मुंबई: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी (money laundering) ईडीच्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांना मोठा धक्का बसला आहे. ईडीने (Ed) मलिक यांच्या आठ मालमत्ता जप्त केल्या आहे. त्यात कुर्ल्यापासून ते उस्मानाबादपर्यंतच्या संपत्तीचा समावेश आहे. मलिक यांची ही संपत्ती काही कोटींची असल्याचं सांगितलं जात आहे. ईडीची ही कारवाई मलिक यांना मोठा झटका असल्याचं मानलं जात आहे. मलिक यांच्यावर बेकायदेशीरपणे या जमिनीचा व्यवहार करण्यात आल्याचाही ठपका ठेवण्यात आला आहे. याच मालमत्तेतून 11.70 कोटी रुपयांचं भाडंही नवाब मलिकांच्या मालकीच्या असलेल्या कंपन्यांना देण्यात आल्याचंही चौकशीतून समोर आलं आहे. या संपूर्ण प्रकरणी मलिकांच्या एकूण पाच मालमत्तांवर ईडीनं टाच आणली आहे. या कारवाईनंतर ईडी मलिकांवर आणखी काय कारवाई करणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
नवाब मलिक यांच्या संपत्तीवर ईडीने आज कारवाई केली आहे. त्यांच्या एकूण आठ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली आहे. त्यात कुर्ल्यातील गोवावाला कंपाऊंडची जागा, उस्मानाबादमधील 148 एकर जमीन, वांद्रे पश्चिमेतील दोन राहती घरं, कुर्ला पश्चिमेतील एक व्यावसायिक जागा आणि कुर्ला पश्चिमेतीलच तीन फ्लटॅस जप्त करण्यात आले आहेत. 2002 सालच्या मनी लॉन्ड्रिंग कायद्याखाली ही कारवाई करण्यात आली आहे. या आठही मालमत्तांची किंमत कोट्यवधी रुपये आहे. त्याचा नेमका आकडा कळू शकला नाही.
मलिक यांच्यावरील हे प्रकरण दोन महिन्यांपूर्वीचं आहे. 3 फेब्रुवारी 2022 रोजी दाखल करण्यात आलेल्या एफआयआरनंतर ईडीनं चौकशी सुरु केली होती. दाऊद इब्राहिम आणि त्यांच्याशी निगडीत असलेल्या व्यक्तींकडून पैसे लाटण्याचा प्रकार झाल्याचा आरोप करण्यात आला होता. हसीना पारकरच्या मध्यस्थीने मलिक यांनी जमिनीचा व्यवहार केल्याचा आरोप आहे. त्यानुसार यूएपीएच्या कलम 120 बी, कलम 17,18, 20, 21, 38 आणि 40 नुसार तक्रार नोंदवून घेण्यात आली होती. त्यानंतर ईडीने तपास सुरू केला आणि त्यानंतर मलिक यांना अटक केली. सध्या मलिक न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलं आहे.
ईडीने याबाबतची प्रेस रिलीज काढली आहे. त्यात त्यांनी या संपत्तीचा लेखाजोखा देतानाच या प्रकरणावर प्रकाशही टाकला आहे. मुनिरा प्लंबर यांची मालमत्ता हडप करण्याच्या उद्देशानं बनावट कागदपत्र दाखवण्यात आली. नवाब मलिकांच्या सोडियम इनवेस्टमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड ही नवाब मलिकांच्या कुटुंबीयांपैकी एकाच्या मालकीची कंपनी आहे. या कंपनीसोबत हसीना पारकर आणि दाऊदशी संबंधित व्यक्तींनी जमीन हडप केली. हसीना पारकर आणि नवाब मलिक यांनी एकत्र येऊन हे गुन्हगारी कृत्य केल्याचं ईडीने आपल्या प्रेस नोटमध्ये म्हटलं आहे. सोडियम इनव्हेस्टमेन्ट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीनं ही जमीन हडप केल्याचा आरोप करण्यात आला. ही कंपनी मलि यांच्याकडून कंट्रोल केली जाते, असा दावा ईडीने केला आहे. तसंच हसीना पारकर, सरदार शाहवाली खान, सलीम पटेल आणि नवाब मलिक यांनी गोवावाला कंपाऊंड येथील कुर्ल्यातील तीन एकर जमीन हडप केल्याचंही ईडीनं नमूद केलं आहे.
संबंधित बातम्या: