सोलापू्र : हे जे काही ट्रोल केलं जाते, हे भाजपकडून केलं जात नाही. आमच्याकडं खूप कामं आहेत. असं स्पष्टीकरण भाजपच्या महिला प्रदेशअध्यक्षा चित्रा वाघा यांनी केलं. एखाद्या विचारधारेला माननारी जास्त लोकं असतात. ती सगळी भाजपची लोकं आहेत का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मोबाईलवरचा व्हिडीओ मी बघीतला. दोन मिनिटं कळलं नाही काय आहे ते. नंतर लक्षात आलं की, या देशातल्या लोकांच्या प्रतिक्रिया आहेत. या काही भाजपच्या प्रतिक्रिया नाहीत.
व्यक्तीस्वातंत्र्यावर चर्चा सुरू आहेत. ज्याला जे वाटते ते तो बोलतो. आम्हालाही काय-काय बोललं जातं. फार शहानपणा शिकवितात. कमरेखालची भाषा आमच्यासाठी वापरली जाते. तुम्हाला वेळ असेल तर बघा. आमच्याबद्दल अतिशय घाण लिहिलं जातं. आपल्या कुटुंबाबद्दल थर्ड क्लास भाषा वापरली जाते. अशी खंतही चित्रा वाघ यांनी व्यक्त केली.
बाईला घरी बसवायचं काम काय. तिला जागेवर बसवायचं काम काय. तिच्या शक्तीस्थळावरती आघात करायचा. आमची प्रायोरिटी हा आमचा संसार आहे. मुलगा, नवरा ही आमची प्रायोरिटी आहे. बाई कशी घरी बसेल, यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोपही चित्रा वाघ यांनी केला.
त्यावेळचं राजकारण हे वेगळं होतं आताचं राजकारण हे वेगळं आहे. मला जे वाटतं ते मी बोलते. बाई आहे म्हणून तिकीट द्या. असं मी म्हणणार नाही. माझं कर्तृत्व पाहून मला तुम्ही तिकीट द्या, असं मी म्हणेन. असंही त्यांनी सांगितलं.
बाई म्हणून तिकीट मागू नका, कर्तृत्व आहे म्हणून तिकीट मागा. आपल्यात पण कॅलिबर असलं पाहिजे. आपल्याला आपला टक्का वाढवायचा असेल तर कॅलिबर वाढवा. काम करा, असा सल्ला चित्रा वाघ यांनी महिलांना दिला.