‘एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री’; शिवसेना खासदाराचं मोठं वक्तव्य

| Updated on: Apr 06, 2025 | 9:38 PM

शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

एकनाथ शिंदे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री; शिवसेना खासदाराचं मोठं वक्तव्य
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. प्रशासकीय पातळीवर एकनाथ शिंदे हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे शिंदे साहेबच आहेत असं त्यांनी म्हटलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार दौऱ्यासाठी कोल्हापूर दौऱ्यावर असताना धैर्यशील माने यांनी हे वक्तव्य केलं आहे.

नेमकं काय म्हणाले धैर्यशील माने?

शिवसेना शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. या वक्तव्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. प्रशासकीय पातळीवर एकनाथ शिंदे हे जरी उपमुख्यमंत्री असले तरी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री हे शिंदे साहेबच आहेत असं धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की,  विधानसभा निवडणुकीत आम्ही या मतदारसंघातील लोकांना आवाहन केलं होतं, तुम्ही आबिटकर याना आमदार करा, त्यांना नामदार आम्ही करतो. मी सांगितलं होतं आबिटकर गुलिगत निवडून येतील आणि विरोधक झापूक झुपूक करतील. एकनाथ शिंदे यांनी आपला शब्द पाळला आहे, आबिटकर हे मंत्री झाले आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात दहा पैकी दहा आमदार महायुतीचे निवडून आले आहेत. यातले पाच आपल्या शिवसेनेचे आहेत. आमच्या पक्षाचं वलय वाढतंय, कारण विचाराला मुरड घातलेली नाही, नेतृत्व खंबीर आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारखं नेतृत्व आम्हाला मिळालं हे आमचे भाग्यच म्हणावं लागेल, असं धैर्यशील माने यांनी म्हटलं आहे.

राणेंची प्रतिक्रिया 

दरम्यान त्यानंतर आता धैर्यशील माने यांच्या या वक्तव्यावर भाजप नेते नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तुम्ही आग लावायचं काम करत आहात. आज चांगल्या ‌दिवशी मी उत्तर देणार नाही. आताचे जे राजकारणी आहेत, त्यातील मी जुना आहे. एकनाथ शिंदे हे पन्नास वर्षांपेक्षा अधिक काळापासून राजकारणात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री , मंत्री राहिले आहेत.
बर वाईट कळत ना ? कशाला दोघात लावतायेत. सांगा ना नांदा सौख्य भरे, तर बर होईल, असं राणे यांनी म्हटलं आहे.