‘तुम लढो में बुके देकर घर जाता हूँ…’, अंबादास दानवे यांच्याशी बोलताना एकनाथ शिंदे यांचा कोणाला जबरदस्त टोला

| Updated on: Dec 21, 2024 | 5:07 PM

जी लोक घरी बसत होती, त्या लोकांना जनतेने आता घरी बसवले आहे. त्यांनी विकास कामांना स्पीड ब्रेकर लावले होते. त्यापूर्वीच्या महायुती सरकारने सुरु केलेल्या अनेक योजना बंद केल्या होत्या. त्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेवर येताच सर्व योजना सुरु केल्या.

तुम लढो में बुके देकर घर जाता हूँ..., अंबादास दानवे यांच्याशी बोलताना एकनाथ शिंदे यांचा कोणाला जबरदस्त टोला
Eknath Shinde
Follow us on

हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंतिम आठवडा प्रस्तावावर विधान परिषदेत उत्तर दिले. यावेळी त्यांनी जोरदार टोलेबाजी केली. महायुतीने आणलेली कोणतीही योजना बंद होणार नाही. नव्या योजनाही आणू, असे त्यांनी यावेळी सांगितले. अंबादास दानवे यांच्याकडे पाहून बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले, अंबादास, ‘पुर्वी तुम लढो मै कपडे सांभालता हु’ अशी अशी स्थिती होती. आता ‘तुम लढो में बुके देकर घर जाता हूँ… ‘अशी स्थिती आहे, असा टोला त्यांनी लागवला. एकनाथ शिंदे यांनी हा टोला कोणाला लगावला, त्याची चर्चा यानिमित्ताने सुरु झाली.

आरोपांना कामातून उत्तर देणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेला उत्तर देताना जोरदार फटकेबाजी केली. त्यांनी म्हटले, महायुतीच्या सरकारने अडीच वर्षांत विक्रमी कामे केली. सर्व बंद पडलेल्या योजना सुरु केल्या. जे लोक योजना बंद करत होते, त्या लोकांना जनतेने घरी बसले. विधानसभा निवडणुकीत जनतेने काम करणाऱ्यांना निवडून दिले. आम्ही पूर्वी सांगत होतो की, आरोपांना आम्ही आरोपाने उत्तर देणार नाही. आम्ही आमच्या कामातून उत्तर देऊ. आताही आम्ही तेच करणार आहे. लोकांना आरोप नको आहे, विकास कामे हवी आहे. ती आम्ही दिल्यामुळे जनतेने आम्हाला भरभरून प्रेम दिले.

सरकार न्याय देणार

एकनाथ शिंदे यांनी परभणी आणि बीड घटनेचा उल्लेख केला. ते म्हणाले, परभणी आणि बीडसंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्र्यांनी सभागृहात उत्तर दिले आहे. त्या ठिकाणी दोषींवर कारवाई झाली आहे. परभणी आणि बीडमध्ये जे झाले त्याबाबत न्याय मिळणार आहे. कारण आमचे हे सरकार न्यायाचे सरकार आहे. त्या ठिकाणी घडलेल्या घटनेची चौकशी सुरु केली आहे. दोषी असणाऱ्यांना सोडणार नाही, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा

येत्या काळात सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांच्या आयुष्यात आनंद समाधान निर्माण करण्यासाठी नव्या कल्याणाकारी योजनाही आम्ही सुरु करणार आहोत. हे कायद्याचे राज्य आहे इथे कायदा हातात घेणाऱ्यांची गुंडगिरी मुळीच खपवून घेतली जाणार नाही. आमच्या आया-बहिणींकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या गुन्हेगारांना कदापिही माफी नाही हेच आमच्या सरकारचे धोरण आहे, असे त्यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांना चिमटे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना चिमटे काढले. ते म्हणाले, जी लोक घरी बसत होती, त्या लोकांना जनतेने आता घरी बसवले आहे. त्यांनी विकास कामांना स्पीड ब्रेकर लावले होते. त्यापूर्वीच्या महायुती सरकारने सुरु केलेल्या अनेक योजना बंद केल्या होत्या. त्यामुळे आम्ही पुन्हा सत्तेवर येताच सर्व योजना सुरु केल्या. आमचे सरकार गतिमान सरकार असल्याचे पुन्हा सिद्ध केले, असे त्यांनी म्हटले आहे.