मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार १५ डिसेंबर रोजी झाली होता. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी खाते वाटप जाहीर करण्यात आले. मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलेले आमदार खूश आहेत तर ज्यांचा समावेश झाला नाही ते नाराज आहेत. आता मंत्रिमंडळासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी निकष ठरवले आहेत. ते निकष काही आहे, त्याची माहिती शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी दिली.
मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या कामांचा आता दर तीन महिन्यांनी आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्र्यास काम करणे गरजेचे आहे. जे शिवसेनेचे मंत्री काम करणार नाही त्यांची खाती काढून घेतले जाणार आहे. म्हणजेच ज्यांची कामगिरी चांगली नसले त्यांचे मंत्रिपद जाणार आहे, असे शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी सांगितले असल्याचे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
संजय शिरसाट म्हणाले, शिंदे साहेबांनी माझ्यावर नवीन जबाबदारी टाकली आहे. ज्या सामाजिक न्याय खात्याची मला जबाबदारी दिली आहे, त्याचे काम लगेच सुरु करणार आहे. संभाजीनगरचे पालकमंत्रीपद कोणाला मिळणार, हे वरिष्ठ नेते ठरवणार आहे.
जमीन बळकविण्याची जी काम सुरु आहे, ती थांबविण्याकडे माझे लक्ष असणार आहे. मग जमीन बळकवणारा कोणत्याही पक्षाचा असो त्याच्यावर कारवाई केली जाईल. सिल्लोड असो की छत्रपती संभाजीनगर कुठेही जमीन बळकवणाऱ्यांचा बंदोबस्त करण्यात येईल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले.
कुणीही पालकमंत्री असो, आमदार असो की खासदार असो, शासकीय निधीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत समान निधीचे वाटप करण्यात येईल. जर असमान निधीचा वाटप झाला असेल तर कारवाई होणार आहे. त्यासाठी डीपीडीसीचा अहवाल आपण मागितला आहे, असे संजय शिरसाट यांनी सांगितले.
अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसावर शिरसाट म्हणाले, ते मोठे नेते आहेत. ते शहरात काय मुंबईतही वाढदिवस साजरा करू शकतात. त्यांचा वाढदिवस माझ्या शुभेच्छा आहेत. ते म्हणतात मी पुन्हा येईन. अडीच वर्षानंतर ते येणार असल्याचे म्हणतात. परंतु त्याचा निर्णय शिंदे साहेब घेतील.