40 वर्षे भाजपमध्ये काढली, आता स्वगृही परतण्याचा मार्ग रखडला, एकनाथ खडसे यांचा मोठा निर्णय

| Updated on: Sep 02, 2024 | 1:14 PM

eknath khadse: भाजप पक्षप्रवेशाचा केंद्रातील नेत्यांचा प्रतिसाद आहे. मात्र राज्यात विरोध होत असल्याची खदखद खडसे यांनी कोणाचेही नाव न घेता व्यक्त केली. राजकीय भवितव्यासाठी मला या संदर्भात कुठलातरी निर्णय घ्यावा लागणार आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

40 वर्षे भाजपमध्ये काढली, आता स्वगृही परतण्याचा मार्ग रखडला, एकनाथ खडसे यांचा मोठा निर्णय
एकनाथ खडसे
Follow us on

महाराष्ट्र भारतीय जनता पक्षात 40 वर्षे काम करणाऱ्या आमदार एकनाथ खडसे यांचा स्वगृही परतण्याचा मार्ग रखडला आहे. भाजप प्रवेश करण्याचा निर्णय जाहीर करुन त्यांना अजून भाजपमध्ये प्रवेश दिला गेला नाही. एकनाथ खडसे यांनी दिल्लीत जाऊन वरिष्ठ नेत्यांशीही चर्चा केली होती. परंतु अनेक महिने उलटूनही त्यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अजून लागत नाही. यामुळे नाराज झालेले एकनाथ खडसे मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. भाजप पक्षप्रवेशाबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मी आता पुढचा विचार करणार असल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले पूर्वाश्रमीचे भाजपचे नेते एकनाथ खडसे पुन्हा स्वगृही परतण्याच्या तयारीत होते. त्यासंदर्भातील निर्णय त्यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वीच जाहीर केला होता. परंतु अजूनही त्यांना भाजप पक्षप्रवेशाबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नाही. यामुळे मी आता पुढचा विचार करेल किंवा माझ्या राष्ट्रवादीचे काम करेल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे. दरम्यान, एकनाथ खडसे हे राष्ट्रवादीत राहतात की? भाजपात जातील याबाबत आपली भूमिका दोन दिवसांत स्पष्ट करतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

काय म्हणाले एकनाथ खडसे

मी भाजप पक्षप्रवेशाची इच्छा व्यक्त केली होती. मात्र भाजपकडून पाहिजे तसा प्रतिसाद नाही. मी राष्ट्रवादी काँग्रेसचा सदस्य आहे. तसेच आमदार आहे. मी माझा राजीनामा शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिलेला आहे. परंतु त्यांनी माझा राजीनामा अद्याप स्वीकारलेला नाही. तसेच मला शरद पवार साहेबांनी आमदारकीचा राजीनामा देण्याबाबत मनाई केलेली आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

हे सुद्धा वाचा

…अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसचे काम करेल

काही कारणास्तव मी भाजपमध्ये जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. परंतु अजूनही प्रवेश मिळत नाही. यामुळे मी आणखी काही दिवस भाजप प्रवेशाबाबत वाट पाहील, नाहीतर मी माझ्यामूळ राष्ट्रवादी पक्षाचे काम जोराने करेल. भाजप पक्षप्रवेशाबाबत कुठलाही प्रतिसाद मिळत नसल्याने मी आता पुढचा विचार करेल.

भाजप प्रवेशाबाबत अडसर राज्यातून

भाजप पक्षप्रवेशाचा केंद्रातील नेत्यांचा प्रतिसाद आहे. मात्र राज्यात विरोध होत असल्याची खदखद खडसे यांनी कोणाचेही नाव न घेता व्यक्त केली. राजकीय भवितव्यासाठी मला या संदर्भात कुठलातरी निर्णय घ्यावा लागणार आहे, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.