‘मुख्यमंत्रीचा राजीनामा देताना आमदारकीचा राजीनामा देणार होते, आता…’ एकनाथ शिंदे यांचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला

| Updated on: Dec 21, 2024 | 6:11 PM

मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. आता ते आमदारकी वाचवण्यासाठी पर्यटक म्हणून येऊन गेले, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लागवला.

मुख्यमंत्रीचा राजीनामा देताना आमदारकीचा राजीनामा देणार होते, आता... एकनाथ शिंदे यांचा नाव न घेता उद्धव ठाकरे यांना टोला
एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस
Follow us on

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार कुठे गेले आहेत? ते आधीच बातमी होऊ नये म्हणून सांगत असल्याचे म्हटले. दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशात उद्धव ठाकरे फक्त येऊन गेल्यामुळे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. एकनाथ शिंदे म्हणाले, मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यावेळी त्यांनी आमदारकीचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले होते. आता ते आमदारकी वाचवण्यासाठी पर्यटक म्हणून येऊन गेले, असा टोला एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना त्यांचे नाव न घेता लागवला.

पुणे विमानतळ नामकरणाचा ठराव

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अधिवेशनात १७ विधेयके मंजूर झाली. तसेच पुणे विमानतळाला संत एकनाथ महाराज यांचे नाव देण्याचा प्रस्ताव संमत करण्यात आला. आता हा प्रस्ताव केंद्राकडे पाठवला जाणार आहे. अधिवेशाच्या काळात मंत्रिमंडळ विस्तार झाला. विधान परिषदेच्या सभापतींची निवड झाली. विरोधकांनी सभागृहात प्रश्न उपस्थित न करता पायऱ्यांवर व माध्यमांवर प्रश्न मांडले.

अजित पवार कुठे गेले?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नागपूर मेट्रोसाठी कर्ज मिळाले आहे. हे कर्ज एक टक्के कमीपेक्षा व्याजदराने जापान सरकारकडून घेण्यात येणार आहे. त्यासाठी डॉलर ऐवजी येनमध्ये पैसे मिळणार आहे. ३ हजार ५८४ कोटी कर्ज हे असणार आहे. अजित पवार माझी परवानगी घेऊन बीड आणि परभणीत सरकारकडून गेले आहे.

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ विस्तार आज किंवा उद्या

महाराष्ट्रात राज्य कौशल्य विद्यापीठ करण्यात येणार आहे. त्या विद्यापीठाला रतन टाटा यांचे नाव देण्यात येणार आहे. आपल्या गडकिल्ल्यांवर घाण करणारे आणि मद्यपान करणाऱ्यांची शिक्षा वाढवण्याबाबतचे विधेयक समंत केल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. खातेवाटप लवकरच होणार असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लवकरच म्हणजे आज किंवा उद्या सकाळी खातेवाटप जाहीर होऊ शकते? असे एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितले.