राज्यातील दुर्गम भागात निवडणूक साहित्य पोहचले, हवाईदलाच्या विमानाने कर्मचारी दाखल
राज्यातील विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. एकूण 288 विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे.
1 / 5
मतदानाची वेळ ही सकाळी 7:00 ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत राहील. संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रशासनाकडून निवडणुकीची संपूर्ण तयारी झालेली आहे.
2 / 5
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारी पुरवण्यात आले आहेत. तसेच पोलीस कर्मचारीवृंद तैनात ठेवण्यात आले आहे.
3 / 5
मतदान केंद्रावर पुरवण्यात येणाऱ्या ईव्हिएम व व्हिव्हिपॅट ची तपासणी पूर्ण झाली आहे. तसेच या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये ईव्हिएम व व्हिव्हिपॅट मशीन्सची विधानसभा मतदारसंघनिहाय सिलींग करण्यात आले आहे. गडचिरोलीसारखा दुर्गम भागात मतदानसाठी लागणारी सामग्री घेऊन कर्मचारी पोहचले आहे.
4 / 5
राज्यातील संवेदनशील मतदान केंद्रांमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकडया तैनात करण्यात आल्या आहेत. निवडणुकीचा प्रचार आज सोमवारी संपणार आहे. त्यामुळे उमेदवार राजकीय गणिते आखणार आहे.
5 / 5
राज्यातील 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी 1,00,427 मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. 85 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या मतदारांना तसेच दिव्यांग मतदारांना त्यांच्या इच्छेनुसार गृह मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.