाजल्या गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता कठोर कारवाईची मागणी होत आहे. (doctor is culprit in yavatmal sanitizer incident: report)

यवतमाळ येथील घटनेची चौकशी करण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी हरी पवार यांनी आज दिली. डॉक्टर मोबाईलवर बिझी होते. त्याच दरम्यान पोलिओ डोस घेण्यासाठी आलेल्या 12 बालकांना सॅनिटायझर पाजण्यात आल्याचं हरी पवार यांनी सांगितलं. पोलिओ लसीकरण मोहीम राबवण्यात येत असल्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना सॅनिटाझर पुरविण्यात आले होते. हे सॅनिटायझर आणि पोलिओचे डोस सोबतच टेबलवर ठेवण्यात आले होते. त्याच दरम्यान डॉक्टर फोनमध्ये बिझी झाल्याने बालकांना चुकून सॅनिटाझर पाजलं गेलं, असं सूत्रांनी सांगितलं. डॉक्टर कार्यालयीन बाबीमुळे मोबाईलवर बिझी होते की वैयक्तिक कारणास्तव बिझी होते? याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

दोघांवर कारवाई

यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणावेळी हा प्रकार घडला होता. लहान मुलांना पोलिओच्या डोसऐवजी सॅनिटायजर पाजले. 12 लहान बालकांना यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. वय वर्ष ते पाच वयोगटातील ही लहान मुलं आहेत. आरोग्यमंत्र्यांनी घटनेची गंभीर दखल घेत तिथल्या जिल्हा परिषदेच्या सीईओंना दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिलेत. त्यानुसार अंगणवाडी सेविकेवर कारवाई करण्यात आली आहे. (doctor is culprit in yavatmal sanitizer incident: report)

उशिरा जाग

दरम्यान, यवतमाळ जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांना उशीरा जाग आलीय. जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांनी आज (मंगळवार) उपचार घेणाऱ्या चिमुकल्यांची भेट घेतलीय. दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल. कुणाहीची गय केली जाणार नाही, असं यवतमाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कालिंदा पवार यांनी सांगितलं. (doctor is culprit in yavatmal sanitizer incident: report)

 

संबंधित बातम्या:

यवतमाळमध्ये पोलिओऐवजी 12 चिमुकल्यांना सॅनिटायजर्स पाजलं, आरोग्यमंत्री टोपेंची कडक कारवाई

पोलिओ लसीकरणावेळी हलगर्जी, सॅनिटायजर पाजल्याने यवतमाळमध्ये 12 चिमुकले रुग्णालयात

Bhandara Hospital Fire | “माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्या”, बाळांच्या आई आणि नातेवाईकांची आर्त हाक

(doctor is culprit in yavatmal sanitizer incident: report)