माढा – द्राक्षाच्या बागेसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे घड जळाले. माढा तालुक्यातील घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये (Farmer) घबराहट पसरली आहे. बावी (bavi) गावात ही घटना घडली असून 35 टनाचे शेतकऱ्यांचे नुकसान झाले. 3 हजार हेक्टर हुन अधिक क्षेत्रावर द्राक्ष बागेची लागवडीचे नुकसान झाल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे. बोगस रासायनिक खतांमुळे द्राक्षांचे लाखोंचे झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. विजय ज्ञानदेव मोरे (vijay more) या शेतकऱ्याच्या शेतातील द्राक्ष बागेत हा प्रकार घडला आहे. घडलेल्या प्रकारबाबत शेतकऱ्यांने कृषी आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. कृषी विभागाने तात्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर रासायनिक खते दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
नेमकं काय आहे प्रकरण
द्राक्षांच्या बागेसाठी वापरण्यात आलेल्या रासायनिक खतांमुळे द्राक्ष घड जळून गेल्याचा धक्कादायक प्रकार माढा तालु्क्यातील बावी गावात घडला आहे. या प्रकारामुळे माढा तालुक्यातील द्राक्ष बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत.3 हजार हेक्टरहून अधिक क्षेत्रावर द्राक्ष बागेच्या लागवडची नुकसान झाल्याचीा माहिती कृषी विभागाने दिली आहे. विजय ज्ञानदेव मोरे या शेतकऱ्याच्या शेतातील द्राक्ष बागेत हा प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी विजय मोरे यांनी कृषी आयुक्ताकडे हायटेक “ग्रीन अॅग्रो टेक” या कंपनीच्या विरोधात खताच्या दुकानदाराच्या विरोधात खते घेतलेल्या पावतीसह रीतसर तक्रार तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन जिल्हा कृषी विभागाच्या पथकातील तज्ज्ञांनी लॅबमध्ये तपासणी केली. त्यावेळी पथकाला अनेक गोष्टी आढळून आल्याने संबंधित दुकानदाराचा परवाना रद्द करण्यात आला आहे.
लाखो रूपयांचे नुकसान
संबंधीत हायटेक कंपनीच्या रासायनिक खतांची प्रयोग शाळेत तपासणी केली असता. ती खते बोगस असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शेतकरी विजय मोरे याचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाले . बोगस खतांमुळे झालेल्या नुकसानीस कंपनी जबाबदार असून कंपनीवर गुन्हा दाखल करुन त्यांच्याकडून नुकसान भरपाई मिळण्याची मागणी विजय मोरे यांनी केली आहे. बोगस खतांमुळे विजय मोरे या शेतकऱ्याचे दीड एकर बागेतील 12 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
70 अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याची धक्कादायक बाब समोर
ऊसाच्या पिकाला टाळून अनेक शेतकरी मोठ्या प्रमाणावर द्राक्षाचे उत्पादन घेत आहेत. मात्र ‘ग्रीन अॅग्रो टेक’ कंपनीच्या खतांच्या निकृष्टतेमुळे शेतकरी धास्तावले आहेत. मोंडनिब येथील बळीराजा कृषी केंद्रामधून शेतकरी मोरे यांनी ग्रीन गोल्ड या कंपनीची विविध प्रकारची रासयनिक अन्नद्रवे खरेदी करुन ती द्राक्ष बागेसाठी वापरली होती.दरम्यान खतांचा वापर केल्यानंतर काढणीस आलेले द्राक्ष जळू लागल्याची बाब या शेतकऱ्याच्या लक्षात आली.त्यानंतर या शेतकऱ्याने कृषी विभागाशी संपर्क साधून तक्रार दिली. त्यानंतर संबंधीत खत दुकानातील खतांचे नमूने घेवून पुणे येथील शासकीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी दिले होते. तपासणी अहवालामध्ये खतांमध्ये 70 अन्नद्रव्यांचे प्रमाण कमी असल्याची धक्कादायक बाब समोर आल्याची माहिती भारत कदम, माढा तालुका कृषी अधिकारी यांनी दिली.