राज्यात आणखी एक मनोज जरांगे…डुप्लीकेट जरांगे यांचा मराठा आंदोलनास पाठिंबा की…

| Updated on: Dec 05, 2023 | 10:55 AM

Manoj Jarange Patil : राज्यात गेल्या काही महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील चांगलेच चर्चेत आले आहे. परंतु अकोल्यात डुप्लीकेट मनोज जरांगे पाटील मिळाले आहे. हे डुप्लीकेट अकोला शहरातून मनोज जरांगे यांच्या सभेपूर्वी मंगळवारी निघाले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली.

राज्यात आणखी एक मनोज जरांगे...डुप्लीकेट जरांगे यांचा मराठा आंदोलनास पाठिंबा की...
अकोल्यात डुप्लीकेट मनोज जरांगे पाटील
Image Credit source: tv9 Marathi
Follow us on

गणेश सोनोने, अकोला | 5 डिसेंबर 2023 : मराठा समाजाच्या आरक्षणसाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे पाटील गेल्या काही महिन्यांपासून चांगलेच चर्चेत आले आहे. त्याची मोठी क्रेझ राज्यातील मराठा तरुणांमध्ये निर्माण झाली आहे. त्यांच्या सभांना लाखोंची गर्दी होत आहे. दिवसा किंवा मध्यरात्री त्यांच्या राज्यात सभा होत आहे. मनोज जरांगे पाटील यांचा राज्यात चौथा दौरा सुरु झाला आहे. मनोज जरांगे पाटील यांची मंगळवारी अकोल्यात सभा होत आहे. त्याचवेळी अकोल्यात त्यांचा डुप्लीकेट मिळाला आहे. अकोल्यातील जुन्या शहरात राहणारे तुळशीराम गुजर हे हुबेहूब मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसत. यामुळे ते अकोला शहरातून मनोज जरांगे यांच्या सभेपूर्वी ते निघाले तेव्हा त्यांना पाहण्यासाठी गर्दी झाली.

काय म्हणतात तुळशीराम गुजर

मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसणारे तुळशीराम गुजर म्हणतात, मला काही दिवसांपूर्वी मित्रांनी तुम्ही मनोज जरांगे पाटील याच्यासारखा दिसत असल्याचे सांगितले. मला विश्वास बसला नाही. मग मोबाईलमध्ये त्यांचे फोटो पाहिले. त्यानंतर मला विश्वास बसला. आपण मनोज जरांगे पाटील यांच्यासारखे दिसत असल्याबद्दल आनंद झाला. सध्या मी जेव्हा रस्त्यावरुन जातो तेव्हा सर्वांना आश्चर्य वाटत आहे. अनेक जण आपल्यासोबत फोटो घेत आहे आणि सेल्फी काढत आहेत.

हे सुद्धा वाचा

मराठा आंदोलनास दिला पाठिंबा

मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनास आपला पाठिंबा असल्याचे तुळशीराम गुजर यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी आपली मागणी आहे. आपण मनोज जरांगे यांच्यासारखे दिसत असल्याबद्दल आपणास अभिमान वाटतो. मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या सारखा मी दिसत असल्यामुळे अनेक जण आपल्यासोबत सेल्फी घेत आहेत. मी आज मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी चरणगाव या ठिकाणी जात आहे. तर अकोला शहरातील सकल मराठा यांच्या वतीने त्यांचे स्वागतही करण्यात आले आहे.