Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | शिंदे गटाचे ‘हे’ 10 उमेदवार जवळपास निश्चित, वाचा यादी

| Updated on: Mar 18, 2024 | 9:21 PM

महायुतीच्या जागा वाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपची कोअर कमिटी दिल्लीत दाखल झालीय. याच बैठकीत शिंदे गट आणि अजित पवार गटाला नेमक्या किती जागा मिळतील याचा निर्णय होण्याची शक्यता आहे. दरम्यान शिंदेंच्या शिवसेनेनं 10 उमेदवारांची यादी निश्चित केलीय, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

Tv9 मराठी स्पेशल रिपोर्ट | शिंदे गटाचे हे 10 उमेदवार जवळपास निश्चित, वाचा यादी
Follow us on

मुंबई | 18 मार्च 2024 : महायुतीच्या जागावाटपासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे दिल्लीला गेले आहेत. भाजपने पहिल्या 20 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. आता उर्वरित भाजपच्या कोट्यातल्या जागा आणि शिंदे गट तसेच अजित पवार गटाच्या जागांवर चर्चा होईल. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून 10 उमेदवारांची नावं निश्चित झाल्याची माहिती TV9ला मिळालीय. जागावाटप सन्मानजनकच होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.लोकसभेच्या निवडणुका घोषित झाल्या आहेत. मात्र महायुतीत जागावाटपाचा फॉर्म्युला अद्याप ठरलेला नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत मुंबईतही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांच्या 2 राऊंड बैठका झाल्या. दिल्लीतही शिंदे आणि अजित पवार जावून आलेत. पण अंतिम तोडगा निघालेला नाही. आता दिल्लीत पुन्हा महाराष्ट्रातील भाजपच्या कोअर कमिटीची बैठक आहे. त्यात ज्या जागांवर तिढा आहे त्यावर चर्चा होईल

शिवसेनेकडून ‘या’ 10 उमेदवारांची नावं निश्चित

  • दक्षिण मध्य मुंबई राहुल शेवाळेंचं नाव निश्चित झालंय
  • कल्याणमधून श्रीकांत शिंदे. श्रीकांत शिंदे ठाण्यातून की कल्याणमधून? अशी चर्चा होती. पण ते कल्याणमधून लढतील हे निश्चित झालंय.
  • ठाण्यातून प्रताप सरनाईक संभाव्य उमेदवार आहेत
  • छत्रपती संभाजीनगरमधून संदीपान भुमरे संभावित उमेदवार आहेत
  • हातकणंगलेतून धैर्यशील मानेंच्या नावावर शिक्कामोर्तब झालंय
  • यवतमाळमधून मंत्री संजय राठोड संभाव्य उमेदवार असू शकतात..विद्यमान खासदार भावना गवळींचा पत्ता जवळपास कट झालाय
  • बुलडाणा प्रतापराव जाधव
  • नाशिकमधून हेमंत गोडसे संभाव्य उमेदवार आहेत
  • कोल्हापुरातून संजय मंडलिक संभाव्य उमेदवार आहेत

‘या’ जागांवर तिढा

  • रामटेकची जागा शिंदेंच्या शिवसेनेकडे आहेत. इथं कृपाल तुमाने खासदार आहेत. पण या जागेवर भाजपनं दावा केलाय.
  • हिंगोलीत हेमंत पाटील शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत. या जागेवरही भाजपचा दावा आहे
  • दक्षिण मुंबईत सध्या ठाकरे गटाचे अरविंद सावंत खासदार असून शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघांचाही दावा आहे. मात्र भाजपनं मनसेसोबत याच जागेवर चर्चा केल्याची माहिती आहे.
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग या जागेवर शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघांनीही दावा केलाय. इथं शिंदेंचे मंत्री उदय सामंतांचे भाऊ किरण सामंत इच्छुक आहेत..तर भाजपला नारायण राणेंना तिकीट द्यायचंय
  • गडचिरोली-चिमूरची आणि भंडारा गोंदिया या दोन्ही जागांवर अजित पवार गटानं दावा सांगितलाय. दोन्ही ठिकाणी भाजपचेच खासदार आहेत.
  • गडचिरोली-चिमूरमधून अशोक नेते भाजपचे खासदार आहेत. तर भंडारा-गोंदियातून सुनील मेंढे खासदार आहेत. भंडारा-गोंदियातून अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल इच्छुक आहेत.

दोन-तीन दिवसात जागावाटप फिक्स होणार?

महायुतीच्या जागावाटपावर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिलीय. पुढच्या 2-3 दिवसांत जागा वाटप फिक्स होईल, असं मुनगंटीवार यांनी सांगितलंय. विशेष म्हणजे जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपच्या नेत्यांनंतर आता अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीला जाणार असल्याचं कळतंय.